विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 2 October 2018

सरखेल कान्होजी आंग्रे.

🚩अपरिचित मावळे 🚩

सरखेल कान्होजी आंग्रे.
(ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै१७२९).

सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो.
आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते.सरखेल कान्होजींचा दरारा....

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला;
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.

मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले.

१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात

१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.

२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले.

या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आयुष्यातील प्रमुख लढाया..
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी
दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर
(आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम
ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३००००
रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला
हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या
जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग)
किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज
आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश
जहाजांवर हल्ला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...