विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 August 2019

महाराष्ट्र तील पहिला जोहार गाविलगड, जिल्हा अमरावती

महाराष्ट्र तील पहिला जोहार
गाविलगड, जिल्हा अमरावती ,
इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या इंग्रज मराठे युद्धात मराठ्यांच्या पराभव नंतर इंग्रजांनी गाविलगडावर आपले मोर्चा वळविला इंग्रज – मराठे युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे, इंग्रज अधिकारी ऑर्थर वेलस्ली आणि नागपूरकर भोसल्यांकडून किल्लेदार बेनिसिंग यांचेत हे युद्ध झाले.
आज या घटनेस तब्बल २१५ वर्षे झालीत. १८०३ ला १४ डिसेंबर च्या रात्री शिड्या लाऊन व तोफांचा मारा करून जेव्हा शार्दुल दरवाजा इंग्रजांनी सर केला तेव्हा १५ डिसेंबर दिल्ली दरवाज्यात निकराची लढाई झाली
अन बेनिसिंगसह सर्व मातब्बर व सैनिक मारल्या गेलेत, यामध्ये इंग्रज सैन्याकडील १५ जणांचा मृत्यू व ११० जन जखमी झालेत.
इंग्रज सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चीतांवर बेनिसिंगाच्या पत्नी कुंवारीसह एकूण १४ स्त्रियांनी उडया उडया घेऊन जोहार केला आहे त्यांच्या समाध्या गाविलगड येथील दिल्ली दरवाजा च्या आत प्रवेश केल्या वर उजव्या हातावर वरच्या बाजूला आहेत ऐकून चार समाध्या तेथे आपणास पाहावयास मिळतात किल्ला ब्रिटिशांनी जिंकला अन या किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटीश सत्ता आली.
या जोहार व बेनीसिगं च्या पराक्रमाची नोंद इंग्रज अधिकारी जस्पर निकोलस याने आपल्या डायरीत केला आहे
सदर फोटो तील समाध्या जोहारतील आहे त व अष्टकोनी समाधी बेनिसिगं याचा आहे







राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद
महाराष्ट्र राज्य प्रमुख
संतोष झिपरे
९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...