विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019

वाकीनखेड्यातील लढाई , औरंगजेब च्या विरोधात मराठे व बेडर एकत्र

वाकीनखेड्यातील लढाई
औरंगजेब च्या विरोधात मराठे व बेडर एकत्र

पोस्त सांभार :
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चरणी तत्पर
संतोष झिपरे निरंतर
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे 9049760888


विजापूरच्या पुर्व दिशेस भीमा आणि कृष्णा नदीच्या मधील प्रदेश हा बेरडाची मातृभूमी...
त्याची मूळ भूमी म्हैसूर व रायचूर परिसर पण राजकीय उलथापालथ झालवर या भागात विसावला... विजापूर शहराच्या पूर्वेस 72मैलवर 150कि.मी वर याची सागर या ठिकाणाहून राजधानी थाटली औरंगजेब बादशहा यांना 1687 मध्ये आदिलशाही जिंकली त्यावेळी सागर पण जिंकली त्यानंतर तेथील 12मैलावर वाकीणखेडा या ठिकाणी आपले नवीन राजधानी तेथील नायकाने थाटली तीसुद्धा औरंगजेबाने जिंकली पुढे शोरापुर हे नवीन राजधानी केंद्र बेडर समाजातील लोकांना केले...
बेडर समाजातील जीवनमान... कानडी आदिवासी वंशातील या लोकांची हिंदू समाजातील धेड जातीत त्या काळात गणना होत होती, मध्यम उंचीचे,काळे बळकट गोल चेहरा, बसके नाक, पातळ ओठ, कुरळे केस, अशी रूपाचे हे लोक होते.. गोमांस, वराहमांस, कोंबडी, व मधपान त्याचा प्रमुख जेवणातील भाग होय.. सदर समाज हे कुटुंब प्रमुख व टोळी प्रमुख च्या नेतृत्व सर्वजण मान देत..टोळी तील नायक न्यायदान करणार हे पद्धती होते अचूक तिरंदाज व बंदुक ची वापर करण्यात मोहर हे बेडर लोक.... धान्याचे काफिल मारणे, लूट करणे गुरढोरे चोरणे हे उपजीविका व्यवसाय याचा...
" पामनायक "बेडर हे 1678पासुन त्याचा नायक झाले त्याचा पुतण्या पेड्डापिडया हा 1683च्या सुमारास अहमदनगर येथे औरंगजेब बादशहास भेटला बादशहाने त्याला मोगल सैन्यात नेमले व हुद्दा दिला पण हे पेड्डापिडया बेडर नायक स्वाभिमानी होते व स्वतंत्र राज्य अस्तित्वात राहणे हे बेडरचा वृत्ती होते रहुल्लाखान यांना रायचूर मोहिमेत हा पीडनायक आपणास उपयोग पडेल म्हणून रहुल्लाखान यांना बरोबर घेतले.. आणि रायचुरचा किल्ला जिंकला त्या वेळी पीडनायक रहुल्लाखान ला म्हणाला की, "तुम्ही परवानगी धाल तर मी मी एक आठवडासाठी माझे राजधानी वाकीणखेड्याला जाऊन येता व माझा सरंजाम सैन्य व युद्ध सामग्री व्यवस्थित करुन येतो.. पीडनायक बेडरच्या गोड बोलण्याने रहुल्लाखान फसला पीडनायक वाकीणखेडाला आले 12/13हजार बंदूकधारी सेना उभारून मोगलाशी सामना करण्यासाठी सिद्ध झाले मराठ्यांच्या शी संगनमत करून तो मोगलांना प्रतिकार करू लागला मराठ्यांच्या कडुन तलवार, बंदूक धान्य पुरवठा करण्यात आले कारण महाराष्ट्र तील औरंगजेब बादशहा याचा शक्ती व लक्ष इतरत्र केंद्रीत झाले पहिजे म्हणून झाले पण असेच छत्रपती संभाजी महाराजांचा योजना प्रमाण जर सगळे दख्खन शक्ती एकवटून औरंगजेब बादशहा च्या विरोधात ऊभी केला पाहिजे हे भूमिका आदिलशाही व निजामशाही यांना एकत्र आघाडी उघडली तर औरंगजेब चा पराभव निश्चित आहे हे समजलेले दोन्ही पातशाही औरंगजेब यांना बुडवले येथे तर मराठे व बेघर दोन्ही हिंदू समाज एकत्र येऊन मोगलांना आहवन देत आहे त येणार कालखंडातील मोगलांना जड जाणार हे निश्चित होते म्हणून पुढे औरंगजेब बादशहा स्वत बेडरच्या प्रदेशात चालून आले यातच मराठे व बेडर समाजचा एकत्र येऊन मोगलांना किती वेळ झुंज दिली असेल हे समजते ....
