विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 October 2019

अनेकांच्या मते संभाजीराजे फितूर होते असे म्हणतात त्यांना हे उत्तर


अनेकांच्या मते संभाजीराजे फितूर होते असे म्हणतात त्यांना हे उत्तर -


 sambhaji maharaj साठी इमेज परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर निघाले होते त्यावेळी सगळे सैन्य त्यांच्या बरोबर होते त्यावेळेला बहादुर गडाला दिलेर खान आला होता तो स्वराज्यावर आक्रमण करण्याची भीती आहे महाराजांनी गोवलकोंडा आणि आदिलशाही मध्ये भांडणे लाऊन दिलेत म्हणजे ते आक्रमण करणार नाही पण दिलेर खान मोकळा आहे आपण कर्नाटकात असताना दिलेर खानने आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखायची जबाबदारी महाराजनी संभाजी राजाना दिलीये त्यांना श्रुंगरपूरचे सुभेदार म्हणून नेमले आणि स सैन्य शिवराय बाहेर असताना केवळ बुद्धीच्या जोरावर संभाजी राजांनी दिलेर खानला रोखले , राजे परत येईपर्यंत रोखले
त्यासाठी पत्रव्यवहार केलाय आम्हाला पराक्रमाची संधि हावि इथे स्वराज्यात ते शक्य होत नाही , मला संधि द्यावी . दिलेर खानने लगेच उलट पत्र पाठवले अरे तू तिथे काय करतो औरंजेबाकडे चाल सह्याद्रि जिंकायची आहे तू ये माझ्याकडे आपण दोघे मिळून सगळी सह्याद्रि जिंकू
संभाजी राज्यांनी त्याला उलट पत्र पाठवून कळवले या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहे ते परत येई पर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही म्हणजे संभाजी राजे येतो हो म्हणाले नाही आणि येत नाही पण म्हणत नाही . दिलेर खानला निव्वळ झुलवत ठेवले
राजे परत आले पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली मंग राजे रायगडावर गेले . यथाकाळ निरोप पाठवतो सांगून मध्ये 6– 7 महीने गेलेत . आता संभाजी राज्यांना पलूनच जायचे होते तर राजे कर्नाटकात असताना ते सोपे होते ( कुठला चोर असा म्हणतो येऊ द्या की पोलिस मंग जातो पळून ) जायचे असते तर आधीच गेले असते न राजे नसताना राजे येण्याची वाट कशाला बघता मध्ये 6 -7 महीने गेलेत मध्ये
मंग एके दिवशी रायगडावरुन पत्र येतेय आपण रायगडस न येता सरल परळीस जाने उचित ( आता परळी म्हंटले की समर्थ रामदास स्वामी येतात संभाजी राजे बिगडले होते त्यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून त्यांना परलीच्या किल्ल्यावर पाठविले हा एका आरोप पण समर्थ रामदास स्वामी परलीच्या किल्ल्यावर हजरच नवते हे राज्यांना नाहीत होते ) मंग सांबाजी राज्यांना तिथे पाठविण्याचा उद्देश काय - त्या परलीच्या किल्ल्यापासून अवघ्या 13 मैलावर दिलेर खानची नौका येते तेथून अगदी 13 मैलावर जाऊन संभाजी राजे मोघालणा जाऊन सामील झाले हा सगळं जर परिक्रमेचा भाग जर बगितला तर संभाजी राज्यांनी पळूनच जावे यासाठी हे जाणून बुजून केलेले नियोजन आहे
वस्तुस्थिती ती आहे शिवराय कर्नाटकच्या स्वारीवरून परत आलेत शस्र मोडली , सैन्य थकले आपण लगेच दिलेर खाणाशी मुकाबला करी शकणार नाही म्हणून शिवराया नी संभाजी राज्यांना संगितले जा अजून काही काळ त्यांच्याकड रोखून धरा दिलेर खानला . आणि जेवढा काळ संभाजी महाराज दिलेर खनकडे आहे तेवढा काल दिलेर खानने एकदाही स्वराज्यावर चाल केली नाही
