विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 16

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 16
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------1


| सवाई माधवराव पेशवे हे . . १७९५ सालीं मृत्यु पावल्या नंतर पुणे येथील पेशव्यांच्या गादीविषयीं तंटा उत्पन्न झाला. नाना फडनवीस, तुकोजी होळकर, बाळोबा तात्या, परशुराम भाऊ पटवर्धन वगैरे मंडळीने राघोबादादांचे पुत्र बाजीराव ह्यांस गादी मिळू देण्याचा निश्चय करून, सातारच्या छत्रपतीकडून असे आज्ञापत्र हे अस्सल आज्ञापत्र येणेप्रमाणे आहे:-‘स्वस्तिश्री राज्याभिषेक शके १९. . १२१ राक्षसनाम संवत्सरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री बाळाजी जनार्दन यांस आज्ञा केली ऐसीजेःमाधवराव पंडित प्रधान यांस अकाली कैलासवास प्राप्त झाला; पोटीं पुत्र नाहीं; पेशवाईचे पदाचा कारभार चालोन बंदोबस्त जाहला पाहिजे. त्यास त्यांचे वंशांतील रघुनाथ बाजीराव यांचे पुत्र आहेत, त्यांतील पंतप्रधान यांची स्त्री यशोदाबाई यांस पुत्र देऊन पदाधिकारी करावे; तर पेशजी रघुनाथराव यांजपासोन अनन्वित गोष्ट घडली. त्या वेळचे मुत्सद्दी सरदार यांचा पूर्ण द्वेष स्मरोन राज्यांत बखेडा पडेल शास्त्रविरुध पडते. पेशजी कै० बाळाजी बाजीराव यांणीं स्वामिसेवा एकनिष्ठपणे केली. एतदर्थी त्यांचे वंशाचे नांव पुढे चालावे याकरितां पंतप्रधान यांचे स्त्रीस दत्त पुत्र देऊन, पदास अधिकारी करून, कारभाराचा बंदोबस्त जाहला पाहिजे. हे जाणून हे आज्ञापत्र तुह्मांस सादर केले असे. तरी त्यांचे गोत्रजांतील दत्तपुत्र यशोदाबाई यांस देऊन, कारभारचा बंदोबस्त तुह्मीं करून, हुजूर विनंति करणे, जाणिजे. . २९. जमादिलोवल सु॥ तिसैन मया आलफ " ( मोर्तब ). २६ आणविलें कीं, कै० सवाई माधवराव ह्यांच्या पत्नी यशोदाबाई ह्यांचे मांडीवर दत्तक पुत्र देऊन त्यास पेशवाईचा अधिकार द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी चिमाजीआप्पास यशोदाबाईचे मांडीवर दत्तक देऊन त्यास गादीवर बसविलें. इकडे बाजीराव ह्यांनीं, दौलतराव शिंदे हे सामर्थ्यवान् प्रबल असल्यामुळे, त्यांस चार लक्ष रुपयांचा प्रांत सैन्याचा खर्च देण्याचे मान्य करून, त्यांचे मार्फत स्वतःस गादी मिळविण्याचा प्रयत्न चालविला. ही बातमी नाना फडनविसांस समजतांच, त्यांनीं, शिंद्यांच्या लष्करी सामर्थ्यामुळे बाजीरावांस गादी मिळेल आपले वर्चस्व कमी होईल, अशी भीति बाळगून, बाजीरावाकडे सूत्र लाविले; आपण होऊन त्यास प्रतिबंधांतून मुक्त करून गादीवर बसविण्याचा निश्चय केला. इकडे शिंद्यांचे दिवाण बाळोबा तात्या ह्यांस हा नानांचा आपमतलवाचा विचार आवडून | त्यांनी त्यांचा निषेध केला; तो सिद्धीस जाऊ देण्याचा प्रयत्न चालविला.


बाजीराव ह्यांचा स्वभाव निश्चल एकमार्गी नसल्यामुळे त्यांनी, ज्यांच्या हातून आपले कार्य सिद्धीस जाईल असे वाटे, त्यांचे आर्जव करण्याचा त्यांस अनुकूल करून घेण्याचा क्रम आरंभिला. नाना फडनविसांनी आपली सरशी ज्या बाजूने होईल तो मार्ग स्वीकारला. त्यामुळे उभयतांस स्वतःच्या कार्यसिद्धीकरितां दौलतराव शिंद्यांच्या मदतीची अपेक्षा करणे भाग पडले. त्याप्रमाणे उभयतांनीं दौलतराव शिंद्यांस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या कामीं त्यांस साहाय्य कारण्यास जी व्यक्ति पुढे आली, ती सर्जेराव घाटगे ही होय. नाना बाजीराव ह्यांनी सर्जेरावाचा उपयोग करून आपले इष्ट कार्य तडीस नेले

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...