विनोद जाधव एक संग्राहक

Monday 22 April 2019

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग २ ]


दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग २ ]
शिवाजी महाराजांच्या अंदाज पत्रकांप्रमाणे भाग १ मध्ये मांडलेल्या गोष्टी घडून आल्या ते इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्डस् मधील Diary Of Thomas Niccolls 1673 , original correspondence letters received from India या नोंदीमधून रायगडाबद्दलचे जे वर्णन कळते त्यावरून महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गदुर्गांची बळकटी झाली असावी असे निश्चित समजावे. गडदुर्गाच्या डागडुजीच्या अंदाजपत्रकातील पावणेदोन लाख होनांच्या निधीपैकी पन्नास हजार होन एकट्या रायगडासाठी खर्च करण्यात आले. थॉमस निकोल्स हा इंग्रजी वकील दि. १९ मे १६७३ रोजी शिवाजीमहाराजांची भेट घेण्यासाठी मुंबईतून रायगडाकडे निघाला. त्याच्या रोजनिशीत म्हणजे नेहमी डायरीत जी नोंदणी होयची त्यात त्याने मुंबई रायगड इथपर्यंत केलेला प्रवास , रायगडावरील त्याचे वास्तव्य, शिवछत्रपतींशी त्यांची झालेली भेट याबद्दल वर्णन आहे. त्या तारीखवर दि २३ मे १६७३ रोजी लिहिलेला मजकूर रायगडाच्या डागडुजीच्या दृष्टीने महत्वाचा तो असा --
" In the morning we went up that steep hill, where in many places there are stair made, and going into the gate the staires are cut out of the firm rough rocks. Where the hill might not be naturally strong, there they build walls of about 24 foot high , and within 40 foot of the first wall there is another such wall, that if the enemy should gain one, they have an other to beat him out, so that if the hill be furnished with provision, a few men may keep it from all the world , and as for water , there are many large tanks cut in the rock , which every rainy season fill with water sufficient and to use for the whole year.On the top of the hill is a large town , though of small built houses, but on the highest peak is Sevagees Lodgings, build quadrangle,with a large house in the middle where he hears business of import. "
थॉमस निकोल्सच्या वर्णनावरून अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तळी, गच्ची ( चुन्याचा कोबा ), किल्ले व तट यांच्या डागडुजीसाठी किंवा नव्या बांधणीसाठी जी ५०,००० होनांची तरतूद केलेली होती, त्यानुसार रायगडाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते असेच म्हणावे लागेल. शिवाय निकोल्सच्या लिखाणाप्रमाणे त्याने जी सामान्य प्रतीची घरे पाहिली ती गडाच्या जिर्णोद्धाराच्या कामासाठी आलेल्या गरीब कामगार मंडळींची घरे ( ज्याला कोकणात आजही पाल असा शब्द वापरतात) होती. यावरून शिवाजी महाराजांच्या आज्ञेअनुसार अंदाजपत्रकात नमूद केलेल्या गडांवर देखील या कालावधीत जिर्णोद्धाराचे काम सुरू होते ही हकीकत आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...