विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 47

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 47
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------13
कर्नल जेकबः—हा आर्मीनिया प्रांतांतील मूळचा राहणारा इसम स्वपराक्रमानें दौलतराव शिंदे ह्यांच्या पदरीं योग्यतेस चढला. ह्याच्याकडे १३ पायदळ पलटणी, ४०० घोडेस्वार, व एकंदर ५२ तोफा होत्या. ह्या सैन्याची व्यवस्था त्याने फार चांगली ठेविली होती व त्याचा पगार वगैरे वेळच्यावेळीं तो देत असे. त्याबद्दल कर्नल जेकब ह्यांस स्वतंत्र प्रांत तोडून दिला होता. बायजाबाईसाहेबांनीं दौलतराव शिंदे ह्यांच्या । व्यवस्थेत कांहीं फेरफार न करितां, कर्नल जेकब ह्याजकडे पूर्वीप्रमाणे जायदाद व अधिकार कायम ठेविले. ६९
कर्नल जॉन बॅप्टिस्ट फिलोजः—हा शिंदे सरकारच्या दरबारामध्ये जॉन बत्तीस” ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हा जातीचा फराशीस होता. ह्याने दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीत अनेक लढाया मारून फार प्राबल्य मिळविले होते. हा शूर, धाडशी व प्रसंगावधानी असल्यामुळे ह्याची शिंद्यांच्या दरबारांत बरीच छाप बसली होती. ह्यानें केरोली, चंदेरी, राघोगड, बहादुरगड, लोहपाड वगैरे ठिकाणच्या रजपूत व बुंदेले राजांवर स्वाच्या करून व त्यांना जेरीस आणून, त्यांचा प्रांत काबीज केला होता. परंतु हा इसम स्वार्थसाधु असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची ह्याजवर गैरमर्जी झाली; व त्यांनी त्यास इ. स. १८१७ मध्ये ग्वाल्हेरीस आणून सक्त नजरकैदेत ठेविले होते. पुढे ह्याने, दौलतरावांचे मुख्य खजानची किंवा फडणीस गोकुळ पारख ह्यांजकडे संधान लावून, इ. स. १८२५ साली आपली सुटका करून घेतली. तेव्हापासून हा धाडशी व महत्वाकांक्षी सरदार मोकळाच होता. बायजाबाईसाहेबांनी ह्यास मोकळा ठेवून उपयोगी नाहीं असे मनांत आणून, त्यास दरबारांत हजर राहण्याची परवानगी दिली, व सैन्याच्या एका छोट्या पथकाचा अधिकार दिला. ह्या पुरुषाने पुढे ग्वाल्हेर दरबारांतील राजकारणांत चांगलाच प्रवेश केला व तेथे वर्चस्व संपादन केलेRelated image.Related image

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...