भोपाल गडाचा फक्त एकच किस्सा पण त्या भोपाल गडाबद्दल संभाजी राजे बाक्रे नावच्या ब्राम्हणला दिलेल्या दानपत्रात लिहितात तो दिलेर भोपाल गडाची इच्छा घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी शंकरासारखा माझा तिसरा नेत्र उगडुन राग प्रकट केला .( म्हणजे सरल आहे संभाजी राज्यांची इच्छा नाही स्वराज्यावर चाल करण्याची , एवढी एकच घटना पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय ).
संभाजी राजे जोपर्यंत दिलेर खनाकडे आहे तोपर्यंत दिलेर खानाणे आक्रमण केले नाही तर संभाजी राज्यांनी ते होऊ दिले नाही
पण या काळात शिवाजी राजे मात्र मोघलांचे किल्ले घेत निघालेत आणि दिलेर खान काही हालचाली करेना म्हणजे त्याचे किल्ले घेत असूनही दिलेर खान प्रतिक्रिया करेना तो मुयाजजम वैतागला त्याने दिलेर खाणाला पत्र पाठवले अरे तू तिथे गप्प का बसलाय शिवाजी राजे आपले किल्ले घेताय आणि तू काहीच करेना हालचाल नाही दिलेर खानची . मंग शेवटी औरंजेबाचे पत्र आले त्यामुळे दिलेर ला हालचाल करणे भाग पडले मंग दिलेर पन्हाळ्यावर हल्ला करायला निघाला वाटेत अथणीला मुक्काम पडला ( भीमसेन सकसेना नावाचा हितिहास कार लिहितो शिवाजी राज्यांची माणसे गुप्तपणे संभाजी महाराजांकडे येत असत एके दिवशी शिवाजी महाराजांच्या माणसांनी संभाजी राज्यांना अलगद बाहेर काढले तेथून विजापूर ला मसूद खाणाकडे नेले आणि तेथून मंग संभाजी राजे पन्हाळ्यावर आले
म्हणजे शिवरायांच्या माणसांनी संभाजी राज्यांना सोडून नेले . आता संभाजी राजे जर फितूर असते मोघलांना जाऊन मिळाले असते तर शिवराय त्यांना परत कसे आणतात ?
खंडोजि खोपडे फितूर झाला महाराजांनी त्याचे हात पाय छाटाले , संभाजी कावजी मोघलाणा जाऊन मिळाला महाराजांनी त्याला ठार केले . मंग हा न्याय संभाजी महाराजांना का लावला जात नाही ?
साधी गोष्ट आहे ही चाल शिवरायांची आहे हे जे केले संभाजी राज्यांनी ते शिवारायंच्या इच्छेनुसारच केले
आता साधी गोष्ट आहे काही लोक म्हणतात की आमच्या कडे पत्र आहे आता मला एक सांगा हा जर गोपनीय कटाचा भाग असेन तर संभाजी राजे दिलेर खानला असे पत्र लिहितिल का ?
दिलेर खान साहेब यांना ची . नमस्कार
त्याचे काय झाल आमचे आबासाहेब आताच कर्नाटकाच्या स्वारीवरुन परत आले . शस्र मोडली ,सैन्य थकले आत्ता आम्ही लगेच तुमच्याशी मुकाबला करू शकत नाही . संभजी राजे करता का असे जा जरा वर्षे - दीड वर्षे जाता का दिलेर खाणाकडे जा त्याच्याकडे झूलवत ठेवा त्याला
मंग कस काय वाटतेय आमची युक्ति तुम्हाला येऊ का मग तुमच्याकडे दिलेर खान साहेब ?
येवढेच नाही संभाजी राज्यांना परत आणल्यावर शिवराय त्यांना फ्रेंच्याशी वाटाघाटी करण्याचे आधिकार देतात , मोघलांच्या विरुध्द्ध आक्रमणाची जबाबदारी पण ते संभाजी राज्यांना देतात त्यामुळे संभाजी राजे स्वराज्य द्रोही नाही हीच वसुस्थिती आहे आणि हीच परिस्थिति पण आहे
संभाजी राज्यांच्या चरित्र वरचे हे दाग सरल सरल लक्षात येतात काही अर्थ नाही त्यात एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारस या मातीने स्वराज्यास बहाल केलाय ज्याने स्वराज्य उभं केलाय .

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...