विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 30

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 30
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------6
‘ह्यानंतर पुढे जो शोककारक देखावा दृष्टीस पडला, त्याचे बरोबर वर्णन माझ्याने देववत नाहीं. स्त्रियांचे आक्रंदन व पुरुषांचे शोकस्वर ह्यांच्या योगाने राजवाड्यांत जिकडे तिकडे जो आक्रोश व जो गोंधळ उडाला, तो वर्णन करणे अशक्य आहे !
२० तारखेच्या खलित्यांतील शेवटच्या कलमांत कळविल्याप्रमाणे, मी महाराजांच्या प्रेताची पुढील तयारी होई तोंपर्यंत, राजवाड्यांत राहण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणे हिंदुराव व तेथे हजर असलेले दरबारचे प्रमुख लोक ह्यांनीही मला विनंति केली. राजवाड्यामध्ये जिकडे तिकडे दुःखाचा देखावा दृष्टीस पडत होता; तथापि त्यांतल्या समाधानाची गोष्ट एवढीच कीं, सती जाण्याची तयारी कोठे आढळून आली नाही. ज्या वेळी एखादी स्त्री आपल्या प्राणपतीबरोबर सती जाण्याचा विचार करित्ये, त्या वेळी तिच्या दुःखास एक प्रकारचे गंभीर |आणि उदात्त स्वरूप येत असते. मग ती त्या वेळीं नेत्रांतून दुःखाश्रू ढाळीत नाहीं, किंवा मोठ्यामोठ्याने धाय मोकलून रडत नाहीं. मग । ती आपला तोंडावरचा पदर एकीकडे सारून सर्व लोकांपुढे येते व आपला निश्चय व्यक्त करते. अशा प्रकारचे चिन्ह मला बिलकूल दिसत | नव्हतं. ह्मणून, जेव्हां बायजाबाई महाराजांबरोबर सहगमन करणार अशी बातमी माझ्या कानावर आली, तेव्हा त्यांचा प्रतिबंध करण्यास फार कठीण जाणार नाही अशी मला खात्री वाटत होती. ह्या कारणा- ४७ स्तव मला बाईसाहेबांजवळ नेण्यांत आले. त्या वेळी त्यांची व माझी भेट फक्त एका पातळ पडद्याच्या अंतराने झाली. । “त्या प्रसंगी मी जे काय भाषण केले, ते येथे सविस्तर देण्याची आवश्यकता नाहीं. ह्या भाषणाचे शेवटीं, महाराजांनी मला मरतेवेळीं जें सांगितले आहे, त्याप्रमाणे सर्व राज्याचा अधिकार मीं धारण केला आहे, व आतां तुह्मीं आपल्या निवासस्थानी जावे अशी माझी इच्छा आहे, असे मी सांगितले. परंतु त्याप्रमाणे घडले नाही. शेवटीं बायजाबाई ह्यांस राजवाड्यांतील सर्व स्त्रियांना हातीं धरून अंतःपुरांत न्यावे लागले. ‘पुढे कांहीं वेळाने रेसिडेंट ह्या नात्याने मजकडे एक सात कलमांचा खलिता पाठविण्यांत आला. हे महाराजांचे शेवटचे मृत्युपत्र ह्मणून आले होते. परंतु त्यावर महाराजांची सही नव्हती. ह्यांतील मुख्य मुद्यांचा आशयः–महाराजांचा हेतु दत्तकपुत्र घ्यावा; हिंदुराव ह्यांनी सर्व राज्याचे व्यवस्थापक(Superintendent ) व्हावे; औरस पुत्र झाल्यास तो गादीचा अधिकारी व्हावा; व न झाल्यास दत्तक पुत्राने, महाराज व बायजाबाई हे जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत चालावे; इत्यादि होता. आणि शेवटीं, ह्या सर्व गोष्टी सिद्धीस नेण्यास ब्रिटिश सरकाराने साहाय्य करावे, अशी विनंति केली होती. |संबंधित इमेज

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...