विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 January 2019

महाराणी येसूबाई

महाराणी येसूबाई
स्त्री सखी राज्ञी जयती
सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, राजकारण-कुशल अशा महाराणी येसूबाई साहेबांनी १६८०-१७३० या कसोटीच्या काळात अतिशय महत्वाचे योगदान केले आहे.
महाराणी येसूबाई ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी.
पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या कुलीन मराठा घरण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब महाराज ... अंदाजे इ.स.१६६१ ते १६६५ च्या दरम्यान त्यांच्या विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांच वय जेमतेम ६-७ वर्ष होत. त्यामुळे त्यांची जडन-घडन संभाजी राजांसामवेत माँसाहेबांच्या देखरेखी खाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. स्वराज्य प्रवर्तिका जिजाबाईसाहेब व युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या मुशीतून तावून सुकावून बाहेर पडलेले अस्सल बावनकशी सोने महाराणी येसूबाईसाहेब महाराज.

महाराणी येसूबाई रणांगणी नसल्या तरी त्या धर्यशील,कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतिच्या होत्या.
ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा काराभार माँसाहेब सांभाळत तसा संभाजी राजांच्या अनुपस्थितीत येसूबाई सांभाळत असत. त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही "स्त्री सखी राज्ञी जयती" असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या... पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या.. गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत.
पुढे इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयतिक दुःख बाजुला सारून मोठ्या निर्धाराने सामोरे गेल्या. राजाराम महाराज व संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून राजारामंना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा, असे त्यांनी सुचवले. स्वतः येसूबाई रायगड लढायला लागल्या. पण शेवटी रायगड लढने शक्य नाही हे पाहिल्यावर त्यांनी मोगलांच्या छावनीत स्वतःच्या ७-८ वर्षांच्या मुलासह प्रवेश केला. स्वराज्याची शकले होऊ नये म्हणून पोटच्या मुलाचा म्हणजे लहानग्या शाहुराजेंचा अधिकार असताना सुद्धा स्वराजाच्या त्यांना गादीवर न बसवता छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून मराठा साम्राज्यात निस्वार्थीपणाचा संदेश दिला......
#shivajimaharajhistory

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...