विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 6 January 2019

देसुरची लढाई


 देसुरची लढाई


वांदीवाॅशहून २२ किलोमिटर देसुर येथे संताजी घोरपडे यांनी २०००० सैन्यानिशी खानास गाठले. भिमसेन सक्सेना हा रावदलपताचा चिटनिस व मोगल ईतिहासकार त्यावेळी या लढाईत सामील होता त्याने हा प्रसंग सविस्तर लिहून ठेवला आहे तो म्हणतो -
जुल्फीकारखान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरवात केली. मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते. त्यानी मोगलांची वाट अडवली. मोगलांकडे बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपताने सैन्याची उजवी बाजू संभाळली आणि त्याने शत्रूंना हटवले. ईतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसर्या दिवशी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यानी निकराचे हल्ले चढविले. त्यानी ईतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यासोबत असलेले वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांच्या बंदुका मोगल सरदाराच्या हत्तीवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फीकारखान व राव दलपत यांच्या हत्तीना अनेक गोळ्या लागल्या. राव दलपताने स्वत: गोळ्या झाडून आनखी काही मराठा सरदारांना ठार मारले. मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता. आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेते लागली. आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले.
संताजी घोरपडे यांनी देसुर येथे मोगलांची प्रचंड सामग्री लुटुन नेली.
ही देसुरची लढाई झाली ती तारीख होती -
5 जानेवारी 1693
#maratha_empire
#sarsenapati #santaji
#desur


No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...