विनोद जाधव एक संग्राहक

Monday 22 April 2019

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग १ ]

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग १ ]
मुघल बादशहा आलमगीर औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटून आलेले राजे मुघलांशी सलोख्याचा तह केला आणि सतत मोहिमांमुळे स्वराज्यातील मुलुखाची नासाडी होता होता ती वाचवण्यासाठी मोगलांशी तह करण्याचे योजले .इ.स २६७० पर्यंत मुघल व मराठे यांच्यातील संघर्षाला विश्रांती मिळाली खरी पण लगेच उभयतांमधील तह मोडला आणि पुरंदरच्या तहानुसार मुघलांना दिलेले तेवीस किल्ले परत जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी अजून एक मोहीम आखलेली. विस्तारलेला प्रदश पुन्हा उभा करताना लष्करी ठाणी म्हणजे किल्ले बळकट करणे आवश्यक. ह्यामध्ये महाराजांनी अंदाजपत्रक एका बजेट वर तयार केले ते असे -
जाबिता तह इमारती करणे. सण इसन्ने करणे इमारती करावयाचा तह केला असे की गबाळ हुन्नरबंद लावून पैका पावत नाही, हुन्नरबंद गवगवा करिता काम करीत नाहीत.याबद्दल तह केला की, नेमस्तच इमारत करावी होन १,७५,०००
म।। एक लाख पंचाहत्तरी
हजार होन रास
५०,००० ------------ रायगड
३५,००० दि।।( दिम्मत)घरे
(२०,००० तळी २
१०,००० गच्ची
५,००० ) किल्ले
--------------
३५,०००
१५,००० तट
-------------
५०,०००
------- १०,००० सिंहगड
१०,००० सिंधुदुर्ग
१०,००० विजयदुर्ग
१०,००० सुवर्णदुर्ग
१०,००० प्रतापगड
१०,००० पुरंदर
१०,००० राजगड
५,००० प्रचंडगड
५,००० प्रसिद्धगड
५,००० विशाळगड
५,००० महिपतगड
५,००० सुधागड
५,००० लोहगड
३,००० राजमाची
३,००० कोरीगड
२,००० सरसगड
२,००० महिधरगड
१,००० मनोहरगड
७,००० किरकोळ इतर
___________
१,७५,०००
येणेप्रमाणे एक लाख पंचाहत्तरी हजार होन खर्च करणे.महाराजांनी गडांची डागडुजीसाठी व तिथे नव्याने इमारती उभारणीसाठी वरील तरतूद केली होती. पण त्यानुसार कामे झाली का असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. गडांच्या बळकटीसाठी मोठ्या रकमेची तरतूद करून शिवाजी राजे फक्त इथवरच थांबलेले नाही आहेत , तर त्यांनी पुढचाही विचार केला. मुघलांच्या संभाव्य स्वारीची त्यांना चांगलीच जाणीव झाली होती. आज न उद्या औरंगजेब सर्वशक्तिनिशी उतरणार आणि दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही ह्या दोन शाह्यांबरोबर आपले स्वराज्यही काबीज करण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा त्या आक्रमणाला शह देण्यासाठी आपल्याला याच गडर्गांचा आश्रय करावा लागणार. मुघल सैन्य संख्येने मोठं आहे ते एकाच वेळी अनेक किल्ल्यांना वेढा घालतील तेव्हा बाहेरून येणाऱ्या मदतीवरच किल्ला लढविला जाईल. अश्या आणीबाणीच्या प्रसंगी महालोमहली खजिना करावा आणि त्या धनातून गडाला मदत पाठवावी अशी अतिशय महत्त्वाची तरतूद देखील करून ठेवली आहे महाराजांनी आणि म्हणून दुसरा अंदाजपत्रक ते असे -
जाबिता तह. सन इसन्ने कारणे राजश्री साहेब ( शिवाजी राजे ) तह केला की -
जो आपला मुलुख आहे त्यापैकी महालोमहालीहून खजाना करावयास पैके आणावे. त्याचा खजानाच करून ठेवावा, ज्या वेळीस मुघलांशी लढाई सुरू होईल आणि मोगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरूर आणिकी करून ऐवज जुडेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे. नाही तरी एरव्ही राज्यभागास सर्वही खर्च न करावा.ऐसा साहेब तह केला असे आणि खजाना करावयाची मोईन केली.
होन १,२५,०००
२०,००० कुडाळ
२०,००० राजापूर
२०,००० कोळे
१५,००० दाभोळ
१३,००० पुणे
१०,००० नागोजी गोविंद
५,००० जाऊली
५,००० कल्याण
५,००० भिवंडी
५,००० इंदापूर
२,००० सुपे
५,००० कृष्णाजी भास्कर
--------------
१,२५,०००
स्वराज्यातील गडांच्या बळकटीसाठी पावणेदोन लाख व मुघलांशी झुंज देण्यासाठी केलेली तरतुदीची रक्कम सव्वा लाख असे मिळून तीन लाख होनांच्या तरतुदीचे अंदाजपत्रक मांडणाऱ्या दुर्गपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील गदुर्गांबद्दल किती विश्वास वाटत होता ह्याचा हा सत्यात उतरवलेला आराखडा आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...