मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 15
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाई शिंदे
ह्यांचा कुलवृत्तांत----------------------5
सखारामराव घाटगे ह्यांच्या स्थित्यंतराचे
व त्या वेळच्या
देशस्थितीचे चित्र लक्ष्यात घेतले,
तर बायजाबाईचे बाळपण
राजवाड्यांतील राजलक्ष्मीचे बहुविध विलास उपभोगण्यांत
गेले असावे, असे
मानितां येत नाही.
अनेक वेळां प्राप्त
झालेलीं राजकीय संकटे, सदासर्वदां
अनुभवलेले घोड्यावरील प्रवासाचे कष्ट,
आणि प्रसंगविशेषीं प्राप्त
होणारे शिलेदारी पेशाचे सुखपर्यवसायी
दुःख, अशा प्रकारच्या
परिस्थितीमुळे मराठे सरदारांच्या मुलांवर
जे संस्कार होणे
साहजिक आहेत, ते बायजाबाई
व त्यांचे बंधु
ह्यांच्यावर झाले होते,
असे ह्मणण्यास कोणताच
प्रत्यवाय नाहीं. हीं मुले
अशा प्रकारच्या परिस्थितींत
वाढल्यामुळे सुदृढ, सशक्त, धाडशी,
व घोड्यावर बसण्यांत
पटाईत अशीं निपजलीं
होतीं. बायजाबाई ही अगोदरच
रूपसंपन्न असून, तिच्यामध्ये हे
वरील गुण वास
करीत असल्यामुळे तिची
कीर्ति महाराष्ट्रांतील थोर थोर
सरदारांमध्ये पसरली; व दौलतराव
शिंद्यांसारखे तरुण व
रंगेल सरदार तिच्या
सौंदर्यावर लोलुप होऊन तिला
वरण्यास उत्सुक झाले. बायजाबाई
शिंदे ह्यांस कित्येक
इतिहासकारांनीं 'दक्षिणची सौंदर्यलतिका' ( Beauty of the Deccan ) अशी संज्ञा
दिली आहे. ती
अगदी यथार्थ आहे.
राजस्थानांतील कृष्णाकुमारी इत्यादि लोकप्रसिद्ध लावण्यवतींच्या
लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठीं
राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले,
त्याप्रमाणे बायजाबाई ह्यांचे लग्न
हे देखील महाराष्ट्रांतील
एक राजकारस्थान घडवून
आणण्यास कारणीभूत झाले.
No comments:
Post a Comment