#इंग्रज_रेसिडेंट_कुणाला_विचारून
#आमच्या_मुंडक्यावर_बसवला
#तो_पेशवा_भट_आमचा_नोकर!
#हे_राज्य_आमचे_आहे
#Chatursing_Bhosale
#Independence_special
छत्रपती शाहु दुसरे यांचा राज्याभिषेक होताच पेशव्यांनी व कारभारी नाना फडणवीसाने सातारचे सैन्य, तोफखाना, हत्ती, तलवारी गोळा करून पुण्यात नेले नाना फडणवीस एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने छत्रपती शाहु व छत्रपती राजवाड्यावर पहारेकरी नेमले छत्रपतींना व राजकुटुंबांना कोणत्याही सरदार व जमिनदारांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली छत्रपती अडाणी रहावा म्हणून राजवाड्यातले शिक्षक ही काढून टाकले
हे सगळं होत असताना सगळेच फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले मात्र छत्रपती दुसरे शाहू यांचा भाऊ चतुरसिंग भोसले मात्र गप्प राहिले नाहीत पेशव्यांचा अगतिपणा बघून ते चिडले त्यातच पेशवा व इंग्रज यांच्यात तह होऊन ब्रिटिश रेसिडेंट सातारा दरबारात दाखल झाला यामुळे ते अस्वस्थ झाले
चतुरसिंग भोसलेंनी बाजीराव पेशवेंचा सर्वेसर्वा सर्जेराव घाटगे याला लिहिलेल्या पत्रात म्हणतात "इंग्रज रेसिडेंट कुणाला विचारून आमच्या मुंडक्यावर बसवला, आम्ही धनी आहोत! तो पेशवा भट आमचा नोकर हे राज्य आमचे आहे" पुढे
चतुरसिंग भोसलेंनी ब्रिटिश व बाजीराव पेशवे यांच्या विरोधात आघाडी उभा केली नागपूरचे रघुजी भोसले, इंदूरचे यशवंतराव होळकर, पेंढाऱ्यांचे पुढारी अमीनखान, व करीमखान, जोधपूरचा राजा मानसिंग, जयपूरचा राजा जगतसिंग, यांची त्यांनी स्वतः जावून प्रत्यक्ष भेट घेतली आणि महाराष्ट्राकडे निघाले
वाटेत त्यांना बाजिराव पेशव्याचा सरदार त्र्यंबकजी डेंगळे याने मेजवानीचे निमंत्रण दिले तुमच्या केसाला ही धक्का लागून देणार नाही अशा बेलभंडाऱ्याच्या आणाभाका घेतल्या आणि भेटीवेळी विश्वासघात केला चतुरसिंग भोसलेंनां कैद केले पेशवा दुसरा बाजीराव व ब्रिटिश जुलमी सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्राला स्वतंत्र करायला निघालेला स्वातंत्र्यवीर गद्दारीने जेरबंद केला अखेर पेशवाईच्या तुरुंगातच ता. बुधवार १५ एप्रिल १८१८ रोजी चतुरसिंग भोसलेंचा मृत्यू झाला 🙏🙏
संदर्भ_ महान भारतीय क्रांतिकारक
लेखक_ स. ध. झांबरे (प्रकाशक _महाराष्ट्र शासन)
©Zunjar babar

No comments:
Post a Comment