विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 June 2019

|| #अथ_राजव्यवहारकोश: ||

|| #अथ_राजव्यवहारकोश: ||

महाराष्ट्रातील पूर्वीच्या ३०० वर्षे नांदलेल्या राजवटीमुळे फारसी व दक्षिणी उर्दू या दोन्ही भाषांना राजभाषांचे स्वरूप प्राप्त झाले होते. म्हणून राजव्यवहारामध्ये प्राचुर्याने आढळून येणारे फारसी व दख्खनी उर्दूतील शब्द यांच्या ऐवजी संस्कृत पर्याय वापरून राजव्यवहाराचे मराठीकरण करण्याची योजना शिवप्रभूंनी आखली. अशा प्रकारचा एक कोश तयार करण्याचे काम त्यांनी प्रसिध्द मतुसद्दी व प्रशासक रघुनाथ नारायण हणमंते यांजकडे सोपवली. त्याने धुण्डिराज व्यास या विद्वानाच्या सहाय्याने राजकोश सिध्द केला ही घटना इ.स. १६७८ ची असावी.
आजही मराठीत रूढ करण्यात येत असलेले काही शब्द राजव्यवहारकोशात आढळतात हे पाहून मोठी गंमत वाटते. सचिव, मंत्री, सभासद, न्यायाधीश, दुर्ग, कोशागार, शस्त्रगार, चषक, आदाय, सभा, लेखा, आय-व्यय, वेतन, ऋण, प्रतिभू(जमीन), कारागृह, आयपत्र, सहकारी, अनक्रमाणीका, संवाद, गणना - तीनशे वर्षानंतर सुध्दा हा कोश आजही उपयुक्त ठरू पाहत आहे. हे लक्षणीय आहे. या कोशातील एक शब्द मन वेधून घेणारा आहे. राजदरबारातील खलबतखान्याला त्या काळात गुसलखाना म्हणत. आग्र्यातील दिवाण ई खास ला बरेच वर्षे गुसलखाना हेच नाव होते. याला पर्याय रघुनाथ नारायणाने मन्त्रस्थानं असा दिला आहे. आज ३०० वर्षांनी, मुंबईच्या सेक्रेटेरिएटला मंत्रालय हे नाव मिळालेले पाहून, शिवाजी महाराज व रघुनाथ नारायण हणमंते यांच्या आत्म्यास अगदि संतोष झाला असेल.

- सेतुमाधवराव पगडी
१०-०६-८१

संदर्भ :- राजकोश
संपादक :- अ.द. मराठे

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...