विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 December 2019

पानिपत वीर - श्रीमंत महाराज जनकोजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे


पानिपत वीर - श्रीमंत महाराज जनकोजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे
पानिपत समर भुमीवर पाय घट्ट रोवुन मराठ्यांचे लष्कर उभे होते, बुराडी घटावरील दत्ताजीरावांच्या बलिदानाचा जनु सुड़च उगवायची वाट बघत असलेले भासत होते, शिंद्याच्या तुकडीचे नेतृत्व महादजी बाबा,तुकोजी बाबा आन १६ वर्षाचा आयन जवानीत आलेला तरुण जनकोजी शिंदे मोठ्या दिमाखात करत होता.. दिल्ली पासून अजमेर बंगाल, उज्जैन धार बड़ोदे बाकनेर घौड दौड़ करुन छतीस महाल मिळवीणार्या ,त्या बदली शिंद्यानी मराठ्यांच्या दौलतीसाठी रक्त वेचल होत त्या राणोजीराव शिंदयाचे नातू जनकोजी होय. जय्यापाराव शिंदयाचे ते पुत्र व त्यांच्या पश्चात दत्ताजीरावांनी तळहताच्या फोड़ा प्रमाणे त्यांना संभाळले होते जनकोजी बाबा वर त्यांची भिस्त असे जनकोजी आपल्या आज्या प्रामानचे पराक्रमी होते महादजी बाबा आन दत्ताबाच्या तालमीत तयार झालेले जनकोजी मत्सुदी व साहसी बनले,त्यांच्या रुपान मराठ्यांचा दौलती साठी शिंद्याची तीसरी पुढी खपत होती., बुराडी घाटाच्या रणसंग्रामा मध्ये दत्ताबा सोबत जनकोजींनी देखील मर्दुमकी गाजवीली होती,दत्ताजींनी देशरक्षण्यासाठी आपले प्राण वेचले बचेंगे तो और भी लढेंगे हा त्याचे वाक्य इतिहासात अजराम झाले.. दत्ताजींच्या हत्येच्या सूडाने उसळलेल्या जनकोजींनी कुंजपूरा येथे क्षत्रुच्या घरात घुसुन कुतुब शाहच्या धड़ा वेगळे मस्तक करून भाल्याला घुंफुन सैन्यात मिरवले,जनकोजी आन महादजी बाबांच्या मनातला सुडग्नि थोड़ा निवाळला असला जरी बुराडी घाट ही पानीपताच्या रण संग्रामची चिंगारी इतुनच पेटली.. १४जानेवारी १७६१ रोजी पानिपत भूमिवर मराठा आणि अफगान सैन्य सोमरा समोर आले,एककड़े सारा देश मकर संक्रातीच्या सनात मग्न होता दूसरी कड़े मराठ्यांनी एक जंग पुकारला होता..युद्धाची रणशिंग फुकली गेली,अब्दालीला मराठ्यांची एवढी दास्ती घेतली होती की म्हणून तो युद्धा भुमीच्या बाहेरुन दुर्बीनीच्या साह्याने तो पाहात होता.. मराठा सैन्यानी आप आपले मोर्चे लावले,जनकोजी आपल्या पतकास चेतवत होता, हर हर महादेव जय भवानीचे जय घोष करून मराठ्यांचे सैन्य अब्दाली वर तूटून पडले,दना दना तलावरी आदळु लागल्या, हर हर महादेवचा जय घोष घुमु लागला,पहिल्याच तडाख्यात मराठ्यांनी अफगानी फळी सपा सप कापून काढली, चौतळलेला जनकोजी क्षत्रु वर वाघा प्रमाने तूटून पडला सकाळच्या प्रहारात मराठे अघाडिवर होते, सूर्य डोक्याव येताच मराठ्यांचे नशीब देखील फिरले उन्हाच्या तिरपीने तीन दिवस उपाशी असलेल सैन्य गरा गर चक्कर येऊन पडू लागले
इतक्यात बायाजी पडल्याची बातमी आली आणि लगेच दत्ताजीराव शिंदे,पिराजीराव जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे हे पुढे आणि मागून जनकोजी शिंदे निघाले. मागे हटणाऱ्या मराठ्यांना चेतवत दत्ताजी भाला चालवत रोहिल्यांवर चालून गेले ,शेकडो रोहिले मारले गेले .बाकीचे मागे हटले . दुसऱ्या बाजूला जनकोजी सुद्धा पराक्रमाची शर्थ करत असताना त्यांना दंडात गोळी लागून ते कोसळले,जनकोजी सुद्धा पडले अशी बातमी आल्याने शोकाकुल दत्ताजी आपल्या १८-२० साथीदारांनिशी अफगाणी -रोहिल्यांच्या सैन्यात घुसले. दत्ताजींच्या सोबत सरदार पिराजीराव जगदाळे ,यशवंतराव जगदाळे ,सरदार हिंगणे होते. शत्रू फौजांचे बर्कंदाज बंदुकांचा तुफानी मारा करत होते. पुढे घुसलेले हे चौघे कापाकापी करत शत्रुसैन्यात आतपर्यंत आले होते , यशवंतराव जगदाळ्यांना गोळी लागून ते खाली पडले ,मागेच असणाऱ्या पिराजी जगदाळ्यांनी त्यांना घोड्यासह मागे ओढायला सुरुवात केली,मागोमाग मदतीसाठी दत्ताजी आले आणि दोघे मिळून घोडी बाहेर काढायला लागले.
सणकत आलेली एक गोळी दत्ताजींच्या डोक्यात घुसली आणि ते जागेवर कोसळले, अफगाण्यांचा वेढ्यात अडकलेलं पिराजी सुद्धा फार काळ तग धरू शकले नाही आणि मारले गेले. इकडे दत्ताजींना गोळी लागल्याचे वर्तमान नजीबाचा गुरु कुतुबशाह ला कळले, दत्ताजी तळमळत असलेला पाहून कुतुबशाहने दत्ताजीची मान पकडली अन हातातले खंजीर दत्ताजीच्य्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला….
“बोलो पाटील…….और लढोगे?”
हे ऐकताच दत्ताजींनी सर्व ताकत एकवटत वाघासारखी डरकाळी फोडली…..
“क्यों नही? बचेंगे तो और भी लढेंगे” ...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...