मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 67
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------12
” गव्हरनर जनरलसाहेबांनी महाराज जनकोजीराव ह्यांस परत भेट दिली; त्याचप्रमाणे बायजाबाईसाहेब ह्यांसही परत भेट दिली. बायजाबाईसाहेबांनी रीतीप्रमाणे चिकाच्या पडद्यांतून नामदारसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं हिंदुराव घाटगे हे मराठी तहेचा बाणेदार पोषाख करून व बहुमूल्य रत्नालंकार धारण करून, नामदारसाहेबांच्या सत्कारार्थ तत्पर होते. बायजाबाईसाहेबांचे व नामदारसाहेबांचे राजकीय प्रकरणीं वगैरे बराच वेळ संभाषण झाले. नंतर त्यांनी आदबीनें सलाम करून बायजाबाईसाहेबांचा निरोप घेतला. | गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक आणि महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांची ज्या वेळी भेट झाली, त्या वेळीं चीफ सेक्रेटरी मि० म्याकूनॉटन, ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि० क्याव्हेंडिश आणि लखनौचे रेसिडेंट मेजर जॉन लो हे हजर होते. ह्या भेटीमध्ये जे संभाषण झाले, त्याचा सारांश ता. १८ डिसेंबर १८३२ च्या एका खलित्यामध्ये आला आहे. तो संक्षिप्त रीतीने येथे दाखल करितोंः “गव्हरनर जनरलसाहेबांनी महाराजांस असे सांगितले की, ज्याअर्थी उभय सरकारांमध्ये स्नेहभाव वसत आहे, त्या अर्थी महाराजांनी मजवर पूर्ण विश्वास ठेवावा, व माझी काय मदत पाहिजे ते मला मोकळ्या अंतःकरणाने कळवावे. महाराजांनीं गव्हरनर जनरलसाहेबांच्या९७ ह्या कृपाळूपणाबद्दल त्यांचे आभार मानून आपली सर्व हकीकत सांगण्यास सुरवात केली. त्या हकीकतीचा मथितार्थ इतकाच होता की, आपण आतां प्रौढ झालों असून, शास्त्राप्रमाणे व शिंद्यांच्या घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या चालीप्रमाणे राज्याचा अधिकार आपणांस मिळावा. नामदारसाहेबांनी महाराजांची सर्व हकीकत ऐकून घेऊन, त्यांचे मागणे किती चुकीचे आहे हे त्यांस समजावून सांगितले. ते ह्मणा लेः–“राज्याचा अधिकार कोणाकडून घेण्यास अथवा कोणास देण्यास । मला मुळींच अखत्यार नाही. कारण, शिंदे सरकारचे राज्य अगदीं स्वतंत्र आहे. ब्रिटिश सरकारानें कोणास मसनदीवर बसविलें नाहीं व कोणास तिच्यावरून ते काढणारही नाहींत. प्रस्तुत प्रसंगी त्यांना आपल्या राज्यकारभाराचे धोरण बदलण्याचे प्रयोजन नाहीं. हे नामदारसाहेबांचे शब्द ऐकून महाराजांनी असा प्रश्न विचारिला कीं, “मग मला दत्तक घेण्याचा हेतु काय ??? नामदारसाहेबांनी त्यांस उत्तर दिलें कीं, * तुह्मांस दत्तक घेण्याचा उद्देश, शिंद्यांच्या घराण्याचे नांव चालावें व वारसाबद्दल वादविवाद उत्पन्न होऊन पुढे विपरीत परिणाम होऊ नये, हा आहे. ब्रिटिश सरकाराने बायजाबाईकडून तुह्मांस अमकेच वर्षी गादीवर बसवावे, असा करार करून घेतलेला नाहीं. बायजाबाईच्या कृपेनें तुमचे दत्तविधान होऊन तुह्मांस शिंद्यांच्या गादीच्या वारसाचा हक्क मिळाला, हे तुह्मीं आपले मोठे भाग्य समजले