विनोद जाधव एक संग्राहक

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 56


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 56
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------1
संस्थानामध्ये कलह उत्पन्न होण्यास विशेषेकरून राजाचे दुर्गुण व कुसंगति हीं बहुधा कारण असतात. मग त्यांत कित्येक स्वार्थसाधु व कपटपटु लोकांच्या नीच कृतींची भर पडून, त्या कलहाम्रीच्या ज्वाळा अतिशय जोराने पेट घेतात; आणि लवकरच संस्थानाची राखरांगोळी करितात. महाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामध्ये जो विग्रह उत्पन्न झाला, त्याचे कारण महाराजांची अल्पबुद्धि व दुर्जनसंगति हींच होत. महाराजांचे दत्तविधान होऊन त्यांस इ.स.१८२७ सालीं गादीवर बसविले, त्या वेळी त्यांचे वय अवघे ११ वर्षांचे होते. अर्थात् इतक्या अल्पवयी मुलाच्या हाती अधिकार देणे अगदीं अयोग्य व शास्त्रदृष्टया देखील अग्रयोजक होते, हे कोणीही सुज्ञ मनुष्य कबूल करील. बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराज अल्पवयी असल्यामुळे रीतीप्रमाणे संस्थानाचा राज्यकारभार आपण स्वतः उत्तम प्रकारे चालविला, व महाराज वयांत येईपर्यंत तो तसाच चालवावा अशी त्यांची इच्छा असणे साहजिक आहे. परंतु महाराज गादीवर बसून दोन तीन वर्षे झाली नाहीत, तोंच दरबारच्या स्वार्थसाधु मंडळीच्या चिथावणीने ह्मणा, किंवा अन्य कांहीं कारणांमुळे ह्मणा, महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन बायजाबाईसाहेबांस असह्य व अपमानकारक वाटू लागले, व त्यांनी८२ महाराजांवर सक्त नजर ठेवण्यास सुरवात केली. अर्थात् बायजाबाईसाहेब ह्यांनी महाराजांस मन मानेल तसे वागू न दिल्यामुळे, हे प्रकरण जास्तच विकोपास गेले; व पुढे नामदार गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस इकडे लक्ष्य पोहोंचविणे भाग पडले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...