विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 31

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 31
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------7
महाराजांच्या अंत्यविधीचा देखावा फारच हृदयद्रावक व शोककारक होता. महाराजांचे शव पालखीमध्ये घालून त्यावर उंची पोषाख व रत्नांचे व मोत्यांचे अलंकार घातले होते. त्यांचे तोंड मोकळे ठेवले असून जीवंत मनुष्याप्रमाणे त्यांस बसविले होते. त्यांच्या ह्या शेवटच्या स्वारीचा समारंभ दरबारी थाटाप्रमाणे असून, त्यांच्या पालखीबरोबर हत्ती, घोडे, डंका निशाणे वगैरे सर्व चालले होते. लष्करांतील प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेताबरोबर होता. तात्पर्य, त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यास फारच गर्दी झाली होती. सर्व प्रजाजन महाराजांच्या मृत्यूमुळे अत्यंत४८ शोकाकुल होऊन गेले होते; व त्यांच्या नेत्रांतून एकसारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. त्यावरून महाराजांविषयी त्यांची किती प्रीति होती ह्याची साक्ष पटत होती. दौलतराव शिंदे हे चांगल्या राजास लागणाच्या सर्व गुणांनी जरी परिपूर्ण नव्हते, तथापि ते दुष्ट किंवा क्रूरकर्म करणाच्या राजमालिकेंत गणले जाणारे नव्हते. त्यांच्या ठिकाणीं शहाणपण किवा समजूत ह्यांची उणीव नव्हती. ह्मणूनच महाराष्ट्रसाम्राज्यरूपी नौकेचा भंग झाला असतांना त्यांचे संस्थान सुरक्षित राहिले. ते फार शूर व रसिक होते. अनेक भाषणप्रसंगी ते ज्या उपमा आणि जे दृष्टांत देत असत, ते फार मार्मिक व आनंदप्रद असत. त्यांचा स्वभाव । अतिशय सौम्य व शांत होता. तारुण्यावस्थेत त्यांचे दुर्गुण व प्रमाद \J कितीही असले (आणि त्याबद्दलचा सर्व दोष महाराजांपेक्षा त्यांच्या कुटिल मंत्रिमंडळाकडे अधिक येतो असे मला वाटते. ), तथापि त्यांच्या पुढील कारकीर्दीत, त्यांच्या हातून नीतीचा मोठासा भंग होण्यासारखी एकही गोष्ट घडली नाहीं. दुर्लक्ष्य व आळस हे त्यांचे दोन मोठे दुर्गुण होते. ते त्यांस राजपदाची कर्तव्यकर्मे उत्तम रीतीने बजावण्यास सदैव आड येत असत. एकंदरीत, हिंदुस्थानांतील एवढी मोठी विस्तृत सत्ता त्यांचे हातीं अवघे चौदा वर्षांचे अल्प वय असतां आली; व त्यांचे सर्व बालपण, त्या काळच्या मराठी लष्कराचे लक्षण होऊन राहिलेल्या ‘विश्वासघात' व 'लुटालूट' ह्यांच्या देखाव्यांत गेले; ह्या दोन गोष्टी लक्ष्यात घेतल्या, ह्मणजे त्यांच्या कारकीदाँत घडलेल्या पुष्कळ चुका व दोष हे क्षम्य होते, असे मानण्यास हरकत नाहीं. ह्या पत्रांतील कांहीं भाग नेहमीच्या सरकारी पत्रव्यवहाराच्या मर्यादेपेक्षा अधिक लिहिला गेला आहे; तथापि ह्या प्रसंगाचे महत्त्वच तसे आहे असे समजून, त्याबद्दल क्षमा होईल अशी आशा आहे. ज्या संस्थानिकाचा व माझा पुष्कळ दिवसांचा परिचय आहे, व ज्याचे वर्तन अलीकडे मज४९ बरोबर अगदी स्नेहभावाचे होते, त्याच्या मृत्यूचे वृत्त लिहितांना माझी हृदयवृत्ति द्रवून जाणे साहजिक आहे. तसे न झाले तर मला खरोखर पाषाणहृदयीच व्हावे लागेल. त्याचप्रमाणे, मृत्युसमयीं त्याने ब्रिटिश सरकारच्या न्यायीपणाबद्दल व औदार्याबद्दल जो अमर्याद विश्वास दाखविला, ती त्याच्या मृत्यूबरोबर घडलेली एक महत्त्वाचीच हृदयद्रावक गोष्ट समजली पाहिजे.” ह्या खलित्यावरून मेजर स्टुअर्ट हे सुस्वभावी गृहस्थ असून, एतद्देशीय संस्थानिकांविषयीं त्यांच्या मनांत किती आदर बुद्धि वसत होती, हे चांगले दिसून येते. असो.संबंधित इमेज

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...