विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 19 December 2019

#पुण्यश्लोक_बाळाबाईसाहेब_लाडोजीराव_शितोळे #अलिजाबहाद्दुर_महादजी_शिंदे_यांची_थोर_कन्या


#पुण्यश्लोक_बाळाबाईसाहेब_लाडोजीराव_शितोळे
#अलिजाबहाद्दुर_महादजी_शिंदे_यांची_थोर_कन्या
आपल्या भारत भुमीवर अनेक महान स्त्रीयांनी जन्म घेतला आहे पण आपल्या सामाजिक दडपणाखाली अनेक स्त्रिया महान कर्तुत्व असून ही अंधारातच राहिल्या यात उमाबाईसाहेब दाभाडे, ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे, धारच्या मैनाबाई पवार, किबे घराण्यातील राखमाबाई किबे, होळकर कन्या भिमाबाई होळकर, तंजावर कन्या विजयामुक्तंबा, बडोदा महाराणी जमनाबाई गायकवाड, कोल्हापूर राणी जिजाबाई, व सईबाई उर्फ दिवाणसाहेब भोसले इत्यादी दुर्लक्षित कर्तुत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत
अशाच दुर्लक्षित कर्तुत्ववान स्त्रियांच्या यादीत बाळाबाईसाहेब शितोळे हे एक अग्रगण्य नाव आहे बाळाबाई शितोळे या अलिजाबहाद्दुर महादजी शिंदेंच्या कन्या असून त्यांचा विवाह शिंदेंचे सरदार लाडोजीराव शितोळे यांच्यासोबत झाला होता यांचे पती लाडोजीराव शितोळे व दोन मुले सिध्दोजीराव शितोळे, लक्ष्मणराव शितोळे यांच्या मृत्यूनंतर शितोळे जहागीरीचा सगळा कारभार बाळाबाईसाहेब शितोळे यांच्यावर येऊन पडला त्यांनी अत्यंत चोखपणे जहागीरी सांभाळली शिवाय रामचंद्र शितोळे हा दत्तक मुलगा गादीवर बसवून स्वतः कारभार चालवला ग्वाल्हेर घराण्याच्या कन्या असलेल्या बाळाबाई यांनी आपला भाऊ दौलतराव शिंदे यांची बायको व सर्जेराव घाटगे यांची कन्या बायजाबाई शिंदे यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सर्व सरदार एकत्र करून जनकोजी शिंदे यांना दत्तक घेउन ग्वाल्हेर गादीवर बसवले यामुळे सर्वत्र बाळाबाईसाहेब शितोळे यांचा दरारा निर्माण झाला व सर्वसामान्य जनतेला बाळाबाईसाहेब शितोळे यांच्याविषयी आपुलकी वाटू लागली
बाळाबाईसाहेब शितोळे या मोठ्या धार्मिक व श्रध्दाळू होत्या त्यांनी बरीच लोकोपयोगी कामे केली बाळाबाईसाहेब यांनी यात्रेकरूंसाठी मथुरा व वृंदावन येथे पक्का रस्ता तयार केला, जहागीरीत जागोजागी पुल बांधले, विहीरी व तलाव बांधले, पुष्कर, उज्जैन, काशी येथे मंदीरे उभारली, बनारस काशी येथे गंगानदीवर गायघाट व शिवमंदिर उभारले, काशीमध्ये भला मोठा वाडा उभारून अन्नछत्र चालू केले बाळाबाईसाहेब शितोळे यांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले होते ग्वाल्हेरची जनता बाळाबाईसाहेब यांच्यावर फार प्रेम करत होती त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना देवीचा दर्जा दिला होता समाधी स्थळावर वर्षातून एकदा त्यांची यात्रा ही भरवली जात होती .
With thanks
Zunjar Babar

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...