विनोद जाधव एक संग्राहक

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 60

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 60
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------5

इ. स. १८३० सालीं-ह्मणजे महाराजांच्या १५ व्या वर्षी-मेजर स्टुअर्ट ह्यांची व महाराजांची जी मुलाखत झाली, तिचे वर्णन त्यांनी आपल्या खलित्यामध्ये येणेप्रमाणे केले आहेःमहाराजांस ज्या वेळी मी विचारिलें कीं, “तुमची कशी काय हालहवाल आहे ?” त्या वेळी त्यांनी उत्तर दिले की, “मी सुखी आहे; परंतु सर्व राज्याधिकार बाईसाहेबांच्या हातीं आहे. मी त्यांस उत्तर दिलें की, “बरोबर आहे. तुमचे अद्यापि अल्पवय असल्यामुळे तुह्मीं राज्याधिकार आपल्या हाती घेण्याची इच्छा करणे प्रशस्त नाहीं. तुह्मीं कोणाच्या तरी तंत्राने वागले पाहिजे. ह्या कामी तुमच्यावर देखरेख करण्यास बाईसाहेब ह्याच फार योग्य आहेत. तुह्मांस बाईसाहेब ज्या रीतीने वागवितात, त्यांत कांहीं तुह्मांस तक्रार करण्यासारखे असेल, तर मला सांगा. मी त्याचा योग्य बंदोबस्त करीन.' परंतु महाराजांनी ह्या प्रश्नाचे उत्तर माझे बरें आहे, मला कांहीं सांगण्यासारखे नाहीं.” अशा प्रकारचे उडवाउडवीचे दिले. मग मी त्यांस विचारिलें कीं, “तुमचे जर सर्व कांहीं ठीक आहे, व तुह्मांस बाईसाहेबांच्या विरुद्ध तक्रार करण्यास जागा नाहीं, तर तुह्मी नौकरचाकरांवर प्रसंगविशेषीं तरवारी उपसता, व लग्नाच्या वेळी तर तुह्मीं त्यांच्यावर बाण सोडले, अशा प्रकारचे चमत्कारिक वर्तन का केले ? त्यामुळे लग्नप्रसंगी एक मनुष्य ठार मेला, हे तुह्मांस माहीत नाहीं काय ??? (लग्नाच्या वळीं महाराजांनी बाण सोडल्यामुळे धारच्या पवारांचा एक नौकर जखमी होऊन मृत्यु पावला.) ह्या प्रश्नास महाराजांनी अतिशय बेपरवाईने उत्तर दिले की, **भगवानाने जसे केले तसे झाले ! त्यावर मी त्यास असे सांगितले८७ कीं, “महाराज, भगवानाने तुह्मांस तुमच्या निकृष्ट स्थितींतून एवढ्या ऐश्वर्यपदावर आणून ठेविले, हे तुमच्यावर मोठे उपकार केले आहेत. ते दुसन्यास अपकार करण्याकरितां नव्हेत ! तुह्मी जर अशा रीतीने वागू लागला, तर तुमच्याविषयी सर्व लोकांचे मत फार वाईट होईल व तुह्मांस कोणी चांगले ह्मणणार नाहीं. ह्यावर त्यांनी उत्तर दिलें कीं, “मीं आतां ते सर्व सोडून दिले आहे !?? अर्थात् तशा प्रकारचे सर्व वर्तन महाराजांनीं सोडून दिले, असा महाराजांच्या शब्दाचा अर्थ माझ्या मनांत येऊन, मी त्यांस ह्मटले की, “ही फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाराजांनी माझा हा चुकीचा समज फार वेळ राहू दिला नाहीं ! त्यांनी लगेच स्पष्ट करून सांगितले की, “तुह्मी समजला तसा माझ्या शब्दांचा अर्थ नाहीं. माझा अर्थ असा की, मीं लोकमताकडे लक्ष्य देण्याचे मुळींच सोडून दिले आहे. मला कोणाचीच जरूर नाहीं !” । | हा मेजर स्टुअर्ट ह्यांच्या खलिता वाचून महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन कोणाही सुज्ञ मनुष्यास चांगले वाटणार नाहीं

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...