विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 August 2019

!!मराठे व मोगल सैन्य व युध्दपध्दती !!

!!मराठे व मोगल सैन्य व युध्दपध्दती !!
सुचना -- सदर लेखातून मराठे व मोगल याच्या तील सैन्य ताकीद समजल्या शिवाय आमच्या पुढील येणार अनेक लेख व मराठ्यांनी मोगलांना दिलेल्या पराभवाचा धक्का याचा महत्त्व समजावून घेणे सोपे जाईल म्हणून अगोदरच मराठे व मोगल सैन्याचे गोळा बेरीज दिले आहे
आपले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
मोगल सैन्य --औरंगजेब दक्षिणेला आले यावेळी युरोपियन प्रवासी अँबे कँरे त्या सुमारास महाराष्ट्रात प्रवासी करीत होता. औरंगजेबाच्या सैन्यात ३ लाख पायदळ, ४ लाख घोडदळ, शिवाय मोठा तोफखाना, युरोपियन गोलंदाज आणि असंख्य हत्ती, उंट होते मुबलक खजिना, होता. खुद्द औरंगजेबाच्या छावणीत १लाख पायदळ, ६० हजार हजार घोडेस्वार, ५हजार उंट, ३ हजार हत्ती, मोगल लष्करात उमराव , मनसबदार याचा संख्या साडेचौदा हजार होते.
मराठे सैन्य -- छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मराठ्यांनी कमी सैन्याचे वापरून गनिमी काव्याने लढाई जिंकली हाच पध्दत पुढे मराठ्यांनी आत्मसात केली गनिमी काव्याने कमी सैन्याने एकतरी विजय किंवा शुत्र पक्षाचे प्रचंड नुकसान यामुळे मराठ्यांनी हे पद्धत म्हणजे वरदान होते म्हणून जास्त सैन्य सोबत नसते मराठे सैन्यात २०००/३००० हजार अशा लहान लहान तुकड्या विविध सरदार व शिल्लेदार याचा नेतृत्व खाली स्वतंत्र रीतीने लष्करी हालचाली करील छत्रपती संभाजी महाराज स्वत १०/१५ हजार फौज सोबत ठेवत संताजी धनाजी हे वीर २० हजार फौज सोबत बाळगतात असे नोंद आहे, तसेच मोगल कागदपत्रतुन सेनापती संताजी घोरपडे ४० हजार सैन्य घेऊन मोगल सैन्यावर हल्ला करीत अशी नोंद आहे , पण अस्सल कागदपत्रे तून मराठे सैन्य किती हे सांगत येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात कमी संख्या असलेल्या मराठे सैन्यात छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई सरकार यांच्या कालखंडात प्रचंड वाढ झाली आहे हे निश्चित कारण धनाजी संताजी यांना बहुसंख्य लढाई या मैदान प्रदेशात केलाय आहे विशेषतः संताजी घोरपडे यांनी जेवढे मोगली सैन्यावर विजयी मिळवले होते तो मैदान प्रदेशातील आहे त इथे एक गोष्ट स्पष्ट आहे मराठे फक्त डोंगराळ भागात लढाई करून जिंकतात कमी सैन्याने संताजीना महाराष्ट्र कर्नाटक, तामीळनाडू आंध्र प्रदेश या दक्षिण भारतात समोरासमोर कमी सैन्याने जिंकले आहेत.....
मोगल -मोगल सैन्य लवाजमाव लढाईचे पध्दत
मोगल--एक लढाऊ मोगल सैनिकाबरोबर १०/१२ इतर माणसे व कुटुंब असत तंबू उभारणे, पाडणे, घोड्यांचा खिदमत, शास्त्राची देखभाल, स्वयंपाकी, खाध-पेयाची तरतुद, यासाठी ही माणसे सोबत असते शिवाय सैनिकांचा जनानाखाना असे. वाहतुकीसाठी मुबलक जनावरे लागत व त्यांना साभांळणारी माणसे यात असत त्यामुळे लढाऊ सैनिकापेक्षा इतरांची संख्या मोगल सैन्यात अधिक असे. सरदार हे विलासी व ऐषारामी असत व हिरीरीने लढाण्यापेक्षा लाच देऊन लढाई जिंकण्याचा प्रयत्न मोगली सरदार करत.. छावणीत डामडौल व खजिनापण असे, याशिवाय तोफखाना, दारूगोळा, व तो वाहण्यासाठी जनावरे असत, त्यामुळे सैन्याचा चढाई वा कूच करण्याचा वेग दर दिवशी जेमतेम १० मैल असे.. मोगल सैन्याचे स्वरूप एखाद्या अजस्र अजगरासारखे असले तरी ते सुस्त पणे, संथपणे भक्ष्यस्थानीकडे सरपटत जात असे..मोगली सैन्य मैदानी लढाईत पारंगत होते :पण डोंगरी लढाईची त्यांना अजिबात सवय नव्हती. लढाई संख्याबळावर जिंकण्याचा व लढाई ऐषारामात करावयाची अशी सवय जडल्यामुळे वेढे व चढाई ही ठिसुळ स्वरुपात असे, शिवाय त्यात इराणी, तुराणी, मध्य आशियाई सरदार दक्षिणी व उत्तर भारतीय सरदारांना तुच्छ लेखत दक्षिणी सरदारांना मुळे मोहीम विजयी होत असेल तर त्यांना मदत करीत नसत, लढाईचे खोटे अहवाल पाठविणे नेहमीच असे, बादशहाचे उलट सुलट हुकूम मुळे गोंधळ वाढत व मोहिमेत दिरंगाई व धरसोड होते असते
