विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 16 July 2019

“गडांचा गड रायगड”, वाचा श्रीमान रायगडाच्या जन्माची अनोखी कहाणी

“गडांचा गड रायगड”, वाचा श्रीमान रायगडाच्या जन्माची अनोखी कहाणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविले आणि रयतेला स्वतःचे राज्य मिळाले. शिवरायांनी हे स्वराज्य आणि स्वराज्याचे सुराज्य घडविण्यासाठी अतोनात कष्ट घेतले, अनेकदा जीवाची पर्वा न करता शिवरायांनी मोहीम फत्ते केली आहे. शिवरायांच्या या संघर्षात अनेक सरदार, मावळे व परिवाराने साथ दिली परंतु या सगळ्यासोबतच एक मान्य करावे लागेल कि या सगळ्या संघर्षात सर्वात मोठा वाटा होता तो गडकिल्ल्यांचा. गडकिल्ले हेच स्वराज्याचे, शिवरायांचे, रयतेचे खरे वैभव होते आणि आहे. या गडकिल्ल्यांवरूनच अनेक मोहिमा सुरु झाल्या, अनेकवेळा जखमी सैन्याला आसरा या किल्ल्यांची दिला आणि स्वराज्याचा कारभार सुरळीत होण्यासाठी या गडकिल्ल्यांचे देखील मोठे योगदान आहे.
स्वराज्यातील सगळेच किल्ले अतिशय महत्वाचे आहेत परंतु, या सगळ्याहूनही एक किल्ला प्रत्येक माणसाच्या मनामनात घर करून आहे, या किल्ल्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे आणि प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी जाऊन अवश्य पाहावा असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव आहे किल्ले रायगड! आज आपण याच रायगडाची थोडक्यात कहाणी पाहणार आहोत आणि रायगड कसा स्वराज्यातुन पारतंत्र्यात गेला याचा आढावा घेणार आहोत.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
raigad fort information in marathi, रायगडाचे महत्व (Source – Hindustan Times)

काय आहे रायगड ?

रायगडाला गडांचा गड असे संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये रायरी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि तेव्हापासून रायरी ला रायगड असे म्हंटले जाऊ लागले. युरोपातील लोक रायरीला जिब्राल्टर असे म्हणत असत. रायगडाचे भौगोलिक महत्व ओळखूनच शिवरायांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. रायगड हा किल्ल्यांच्या गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात महाड गावापासून साधारण २४ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांत अभिमानाने उभा आहे.
गडावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाडचा वाडा खास जिजाऊंसाठी बांधला होता. यासोबतच खूबलढा बुरुज, चित्तदरवाजा (ज्याचे सध्या फक्त अवशेष उरले आहेत.), नाना दरवाजा(लहान दरवाजा), मदार मोर्चा, धान्यांचे कोठार, तोफा, मदनशाह साधूचे थडगे, महादरवाजा, अनेक भक्कम बुरुज, नगारखाना, कचेऱ्या, जगदीश्वराचे देऊळ, टकमक टोक, हिरकणीचा बुरुज, कुशावर्त तलाव आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजेच शिवरायांची समाधी देखील गडावर आहे.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
raigad fort images, shivaji maharaj samadhi, स्वराज्याची राजधानी रायगड (Source – Rediff.com)

रायगडाचे ऐतिहासिक महत्व

रायगडाचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे. स्वराज्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा रायगड साक्षीदार राहिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला दिवाळी पेक्षा मोठा असणारा सण म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक होय आणि, हा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी याच रायगडावर झाला. याच रायगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज छत्रपती म्हणून विराजमान झाले. ४ फेब्रुवारी १६७५ मध्ये संभाजीराजांची व ७ मार्च १६८० रोजी राजाराम राजांची मुंज याच रायगडावर झाली. जसा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे राज्याभिषेक रायगडावर झाला तसाच महाराष्ट्राला पोरका करून आपला लाडका राजा याच रायगडावरून शेवटचा श्वास घेऊन अनंतात विलीन झाला.