पाहिजे. ह्या उपकाराची फेड तुह्मीं अशा रीतीने करू नये.” महाराजांनीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या भाषणाचा प्रतिकूल कल पाहून पुनः असा प्रश्न विचारला की, * आतां नाहीं, तर मग पुढे किती वर्षांनी मला राज्याधिकार मिळेल ??? त्यावर नामदारसाहेबांनीं ‘‘ह्या प्रश्नास आह्मी जबाब देऊ शकत नाहीं.” असे चोख उत्तर दिले. आणखी, त्यांना सामोपचाराने असे सांगितले की, “महाराज, तुह्मी या गोष्टीचा नीट विचार करा. मेजर स्टुअर्ट हेज्या वेळीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट होते, त्या वेळी त्यांनी महाराज दौलतराव शिंदे ह्यांस दत्तक घेण्याबद्दल वारंवार सूचना केली; परंतु त्यांनी ती मान्य केली नाहीं. पुढे त्यांनी मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर, चांगले अक्कलहुषारीत असतांना, आपल्यापश्चात् बायजाबाईनीं सर्व राज्यकारभार सांभाळावा, अशी इच्छा भरदरबारामध्ये प्रदर्शित केली. त्याप्रमाणे महाराज दौलतराव मृत्यु पावल्यानंतर सर्व राज्यसूत्रे बायजाबाईनीं धारण केली आहेत. गादीच्या वारसाबद्दल प्रश्न उपस्थित होऊन घोंटाळा होऊ नये, ह्मणून त्यांनीं तुह्मांस दत्तक घेतले आहे. परंतु अमक्याच वर्षी दत्तकावर सर्व राज्यभार सोंपयूं ह्मणून त्यांनी ब्रिटिश सरकाराशी करार केलेला नाहीं. सारांश, तुह्मी जे ह्या महापदावर चढला, त्याचे सर्व श्रेय बायजाबाईकडे आहे; व त्याचा संबंध ब्रिटिश सरकाराशीं मुळीच नाहीं. तुह्मांस राज्याधिकारी होण्याचा प्रसंग सुदैवाने लवकरच येईल; तोपर्यंत तुह्मीं वाट पाहिली, तर बायजाबाईनीं तुमच्याखेरीज दुस-या कोणास गादीचा वारस करूं नये एवढे मात्र आह्मी त्यांस सांगू. ह्यावर तुह्मीं विश्वास ठेवावा. परंतु असे न करितां, जर तुह्मी दंगेधोपे करून बायजाबाईस राज्यावरून काढण्याचा प्रयत्न कराल, तर मग त्याचा जो बरावाईट परिणाम होईल, तो तुमचा तुह्मांस भोगावा लागेल. अशा गडबडींत जर तुमचा खून झाला, अथवा तुह्मी कैद झाला, तर ब्रिटिश सरकार तुमचा कैवार घेऊन बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं, किंवा तुमच्या गादीच्या वारसापणाबद्दल हमी घेणार नाहीं. ह्याप्रमाणे गव्हरनरजनरलसाहेबांनी महाराजांस स्पष्ट रीतीने आपले मत कळविले व आणखीही योग्य उपदेश केला, व महाराजांनी त्याप्रमाणे वर्तन करण्याचे मान्य केले. ह्या भेटीच्या वृत्तांतावरून बायजाबाईनीं सर्व राज्यकारभार चाल९९ वावा व महाराजांनी त्यांच्या आज्ञेत राहावे, असा हिंदुस्थान सरकारचा हेतु स्पष्ट रीतीने व्यक्त होतो. परंतु ह्याप्रमाणे महाराजांच्या हातून वर्तन घडले नाही. त्यांनी पुनः आपल्या कुटिल मंत्र्यांच्या नादीं लागून, त्यांच्या मसलतीप्रमाणे बायजाबाईच्या विरुद्ध कट उभारिला, आणि त्यांच्याविरुद्ध नानाप्रकारच्या कागाळ्या ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि० क्याव्हेंडिश ह्यांचेमार्फत गव्हरनरजनरलसाहेबांकडे पाठविण्यास सुरवात केली.

No comments:
Post a Comment