विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

तळबीडचे मोहिते घराणे भाग 3

तळबीडचे मोहिते घराणे
भाग 3
.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते. थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...