विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2019

शहाजीराजे आणि शिवरायांचे ' मुखावलोकन ' . मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेली जेजुरीगडावरील हिच ती 'पितापुत्र भेट.

इ.स. १६६२ सालची घटना. छत्रपती शिवरायांनी जुलमी मोगल सत्तेशी कडवा प्रतिकार करित अल्पकाळातच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. दिवसेंदिवस महाराज मोगलांच्या ताब्यातील एक एक गड सर करीत होते आणि त्या प्रत्येक गडावर शिवशाहीच्या वैभवाचा भगवा राजबिंडा ध्वज दिमाखाने फडकत होता. बघता बघता महाराजांच्या किर्तीने महाराष्ट्राच्या सीमा कधीच पार केल्या होत्या. त्यावेळेस शिवरायांचे वडील शहाजीराजे कर्नाटकमध्ये आदिलशहाच्या सेवेत होते. कार्यवाहूमुळे शहाजीराजांचा बराचसा काळ कर्नाटकातच व्यतीत होत होता. मात्र, त्यांच्याही कानावर पुत्र शिवबांच्या कीर्तीचा डंका निनादत होता. सर्वच कुटुंबियांना एकमेकांच्या भेटिची ओढ लागून राहिली होती. त्यामळे शहाजीराजांनी कुटुंबाच्या भेटिचे मनावर घेऊन बेँगळूर सोडले. मजल दरमजल करीत, तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते आपल्या घोडदळ-पायदळासह पुण्याकडे येत होते. त्यावेळी शिवरायांना पकडण्याच्या हेतुने शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला होता. त्यामुळे शहाजीराजे आणि शिवराय यांची भेट जेजुरीत होणे हिताचे होते.
बय्राच वर्षानंतर मुखावलोकन करायचे झाल्यास ते एखाद्या तीर्थक्षेत्री करावे, असा धार्मिक संकेत असल्यामुळे शिवरायांनीही जेजुरीतच वडिलांची भेट घ्यायचे ठरवले. शहाजीराजे जेजुरीला येताच त्यांनी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले. आज ज्या ठिकाणी ' अडिच पायय्रा ' आहेत, त्या ठिकाणी पितापुत्राने भेट घ्यायचे ठरले. प्रथम एकमेकांकडे न पहाता साजुक तुपाने भरलेल्या काशाच्या परातीत शहाजीराजे व शिवरायांनी पाहिले. आनंदित झालेले परस्परांचे चेहरे दोहांनाहि दिसले. नंतर, शिवरायांनी नम्रपणे आपले मस्तक शहाजीराजांच्या चरणावर टेकवले. पितापुत्राने एकमेकांना कडकडून मिठी मारली. शहाजीराजे व शिवराय यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.. असे झाले
शहाजीराजे आणि शिवरायांचे ' मुखावलोकन ' .
मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेली जेजुरीगडावरील हिच ती 'पितापुत्र भेट.

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...