वाकीणखेड्यातील रणसंग्राम
🚩सरसेनापती धनाजीराव जाधवराव, सरदार हिंदुराव घोरपडे बेडरच्या मदतीस 🚩
🚩सरदार हणमंतराव निबांळकर धारातीर्थी पडला🚩
वाकीणखेडा हे सगर हल्लीचे गुलबर्गा जिल्ह्यात एक खेडे होते .मोगलीना सगरचा किल्लाजिंकल्यावरपामनायकाचे वाकीणखेडा हे डोगंरवरचे ठिकाण आपले मुख्य ठाणे केले. तटबंदी, युद्ध साहित्य त्याने सज्ज केले हे 250फुट उंचीच्या टेकडीवर किल्ला बांधला बेडराचे शिपायाचे पायदळ 3000हे मोगलांना मराठ्यांच्या संगनमताने प्रतिकार करू लागला. वाकीणखेडा किल्लापासुन 12कि.मी. हळसंगीची गढी (बहुतेक हाच चंदनगढी होय जेथे सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा पुत्र राणोजी घोरपडे धारातीर्थी पडला) त्याने घेतली तेथे त्यांनी ठाणे केले वाकीणखेडा जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहा यांना "अयालपन्हा "चिनकुलीचखान बहादूर " यास पाठविला 8फेबुवारी 1705रोजी औरंगजेब बादशहा वाकीणखेड्याता स्वतं आले,बादशाहा किल्लापासुन 10कोसांवर तळ दिला, किल्ल्याच्या दरवाजाचे पायथ्याशी तलवारखेडा नावाचे गाव आहे त्याला तटबंदी होत्या किल्ला तील शिबंदी ला तेथील बाजारातुन अन्नधान्य मिळत असे. त्या खेड्या जवळ गवंताचे छपराचे एक धेडपुरा म्हणून गाव होते तेथे बेडर प्रजा रहात होती येथे किल्लावर रासाद मिळत असे इकडे महाराणी ताराबाई साहेब यांना बेडरच्या मदतसाठी पुढे आल्या पण एक अटी घेतला स्वतं औरंगजेब शी सामना आहे "शक्यतो आहे तेवढे किल्ला लढवा पण जिंकणे शक्य नसेल तर माघार घ्यावी व लोकांचे प्राण वाचवा " मराठे सोबत आहेत यावर पीडनायक तयार झाले, एका कडे औरंगजेब चा लाख पेक्षा जास्त सैन्य तर दुसरीकडे 20एक हजार बेघर जमाती बघा तर पण स्वतंत्र अस्तित्व साठी संघर्ष सुरू आहे कारण बेरड व बेडर हे लोक वृत्तीने बेबंद, बळकट, आणि बलदंड बंदुकची आणि दारूगोळाच्या फेकीतील बहादूर होते .......
विजापुरचा सुभेदार चिनकीलजखान ,अमितखान, तरबियतखान, शहाजाद कामबक्षा यांना किल्ल्याच्या पाव कोसावर तळ देऊन मोर्चा लावले.इकडे सेनापती धनाजीराव जाधवराव, सेनापती संताजीराव घोरपडे याचा भाऊ बहिर्जी ऊर्फ हिदुराव घोरपडे, हणमंतराव निबांळकर हे बेरड व बेडराच्या मदतीसाठी धावून आले किल्ल्याच्या वर बेडर ,तर पायथ्याशी मोगल बादशहा औरंगजेब तर मोगलांच्या पाठीवर मराठे वीर दौडले औरंगजेब बादशहा अतिशय चिडला
