मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 16 July 2019
५ युद्ध ज्यांनी भारतीय इतिहासाचं चित्र कायमचं बदलून टाकलं
५ युद्ध ज्यांनी भारतीय इतिहासाचं चित्र कायमचं बदलून टाकलं
जर इतिहासात ही 5 युद्ध झाली नसती तर आज भारताचे चित्र कदाचित वेगळे राहिले असते.
इतिहास तर आपण सर्वजन शिकलोय. पण आपण कधी इतिहास जाणून घेतलाय ? आजच्या
भारताचे बीज कुठे रोवले गेले ते जाणून घ्यायचंय ? तुम्हाला माहीत आहे का की
जर इतिहासात ही 5 युद्ध झाली नसती तर आज भारताचे चित्र कदाचित वेगळे
राहिले असते. चला तर जाणून घेवूया कोणत्या 5 युद्धांमुळे सर्व चित्रच बदलून
गेले.
मित्रांनो ! युद्ध तर इतिहासाचा अविभाज्य भाग. आपण इतिहास हा विषय
शिकताना अनेक युद्ध, लढाया याविषयी वाचले आहे, अभ्यासले आहे की कशा प्रकारे
परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून भारतातील साधन संपत्तीची लूट केली
होती आणि कशा प्रकारे आपल्यावर, भारतीयांवर राज्य केले होते. एक नव्हे तर
असंख्य हल्ले, आक्रमणं या भारतभूमीवर झालेली आहेत कारण आपली भारत भूमी
अतिशय समृद्ध, संपन्न होती आणि म्हणूनच भारताला “सोने की चिडिया” असेही
म्हणत असंत.
1) इसवी सन 1192 चे मुहम्मद घोरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण युद्ध
या भारतभूमीवर सर्वाधिक आक्रमणे केली ती तुर्क, अफगाण यांनी. इसवी सन
1191 किंवा त्याही पूर्वी प्रथम आक्रमण केले ते महम्मद गझनीने, हे आपल्याला
माहीत असेलच. महमद गझनीने भारतावर आक्रमणं करून प्रचंड धनसंपत्ती लुटून
नेली पण त्याचा हेतु धनसंपत्ती लुटणे इतकाच मर्यादीत होता पण त्यानंतर
तुर्की आक्रमणकारी महम्मद घुरीने जे आक्रमण केले त्यामुळे भारतीय संस्कृती,
भारतीय भूमी, भारतीय लोकसंख्या इत्यादींवर दूरगामी परिणाम केले.
वास्तविक पाहता मुहम्मद घुरीचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता, कारण
पहिल्यावेळी म्हणजे अंदाजे 1191 साली झालेल्या युद्धात पराक्रमी राजा
पृथ्वीराज चव्हाण याने मुहम्मद घुरीचा पराभव केला होता पण घुरीने हार मानली
नाही तो पुढल्या वेळेस अजून जास्त ताकदीने परतला व या युद्धात त्याने
पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत केले.
पृथ्वीराज चव्हाण हा शेवटचा दिल्लीच्या गादीवर बसणारा भारतीय राजा कारण
यानंतर परकीय आक्रमकच दिल्लीचे शासनकर्ते झाले. भारतातच भारतीयांना शेकडो
वर्ष गुलामीत जगावे लागले आणि ज्याची सुरवात 1192 च्या महम्मद गझनी व
पृथ्वीराज चव्हाण यांचा युद्धानंतर झाली होती आणि म्हणूनच इतिहासातील 5
निर्णायक युद्धांमध्ये आपण सर्वात आधी या युद्धविषयी चर्चा केली ती म्हणजे.
2) पानिपतचे प्रथम युद्ध, इसवी सन 1526
पानिपतचे अफगाण व मराठा यांच्यातील युद्ध सगळ्यांना माहित आहे पण ते
पानिपतचे तिसरे युद्ध मित्रांनो ! पण पानिपतचे प्रथम युद्ध भारतीय
इतिहासातील अत्यंत महत्वाचे व क्लेशदायी परिणाम देणारे ठरले. हे युद्ध
अतिशय महत्वपूर्ण म्हणावे लागेल कारण मुघल साम्राज्याचा दिल्लीवरील शासनाची
सुरुवात म्हणजे पानिपतचे पहिले युद्ध इब्राहीम लोधी विरुद्ध बाबर.