मराठे--मराठे फौजाजवळ तोफखाना जवळपास नसेच, मराठा सैनिकाजवळ तलवार, ढाल, कटयार, भाला इ हत्यारे असत. अगांवर कांबळी, मुंडासे, धोतर ही वेषभूषा असे, सैनिक काटक व चपळ असत, तंबु वगैरे साहित्य नसे, घोडीपण काटक व चपळ असत, , मनुचीने लिहिले आहे मराठे सैन्य बदल ". ते खाधपदार्थ बरोबर घेत नसत, उभ्या शेतातून धान्य घेऊन (खरीद करून) आपली गुजराण करीत,वेगवान व धावती लढाई मराठे देत असत, शत्रूवर रात्री अपरात्री छापे घालत. शत्रू बेसावध असताना छापे घालतव लुटालूट करीत, तसेच शत्रूचे नुकसानहे करीत.छावणीतुन जे पळविणे शक्य असेल ते पळवीत, घोडे खजिना, शस्त्रे इ. मात्र स्वतःच नुकसान होऊ लागताच वेगाने पळून जात.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८ मोगलाचा समज होई की मराठ्यांचा पराभव झाला :म्हणून सैनिक पळून जात आहेत मराठे पळुन गेले तरी वळून ते पुन्हा छाप घालत व मोगल साधन साम्रगीवर आपला निर्वाह करीत, मराठेकडे पायदळापेक्षा घोडदळ जास्त असे, ही गनिमी काव्याची लढाई ते स्वदेशात करीत. पण जेथे मोगल शिबंदी कमी असेल तेथे मोगली प्रांतांत लुटालूट करीत. जेथे आक्रमण हाच नियम असेल तेथे मोगली मोगल अधिकायाकडून खंडणी वसूल करीत सैन्याच्या छोट्या तुकडया असत व स्वतंत्र पणे काम करीत असत. मराठे दिवसाला ३०/४० मैलाची चढाई करीत ".....
तंबु फक्त राजा किंवा मंत्री यांनाच असे बाकी मराठे सैनिक उघडयावर राहत असत. ते झाडाच्या सावलीत मुक्काम करीत झाडे नसतील तर जमिनीवर ४ भाले रोवीत, त्यावर काबंळी आंथरून सावली करीत, घोडे भाल्याना बाधीत व स्वत जमिनीवर झोपत असत. त्याच्या उशाशी ढाल असे व ते आपल्या हाताशी तलवार ठेवत व इशारा होताच मिनिटात घोडीवर स्वार होऊन दौड करीत ."अस मनुचीने वर्णन केले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर १६८०नंतर प्रचंड मोगल आक्रमणापुढे मराठे ज्या जिद्दीने २५वर्षे लढले त्याला तुलना महाराष्ट्र जवळ जवळ मोगलांचे ताब्यात गेला, त्याचा नवा छत्रपती राजा संभाजी मारला गेला राजधानी पडली. मराठे वतनदार मोंगलकडून वतने मागू लागले. इतक्या बिकट अवस्थेत जिंजीहुन ५०० मैलांवर राज्य स्थापून मराठ्यांनी मोगलांना नामोहरम केले मोगल आणि मराठ्याच्यात, मराठ्यांचा मानसिकता stay in power होती मोगली सत्ता प्रचंड असली तरीही पोकळ झाली होती हे एक सत्य आहे मराठ्यांनी याची पूर्ण जाणीव होती हे मराठ्यांच्या विजयाचे व मोगलच्या पराभवाचा रहस्य आहे...
संताजी धनाजी २०/२० हजार सैन्याचे नेतृत्व पत्करून मोहिमेवर निघतात यात याचा सोबत कोणत्याही वतनदार, सरंजामी असणार्‍या सरदार नाहीत या दोन्ही सेनापती सोबत तरीही विजयरथावर असणारे हे दोन्ही लोकनायक सेनापती हे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात उदयशी आलेले व सहकारी आहेत, संताजी व धनाजी चे नेतृत्व पत्करून त्याच्या मागे धावणार्‍या मराठे सैन्यात मोगल सैन्याने रयतेच्या व नागरिकावर केलेल्या जुलूम जबरदस्तीच्या व त्यांना केलेल्या गुन्हाच्या प्रतिकारासाठी या सेना धावत होत्या हे मराठे सैन्य मोगलाप्रमाणे जुलूम व जबरदस्ती करण्यासाठी धावत नव्हता तरी धाकट्या धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे बदला घेण्यासाठी लढणार मराठे होते म्हणून तर दोन्ही सैन्यात सर्व बाबतीत मराठे कमी होत पण विजयासाठी प्रयत्न करत राहिले व शेवटी औरंगजेब चे शेवट इथे झाले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्र
लेख व माहिती संतोष झिपरे ।
९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...