विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 33


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 33
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------9

दौलतराव शिंदे ह्यांच्या कालामध्ये ज्ञानप्रसार कमी असल्यामुळे ग्रंथवाचनाची अभिरुचि बेताचीच असे. त्यामुळे मनाचे रंजन करण्याची साधने व मार्ग हीं वर्तमानकालाप्रमाणे नसून, गाणेबजावणे व नाचरंग ह्यांवर त्या वेळी फार बहार असे. दौलतराव शिंदे हे संगीताचे६१ फार शोकी असून, त्यांच्या जवळ गानकलासंपन्न गुणिजन फार अंसत. त्यांच्यापुढे गवयी व कलावंतिणी ह्यांची हजिरी लागली नाही असा एकही दिवस जात नसे. ते ह्या कलेतील पूर्ण रसज्ञ असून, ध्रुपदांचे मोठे भोक्ते होते, अशी ख्याति असे. त्यांना उद्यानविहाराचाही फार नाद असे. ग्वाल्हेरच्या सभोंवतीं त्यांनी अनेक बागबगीचे केले असून नेहमी तेथे वनभोजने व वनक्रीडा चालत असत. दौलतराव शिंदे ह्यांस दोन बायका होत्या. परंतु त्या दोघींमध्ये त्यांची बायजाबाईवर फार प्रीति असे. त्यामुळे बायजाबाईसाहेब नेहमी त्यांच्या सन्निध असत. त्या स्वतः चतुर व कुशाग्रबुद्धि असल्यामुळे दौलतराव शिंदे ह्यांच्यावर त्यांचे फार वजन असे. दौलतराव शिंदे हे हरहमेषा राजकीय अथवा घरगुती गोष्टींमध्ये त्यांची सल्लामसलत घेत असत. बायजाबाई ह्यांचे दौलतरावांवर विशेष वजन होते ह्याचे कारण एका इंग्रज गृहस्थाने असे दिले आहे की, “ बायजाबाई ह्या राठोर रजपुतांच्या उच्च कुलांतील असल्यामुळे व दौलतराव हे कमी प्रतीच्या मराठ्यांच्या कुलांतील असल्यामुळे, केवळ कुलभेदामुळे ।। त्यांना एवढे वर्चस्व प्राप्त झाले. परंतु हे कारण सयुक्तिक नाहीं. ३८ , कां कीं, केवळ कुलाच्या उच्चतेमुळे बायजाबाईचे दौलतरावांसारख्या ८ पाणीदार व ऐश्वर्यसंपन्न पतीवर वर्चस्व बसलें नसून, त्यांच्या अंगचे विशिष्ट गुणच त्याला कारण झाले होते. दौलतराव शिंदे ह्यांचे स्वतःच्या दरबारांतील मुत्सद्यांशीं व परराज्यांतील वकिलांशीं जें वर्तन असे, ते फार प्रतिष्ठेचे व सभ्यपणाचे असे. मोठमोठ्या राजकारस्थानांच्या गोष्टींबद्दल देखील जो वादविवाद व जी संभाषणे व्हावयाची, ती ह्या दरबारच्या आदबीमुळे, दिवाणाच्या«Her descent was from the Rahtore Rajpoots, which alone gave he great power over him, as he was of lower caste.” मार्फत होत असत. तात्पर्य, प्रत्येक गोष्टींत त्यांचे सौजन्य दिसून येत असे. इंग्रजी रेसिडेंटाचा ते फार सत्कार ठेवीत असत; व त्यांस क्वचित् प्रसंगी मेजवान्या देत असत. ।Image may contain: one or more people

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...