मित्रांनो इब्राहीम लोद्धी म्हणजे कोण तर दिल्ली सलतनातचा शेवटचा
सुलतान. मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर ज्यांनी दिल्लीची गादी सांभाळली
त्यातील हा शेवटचा सुलतान ठरला कारण यानंतर सुरवात होणार होती मुघल
साम्राज्याची. बाबरची नजर भारतावर, दिल्लीवर पडली याचे कारण असे की त्याला
मेवाडचा राजा राणा सांगा यांनी इब्राहीम लोधी विरुद्ध युद्धासाठी निमंत्रित
केले. का केले राणा सांगा ने असे ?
राणा सांगा यांना दिल्लीच्या तख्तावर बसायचे होते आणि त्यासाठी इब्राहीम
लोधी हा अडथळा होता आणि म्हणूनच हा अडथळा दूर करून दिल्ली काबिज करण्याचे
राणा सांगानी योजले होते. बाबरशी युद्ध केल्यामुळे इब्राहीम लोधी कमजोर
होईल व आपण सहज लोधीचा पराभव करून दिल्ली हस्तगत करू असे राणा सांगाला
वाटले पण झाले भलतेच. बाबर स्वतःच दिल्लीच्या प्रेमात पडला. राणा सांगाचा
डाव त्यांचावरच उलटला होता. बघूया पुढे काय झाले.
इसवी सन 1526 ला इब्राहीम लोधीचा पराभव केल्यानंतर लगेचच पुढील वर्षी
म्हणजे इसवी सन 1527 ला बाबरने खातुलीच्या लढाईत आपल्या मार्गातील शेवटचा
अडथळा असणार्या राणा सांगाचा पराभव केला व दिल्लीची गादी काबीज केली.
मित्रांनो इथून पुढे म्हणजे पुढील 300 वर्ष ज्या मुघलांचे राज्य भारतावर
होते, दिल्लीवर होते याची सुरवात राणा सांगाच्या पराभवाने झाली होती.
कोण होता बाबर ?
बाबरचा पिता तुर्कवंशीय म्हणजेच तैमुरचा पाचवा वंशज. तैमुर हा आपल्या
क्रूर व निर्दयी स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहे (खरेतर कुप्रसिद्ध आहे) आणि
बाबरची आई होती मंगोल वंशीय म्हणजेच चंगेज खान या क्रूर व निर्दयी
सेनापतीच्या चौदाव्या वंशातील. चंगेज खान हा सुद्धा अत्यंत क्रूर व निर्दयी
म्हणून प्रसिद्ध. अशा या क्रूर व निर्दयी वंशांच्या मिश्रणातून तयार झाला
मुघल वंश आणि त्याच वंशाचा पहिला बादशाहा होता बाबर. याच मुघल वंशाने
भारतीय लोकसंख्येची एकूण रूपरेषाच बदलली ज्याची परिणीती 1947 च्या
भारताच्या फाळणीत झाली. कारण पाकिस्तान भारतापासून वेगळे झाले ते धर्माच्या
आधारावर ज्याची सुरवात 1526 लाच झाली होती. पाहिलंत ना इतिहासाची परिणीती
भविष्य व वर्तमानकाळात कशी होते आणि इतिहासातील घटनांचे भविष्यात काय
परिणाम होतात.
3) प्लासीची लढाई, इसवी सन 1757
‘व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते झाले’, ज्या ब्रिटिश शासनाबद्दल आपण
असे म्हणतो त्या ब्रिटीशांच्या शासनाची सुरवात म्हणजे प्लासीची लढाई, जी
झाली बंगालचा नवाब सिराज उद्धोला व इंग्रज यांचा दरम्यान. 23 जून 1757 साली
प्लासी इथे झालेली लढाई म्हणूनच निर्णायक ठरते. या लढाईचे निमित्त होते
इंग्रजांचा आगाऊपणा अर्थात जाणूनबुजून केलेली कृती आणि हे आज आपल्या लक्षात
येत आहे.
