विनोद जाधव एक संग्राहक

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 61


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 61
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------6
मेजर स्टुअर्ट ह्यांची इ. स. १८३० सालीं ग्वाल्हेरीहून बदली झाली. त्या वेळी त्यांनीं ग्वाल्हेर सोडण्यापूर्वी पुनः महाराजांची भेट घेतली व त्यांची कशी काय स्थिति आहे हे विचारिलें. त्या वेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, १५ मी पूर्ण सुखी आहे. ह्या प्रसंगी मेजर स्टुअर्ट ह्यांनी महाराजांस चांगला उपदेश केला, व संस्थानचे राजकीय कामकाज चालले असतांना बाईसाहेबांजवळ हजर राहणे किती हितावह आहे, तेही सांगितले. त्या वेळीं महाराजांनीं, “माझी तबियत बरी असते, तेव्हां बाईसाहेबांजवळ मी हजर असतों.” असे उत्तर दिले. ह्या सर्व संभाषणाचा सारांश मेजर स्टुअर्ट ह्यांनी शेवटी एका वाक्यांत असा काढिला आहे कीं, ६ एकंदरींत महाराजांनीं मजवर यत्किंचितही विश्वास न दाखवितां, किंवा आपली दुःखें मला न कळवितां, माझ्या . (८ आपण होऊन केलेल्या मदतीचा स्वीकार न करून तिच्याकडे दुर्लक्ष्य केलें; व आपला उर्मटपणा व बेपरवाई स्पष्ट रीतीने व्यक्त केली. मेजर स्टुअर्ट ह्यांच्यासारख्या ग्वाल्हेर संस्थानाच्या ख-या हितचिंतक व निःपक्षपाती रेसिडेंटाने अल्पवयी महाराजांविषयी आपला जो अभिप्राय व्यक्त केला आहे, त्यावरून महाराजांचे खरे वर्तन कशा प्रकारचे होते, ह्याविषयीं नीट कल्पना करितां येते. अर्थात् अशा अज्ञान व विचारशून्य बालराजाच्या हातीं संस्थानच्या राज्यकारभाराची सुत्रे देणे ही गोष्ट, बायजाबाईसाहेबांसारख्या शहाण्या व राजकारणी बायकोस अप्रशस्त व अनर्थावह वाटावी, हे अगदीं साहजिक आहे. त्यामुळे अशा बालराजास त्यांनी स्वातंत्र्य दिले नाही, किंवा राज्याधि कार दिला नाहीं, ह्याबद्दल त्यांना दोष देणे रास्त नाहीं. परंतु खरा १,५, इतिहास व खरी वस्तुस्थिति माहीत नसल्यामुळे कांहीं इतिहासकारांचा हा गैरसमज झालेला आहे. असो. | मेजर स्टुअर्ट ह्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठ सरकारास कळविला. परंतु, बायजाबाईसाहेब ह्या राज्यकारभार चालविण्यास खंबीर असल्यामुळे व त्या वेळीं एतद्देशीय संस्थानांतील अंतर्व्यवस्थेत हात घालण्याचा वरिष्ठ सरकारचा हेतु(Policy) नसल्यामुळे, हा कलहाग्नि कांहीं कालपर्यंत तसाच धुमसत राहिला. संस्थानांतील कलहप्रिय व स्वार्थसाधु सरदारांचे व लष्करी अधिका-यांचे त्यास जोपर्यंत साहाय्यरूपी तेल मिळाले नाहीं, व वरिष्ठ सरकारच्या अनुकूलतेचा वारा त्यास लागला नाहीं, तोपर्यंत त्याच्या ज्वालांनी पेट घेतली नाही. परंतु पुढे दोन्ही गोष्टी प्राप्त होताच, त्याच्या ज्वाला प्रदीप्त होणार व त्यांत कोणाची तरी 1. Major Stewart's despatches quoted in Sutherland's Sketches. Page 101. आहुति पडणार, हे भविष्य ठरल्यासारखेच झाले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...