रायगडावरील परकीय आक्रमणे व इंग्रजांची मालकी

रायगड हे स्वराज्याचं सोनं ! परंतु शिवरायांच्या व शंभूराजांच्या मृत्यूनंतर जे वैभव टिकवणे मराठ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा शक्य झाले नाही आणि याला कारण सुद्धा आपलेच काही फितूर मराठा सरदार आहेत. साधारण १६८४ मध्ये औरंगझेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला सैन्यासहित पाठविले आणि शहाबुद्दीन खान ने रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाला आग लावून पळ काढला. यानंतर औरंगझेबाने झुल्फिकारखान याला रायगडावर पाठविले आणि त्याने रायगडाला वेढा घातला आणि याच वेढ्यात राजाराम महाराज निसटले आणि पुढे बरेच महिने (सुमारे८) हा वेढा चालू ठेवूनही रायगड मात्र झुल्फीकारखानाला जिंकता आला नाही.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
rajgad fort history (Source – Rediff.com)
जे काम इतके सैन्य आणि इतका दीर्घ वेढा करू शकला नाही ते काम मात्र सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीने केले आणि रायगड १६८९ मध्ये अखेर झुल्फीकारखानाने आपल्या ताब्यात घेतला आणि औरंगझेबाने रायगडाचे नाव इस्लामगड असे ठेवले. पुढे शाहूराजांच्या काळात १७३३ मध्ये रायगड पुन्हा स्वराज्यात आला. अनेक वेळा पारतंत्र्य व पुन्हा स्वराज्य असा प्रवास केलेल्या रायगडावर सध्या बिकट परिस्थिती ओढविली होती. पेशव्यांच्या काळात रायगडाकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही आणि स्वराज्याचे शेवटचे पेशवा, बाजीराव दुसरे आणि नाना फडणवीस यांच्या काळात हा रायगड शेवटी कायमचा पारतंत्र्यात गेला.
स्वराज्याचे शेवटचे पेशवा बाजीराव दुसरे यांना इंग्रजांनी बरेच वेठीस धरले होते. या इंग्रजांच्या मगरमिठीतून सुटणे बाजीरावांना जड जात होते. बाजीरावांच्या छोट्या-मोठ्या हालचालींवर इंग्रज नजर ठेऊन होते आणि यासाठी त्यांनी एल्फिन्स्टन या अधिकाऱ्याला नेमले. त्रिंबकजी डेंगळे हे देखील इंग्रजांचे मोठे शत्रू आणि त्यांचे बाजीरावांशी संधान असावे अशी घनदाट शंका या एल्फिन्स्टन नावाच्या अधिकाऱ्याला होती. इंग्रजांशी लढण्यासाठी बाजीरावांनी सिंहगड, पुरंदर तसेच रायगड अशा अनेक किल्ल्यांवर बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आणि सैन्यही बरेचसे तैनात केले.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
importance of raigad (Source – tarunguptaiitian.wordpress.com)
या साऱ्या गोष्टीवरून एल्फिन्स्टनची शंका अजूनच वाढली आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना सारी हकीकत सांगितली आणि सुमारे १८१७ मध्ये इंग्रजांनी बाजीरावांना पत्राने कळविले कि येत्या एका महिन्यात तुम्ही त्रिंबकजींना आमच्या हवाली करा आणि तुम्ही आमच्याविरुद्ध बंड करीत नाहीत याचा पुरावा म्हणून रायगड, पुरंदर आणि सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात करावा. असे न झाल्यास इंग्रज पुण्यात नासधूस करतील अशी धमकी देण्यात आली.
अशा पत्राने बाजीरावांपुढचे सगळे रस्ते बंद झाले होते. ठरल्याप्रमाणे हे किल्ले बाजीरावाने इंग्रजांच्या ताब्यात दिले आणि काही कालांतराने पुन्हा इंग्रजांनी हे किल्ले बाजीरावांच्या स्वाधीन केले. हे किल्ले परत आल्यावर बाजीरावाने पुन्हा आपल्या अनेक सरदारांना काही सैन्य एकत्र करून रायगडावर तैनात करण्यास सांगितले. अनेक महत्वाच्या गोष्टी, रसद व पैसे रायगडावर पोहोचत होत्या. या सगळ्या छुप्या हालचालींचा अर्थ इंग्रजांना समजत होता, त्यांनी ताबडतोब मराठ्यांचे लोहगड, विसापूर आणि काही मोक्याचे किल्ले ताब्यात घेतले आणि मराठ्यांच्या अनेक महत्वाच्या चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या ज्यामुळे मराठ्यांच्या हालचाली मंदावल्या.
रायगड इंग्रजांच्या ताब्यात येण्याच्या घटनेतील एक महत्वाचे पात्र म्हणजे लेफ्टनंट कर्नल प्रॉथर होते. या प्रॉथर साहेबांनी कोकणातील मराठ्यांचे सगळे महत्वाचे व मजबूत किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचा जणू विडाच घेतला होता. या प्रॉथर च्या नेतृत्वाखाली इंग्रजी सैन्यांनी मराठ्यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले सोबतच माणगाव वगैरे भागातही अनेक किल्ले इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले आणि हि सगळी फौज आता रायगडाकडे आगेकूच करीत होती.
