विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

तळबीडचे मोहिते घराणे भाग 4

तळबीडचे मोहिते घराणेSarsenapati Hambirrao Marathi Movie (2020) | Cast | Teaser ...
भाग 4
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या
कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.
संदर्भ-श्रीमानयोगी
फर्मान आफ औरंगजेबस
सभासद बखर

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...