इंग्रजांनी नवाब उधौलाच्या परवानगी शिवाय त्याच्या राज्यात एका
किल्ल्याचे बांधकाम केले व त्याचे नाव फोर्ट विलियम्स असे ठेवले. नवाब
यामुळे संतापला कारण इंग्रजांनी त्याची परवानगी न घेता हे बांधकाम केले
होते. नवाबने तो किल्ला ताब्यात घेतला व इंग्रजांना तेथून हुसकावले. पण
इंग्रजांना त्या परिस्थितीत मदत मिळाली मद्रास प्रोविंसच्या ब्रिटिश कमांडर
क्लाइव्हची. तो तातडीने धावून आला. इंग्रज कोणतेही युद्ध व लढाई बळाचा कमी
पण बुद्धीचा जास्त वापर करून जिंकतात व इतिहासातील कित्येक घटना त्याची
साक्ष देतात. इथेही तसेच झाले, कमांडर रोबर्ट क्लाइव्हने नवाबचा सैन्याचा
सेनापती मिर जाफर, नवाबचा दिवाण राय दुर्लभ व सेना अधिकारी यार लतीफ यांना
पैसा व पद यांचे आमिष दाखवून नवाब सिराज उद्धोला याच्यापासून तोडले.
ऐन युद्धाच्यावेळी हे तिघेही आपापले सैन्य घेवून युद्धातून निघून गेले
आणि 50 हजार सैन्यबळ असून देखील नवाबाचा पराभव 20 हजार सैन्यबळ असलेल्या
इंग्रजांनी केला आणि येथूनच सुरुवात झाली ब्रिटीशांच्या विशालकाय
साम्राज्याची. ईस्ट इंडिया कंपनी या नावाने व्यापार करायला आलेले ब्रिटिश
भारताचे शासनकर्ते बनले होते ज्याची सुरुवात याच लढाईत झाली जी प्लासीची
लढाई या नावाने प्रसिद्ध आहे.
4) इसवी सन 1761 चे युद्ध अर्थात पानिपत चे 3रे युद्ध
“एकी हेच बळ” आणि याच बळाचा अभाव भारतीयांमध्ये आहे याचा प्रत्यय
इतिहासातील अनेक घटनांनी व लढायांनी आपणास वेळोवेळी दिला आहे आणि पानिपतचे
तिसरे युद्धही याला अपवाद नव्हते. हे युद्ध झाले पानिपत येथे जे आज हरियाणा
राज्यात आहे. आपल्या राज्यापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या पानिपतच्या
या युद्धात मराठे अहमदशाह अब्दाली विरुद्ध एकटे लढले. त्यांना ना जाटांची
मदत मिळाली ना शीख व राजपूतांची. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.
मराठ्यांचे मोठे नुकसान झाले, कित्येक सैनिक मारले गेले.
हे युद्ध मराठ्यांसाठी मोठा धक्का होते ज्यातून सावरणे शेवटपर्यंत शक्य
झाले नाही व इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. हे 1818
सालचे युद्ध ब्रिटिश व मराठे यांच्या दरम्यान झाले. हे तिसरे अँग्लो-मराठा
युद्ध होते ज्यात मराठेशाहीचा संपूर्ण पराभव झाला.
5) 1764 चे बक्सार युद्ध
इंग्रज हळूहळू आपल्या साम्राज्याचा विस्तार करू लागले. 1764 साली झालेले
बक्सार येथील युद्ध म्हणजे भारतीय राजा व भारतीय राज्यकर्त्यांनी
इंग्रजांना हुसकवण्याचा केलेला शेवटचा प्रयत्न होता. हे युद्ध झाले मुघल
बादशाह शाह आलम, बंगालचा पदच्युत नवाब मिर कासिम व अवधचा नवाब शुजाउद्दीन
विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये. शाह आल, मिर कासिम व शुजाउद्दीन हे एका
बाजूने तर दुसर्या बाजूने होते इंग्रज. पण यावेळी मात्र इंग्रजांनी
कूटनीतीचा वापर न करता आपले युद्ध कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर
करून हे युद्ध जिंकले.
किती नुकसान, किती हानी झाली भारताची जरा विचार करा. म्हणजे परकीय
शासकांचे हे चक्र 1192 साली सुरू झाले जे 1947 ला संपले. या कालखंडा
दरम्यान भारतीय कला, संस्कृती, धर्म, धन, संपत्ती व भारत भूमी या सर्वांचे
झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे आणि आजही चीन, पाकिस्तान ह्या व
अश्या अनेक परकीयांचा डोळा आपल्या भूमीवर आहेच.
No comments:
Post a Comment