या सगळ्या हालचालींची कल्पना बाजीरावांना आली होती.
बाजीराव रायगडाचे अनन्यसाधारण महत्व ओळखून होते म्हणूनच रायगडावर मराठा फौज तैनात होत्या आणि लढाई झालीच तर पुरवी इतकी रसद व शस्त्रसाठा देखील उपलब्ध होता. मराठ्यांचे अनेक मित्रसैन्य तसेच काही अरबी सैन्य देखील रायगडावर तैनात होते. मुंबईहून अनेक इंग्रजी फौजा कर्नल प्रॉथर यांना येऊन मिळत होत्या आणि इतके विशाल सैन्य रायगडाकडे आगेकूच करीत होते आणि रायगडाच्या आजूबाजूचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी आपल्या अधिपत्याखाली घेतला होता त्यामुळे हि लढत इंग्रजांना सोपी आणि मराठ्यांना कठीण जाणार होती. मराठ्यांविरुद्ध इंग्रजांच्या फौजेची एक तुकडी घेऊन मेजर हॉल रायगडाच्या पायथ्याशी आले होते आणि जसे त्यांच्या कानी आले कि रायगडाचे काही सैन्य गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी तैनात आहे तसे लगेचच हॉल यांनी पाचाड वर हल्ला केला आणि यात काही मराठे धारातीर्थी पडले.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
Attack on raigad (Source – GoUNESCO)
या हल्ल्यानंतर इंग्रजांनी खऱ्या अर्थाने २४ एप्रिल १८१८ रोजी रायगडाचा पायथा आपल्या ताब्यात घेतला आणि विजयाची पहिली पायरी चढली असे म्हणावे लागेल. थोड्याच दिवसात कर्नल प्रॉथर आपले सैन्य घेऊन महाडला आले व महाड आपल्या ताब्यात घेतले. मराठे व इंग्रज यांच्या सैन्याचे मोर्चे समोरासमोर होते.
रायगडाचा पायथा फिरंगी फौजांनी घेरलं होता आणि त्यांच्या मदतीला मुंबईकडून अजून सैन्य पाठविण्यात आले आणि एप्रिल संपताच हॉल यांनी आपल्या मोर्च्यातून मराठ्यांच्या मोर्च्यावर हल्ले करून ते उध्वस्त केले आणि मग रायगडाच्या बाकी बाजूनेही आपल्या तोफा तैनात केल्या आणि मारा सुरु केला. मराठ्यांच्या मदतीला प्रतापगडावरून मराठे सैन्य येतच होते पण इंग्रजांच्या सैन्यांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना पराभूत केले व मराठ्यांची हि मदत रायगडावर पोहोचणे अशक्य केले.
इंग्रज व मराठे हे रायगडासाठी युद्ध चालूच होते आणि ६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी एका मोठ्या तोफेने गडावर मारा केला आणि या तोफेच्या गोळ्यामुळे रायगडावरील एका वाड्याला आग लागली. इतके होऊनही इंग्रजांनी तोफांचा मारा सुरूच ठेवला, तब्बल २/३ दिवस हा तोफांचा मारा सुरु होता आणि रायगड हळूहळू आगीच्या विळख्यात येत होता. शेवटी रायगडावरील अरब शिबंदीवरील अरब अधिकारी शेख अबू स्वतः इंग्रजांशी तह करण्यासाठी गडउतार झाला. तहासाठी अधिकारी येत आहे हे माहित असूनही इंग्रजांनी तोफांचा मारा गडावर सुरूच ठेवला.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
raigad fort images, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला (Source – TOI)
अखेर रायगडावरील सैन्याने इंग्रजांच्या सैन्यापुढे शरणागती पत्करली आणि तह करण्याचे ठरविले. तहानुसार इंग्रजांनी मराठी सैनिकांना आपली शस्त्रे व खासगी मालमत्ता सोबत घेऊन जाण्याची, जखमी सैनिकांना पुण्याला राहण्याची, किल्लेदार शेख अबू व काही साथीदारांना पुण्यात राहण्याची परवानगी दिली. हा तह पूर्णत्वास गेला आणि १० मे १८१८ रोजी कर्नल प्रॉथर शेवटी रायगडावर गेला. रायगड ताब्यात घेतल्यावर इंग्रजांना तेव्हा गडावर सुमारे ५ लाख रोख रक्कम सापडली.
रायगडाची अवस्था अतिशय डळमळीत झाली होती. अनेक राण्यांचे, मंत्र्यांचे वाडे अग्नीच्या स्वाधीन झाले होते, गडावरील मंदिरे, रस्ते, बाजारपेठ आणि इतकेच नव्हे तर ज्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, भोंसले परिवाराची अनेक मंगल कार्ये झाली, शिवरायांनी अखेर चा श्वास घेतला त्याच रायगडावर असलेला छत्रपती शिवरायांचा राजवाडा देखील आगीत जाळून खाक झाला होता. डोळे दिपवणारा रायगड तेव्हा इतका उध्वस्त झाला होता कि रायगडाला पाहून डोळे पाणावत होते, पाहावे तिकडे जाळून खाक झालेले अवशेष द्रिष्टीस पडत होते.