मोगल सैनिकांवर बेडरचा मारा सुरु झाले मोगल सैनिक खडकातून पुढे सरकत होते लाल टेकडीवर अटीतटीची झुंज झाली. तलवारखेडची टेकडी शहाजदा कामबक्षा च्या ताब्यात आले. बेडरच्या मदतीस आलेल्या मराठ्यांची काहीकुटुंबे वाकीणखेडाच्या किल्ल्याच्या वर होते याना बाहेर काढून दया असे हिंदुराव घोरपडे यांना नायकशी निरोप दिला बेडराना मोर्चा काढून धनाजीराव जाधवराव व हिदुंराव घोरपडे यांना आपले स्वतं आघाडीवर आले 1/1सैन्या मोगलांना धान्य व वैरण हे रासाद बंद करण्यासाठि ठेवला मोगल सैनिकांवर तटबंदीवरून मारा करून वाकीणखेडा किल्ल्याच्या मागच्या दरवाजातून मराठ्यांच्या स्त्रीस व मुलांना बाहेर काढले हिदुंराव घोरपडे चपळ अशा घोड्यावरून हे मराठ्यांच्या कटुबुं कबिला बाहेर काढले पण येथे मराठ्यांच्या सैन्य चा दोन भाग झाला व याचा फायदा औरंगजेब यांना उचलला....
पाणी, वैरण, धान्य पुरवठा बंद झाला वर औरंगजेब बादशहा अतिशय चिडला एक डोंगरी किल्ला सर होते नाही म्हणून शहाजदा कामबक्षा यास पछाडले टाकले राजपूत सैनिक पुढे केला,पीडनायकाने वेळ काढण्यासाठी आणि अधिक कुमक जमा करण्यासाठी बादशहा कडे शरणागतीचा निरोप पाठवला आपला भाऊ सोमसिंग यास मोगली छावणीत पाठविले आपण किल्ला सोडण्यासाठी तयार आहोत, आपणास टोळी प्रमुख व माझ्या भावाला मनसबदारी दया अशी अट घातली सोमसिंगने मोगली छावणीत मुक्काम केला व एक दिवस अफवा उठविली की माझा भाऊ पिडिया याचे डोके फिरले आहे तो मराठ्यांच्या बरोबरपळून गेला आहे माझ्या भाऊचा पिडियाचा डोके फिरले आहे हे समजल्यावर औरंगजेब यांना सोमंसिग यासछावणीतुन सोडून दिले पिडिया वेडा झालेला नव्हता, किल्ल्याच्या वर त्यांना बहादूर सेनापती व सैन्य जाम केला आणि मोगलवर हल्ले सुरू केले आघाडीवर रजपूत सैन्य बरेच ठार झाले समोर बेडर व पाठीमागे मराठे याच्या विळख्यात औरंगजेब बादशहा अडवून पडेल रंणभूमीवरील पाण्याचा पुरवठा बेडर लोकांना बंद केला तर बाहेरून येणाऱ्या वैरण धान्य धनाजी जाधव व हिदुंराव घोरपडे यांना बंद केला परत मराठ्यांच्या हल्ल्यात रासाद लुटालूट करून मराठ्यांनी बेडरना देणे सुरु केला दलपतरायच्या हत्तीला एकवीसगोळ्या आणि आग्रिबाण लागला पिण्याच्या पाण्याचे विहिरी ताब्यात घेतल्या तलवार खेड्यावर हल्ला करून असंख्य मोगल कापले पण मोगलच्या 2लाख सैन्य समोर माघारी घेणे भाग होते महाराणी ताराबाई साहेब याचा निरोप नंतर बेडर व पीडानायक यांना माघारी घेण्यास सुरुवात केली त्यास मराठ्यांनी त्याला सहाय्य केले. एक रात्री पीडानायक पिडिया आपल्या मुला माणसासहपळून गेला. बेडरांच्या मदतीसाठी गेलला मराठा सरदार "हणमंतराव निबांळकर" धारातीर्थी पडला
मराठ्यांनी बेडर लोकांना औरंगजेब बादशहा हातवर तुरी देऊन पसार झाले. सोबत मराठ्यांनी माघारी घेतला शेवटी मोगलांना या लढाईत विजय मिळवून काही पण फायदे झाले नाही पण मोहीम खर्च प्रचंड प्रमाणात झाले अन्न पाण्याशिवाय मोगलांना प्रचंड हैराण झाले
एक मात्र नक्की आहे बेडर व मराठ्यांच्या इतिहासातील हे शौर्य गाथा समाजसमोर आले पाहिजे म्हणून हे लेख....
सदर वाकीणखेडातील लढाई बददल सोशल नेटवर्किंग माहिती नाही आम्ही प्रथमच हे माहिती सोशल मीडियावर पोस्ट केले आहे

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चरणी तत्पर
संतोष झिपरे निरंतर
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...