विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 46


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे

भाग 46

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,

लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------12

दाजीबा पोतनीसः—शिंदे सरकारच्या राज्यांतील मुख्य पोतनिशीचे काम ह्या गृहस्थाकडे होते. हे दौलतराव शिंद्यांच्या कारकीर्दीत स्वामिनिष्ठ व प्रामाणिक सेवक ह्मणून प्रसिद्ध होते. बायजाबाईनींही आपल्या कारकीर्दीत तेच काम त्यांच्याकडे सोपविलें. ह्यांचे बंधु कृष्णराव ह्यांच्याकडे हा हुद्दा महादजी शिंद्यांचे वेळेपासून होता. परंतु impenetrable mask. The most startling demand or the most unexpected concession was alike received without the motion of a muscle. Malcolm said of him that he never saw a man with such a face for the game of Brag. From that time Wittal Pant was known by the name of "Old Brag" in the British camp. And years afterwards, when Malcolm met General Wellesly, then the Duke of Wellington, in Europe, and the conversation one day turned upon the characters of the great men of France, the latter, when questioned regarding Tallyrand, replied that he was a good deal like "Old Brag”—but not So clever.” -Jalcolm's Life by Ke. You. II, Page 241. ant for the said of b६८ कृष्णरावांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव अमृतराव हे अज्ञान व अल्पवयी असल्यामुळे दाजीबा हेच सर्व काम पाहत असत.

आत्माराम शिवरामबाबा वांकडेः–ह्यांचे पूर्वज लक्ष्मणराव वांकडे हे पुण्याचे रहिवासी असून, महादजी शिंदे ह्यांचे बरोबर उत्तर हिंदुस्थानांत आले होते. ह्यांच्याकडे प्रथम पोतनिशीचे काम होते. पुढे कांहीं कारणामुळे ते त्या कामावरून दूर झाले. त्यांचे पश्चात् दौलतराव शिंदे ह्यांनीं तात्या पागनीस ह्यांजकडे ते काम सांगितले. ते मृत्यु पावल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे नातू आत्मारामपंत ह्यांस ते काम सांगितले. दोन वर्षेपर्यंत ते काम त्यांनी उत्तम रीतीने बजावल्यामुळे सर्जेराव घाटगे ह्यांची त्यांजवर फार मेहेरबानी जडली, व त्यांनी त्यांस खासगी दिवाण नेमिलें. पुढे सर्जेराव इ. स. १८१० सालीं मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस ते स्वस्थ होते. परंतु ते चतुर व दूरदर्शी मुत्सद्दी असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची त्यांच्यावर पुनः कृपा जडली, व त्यांच्या दरबारामध्ये त्यांचा पगडा बसला. दौलतरावांच्या पश्चात् बायजाबाईसाहेबांनी त्यांस आपले खासगी दिवाण नेमिलें. ते बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत आत्माराम पंडित ह्या नांवाने प्रसिद्धीस आले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...