raigad fort information in marathi, raigad fort images, rajgad fort, rajgad fort history, shivaji maharaj, sambhaji maharaj, shahu maharaj, aurangjeb, bajirao peshwa, siddi johar, importance of raigad, रायगडाचे महत्व, स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रायगडाचा इतिहास, राहुरी किल्ला, इस्लामगड, औरंगजेब, सिद्दी जोहर, बाजीराव पेशवे, रायगडाचे महत्व
Remains of Raigad (Source – TripAdvisor)
तर मंडळी हि होती दर्दनाक कहाणी आपल्या स्वराज्याचे वैभव असणाऱ्या रायगडाची. शिवरायांनीं स्वराज्य घडविले आणि जाताना आपल्यावर स्वराज्य आणि सुराज्य टिकविण्याची मोठी जबाबदारी सोपवून गेले, यात मराठ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु मराठ्यांच्या शेवटच्या सत्ताधाऱ्यांना स्वराज्याचे वैभव टिकविता आले नाही हि शोकांतिका आहे.
वर्तमान परिस्थिती देखील काही नवीन नाही, हे बेचिराख झालेले वैभव आपण अजूनही आहे त्याच अवस्थेत (उलट जास्त बेकार) ठेवले आहेत. ना शासनाला आणि ना पर्यटकांना या ऐतिहासिक स्थानांचे महत्व !… तरीही काही हौशी मंडळी विविध संस्था स्थापन करून, पैसे गोळा करून या वैभवांची डागडुजी जमेल तशी करीत आहेत. अशा शिवप्रेमींना महाराष्ट्राकडून एक सलाम.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...