मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 68
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------13
मि० क्याव्हडिश ह्यांचे मत महाराजांच्या विरुद्ध असून, त्यांना महाराजांच्या ह्या कृती पसंत होत्या, असे दिसत नाहीं. ता. २८ मार्च इ. स. १८३३ रोजी, त्यांनी महाराजांस जो खलिता पाठविला आहे, त्यांत त्यांनी त्यांची कानउघाडणी करून गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशाची त्यांना पुनः आठवण दिली आहे. एवढेच नव्हे, तर“बायजाबाई ह्या सर्व राज्याच्या मालक आहेत व इंग्रजांस त्यांच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा अधिकार पोहोंचत नाहीं. ह्याकरिता माझी तुह्मांस अशी शिफारस आहे कीं, तुह्मीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशांप्रमाणे व तुमच्या स्वतःच्या वचनाप्रमाणे वर्तन ठेवून, तुह्मीं बायजाबाईच्या आज्ञेत वागावें व कांहीं तंटेबखेडे करूं नयेत. असा वर्तनक्रम तुह्मी स्वीकाराल, तर ब्रिटिश अधिका-यांस संतोष वाटेल; आणि जर तुह्मी दंगेधोपे कराल, तर तुमची सध्याची स्थिति कांहींही असो-तुह्मी अधिक प्रतिबंधांत पडाल; आणि त्यांतून तुमची सुटका होणे अधिक कठीण पडेल. मग ब्रिटिश सरकार किंवा मी तुमच्या वतीने त्यांत बिलकूल लक्ष्य घालणार नाहीं. ........ तुह्मांस जर कांहीं महत्त्वाची गोष्ट कळवावयाची असेल व ती जर गव्हरनर जनरल ह्यांस अद्यापि कळविली गेली नसेल, तर प्रथम मी ती बायजाबाईस कळवीन; व त्यांचा त्यासंबंधाचा अभिप्राय घेऊन, नंतर तुमचा खलिता पुढे रवाना करीन, कोणत्याही कारणास्तव, तुमचा खलिता किंवा खाजगी१०० पत्रव्यवहार बायजाबाईस कळविल्यावांचून मी पुढे रवाना करणार नाहीं. तुमच्या हे लक्ष्यांत असेलच कीं, तुमची भेट घेण्याबद्दल गव्हरनरजनरलसाहेबांनी बायजाबाईची परवानगी प्रथम विचारली होती; व तुमच्या भेटीमध्ये जी हकीकत घडली, ती सर्व मागाहून त्यांस कळविली होती. त्यांच्या संमतीवांचून तुमचा व माझा किंवा गव्हरनरजनरलचा व तुमचा खाजगी पत्रव्यवहार होणे अगदीं अशक्य आहे. बाईसाहेबांनीं तुह्मांस जास्त ममतेने वागविण्याबद्दल मी त्यांस सांगावे ह्मणून तुह्मीं जे लिहिले आहे, त्याबद्दल माझे असे सांगणे आहे की, तुह्मी जर स्वतःच बाईसाहेबांस आपल्या वर्तनाने संतुष्ट कराल, तर तुह्मांस त्या फार चांगल्या रीतीने वागवितील. तुह्मी अयोग्य तक्रारी करीत राहाल व भलतेसलते विचार मनांत वागवाल, तर तुमची संकटें कमी न होता, उलट अधिक वाढतील; व आह्मी तुमच्याकरितां बिलकूल मध्यस्थी करणार नाहीं. तात्पर्य, तुह्मीं बायजाबाईंस संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; व गव्हरनरजनरलसाहेबांचे शब्द सदोदित नेत्रासमोर ठेविले पाहिजेत.| ह्याप्रमाणे महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस बायजाबाईसाहेबांच्या मर्जीप्रमाणे व आज्ञेबरहुकूम वागण्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनीही स्पष्ट रीतीने कळविले. ह्यावरून गव्हरनरजनरल व ग्वाल्हेरचे रेसिडेंट ह्यांस महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन पसंत नसून, त्याचा त्यांनी वारंवार कडक शब्दांनी कसा निषेध केला होता, हे दिसून येते. अर्थात् या सर्व हकीकतीवरून ग्वाल्हेर येथील तंट्याचे मूळ कारण काय व त्याचा अधिक दोष कोणाकडे येतो, हे चतुर वाचकांस सहज ताडितां येईल. महाराज जनकोजीराव ह्यांचे अल्पवय व 1. Letter from the Hon'ble Mr. Cavendish to Junko0 haw Scindiah, in reply to one received from the Maharaja, dated 28th March 1833. १ ० १. अपरिपक्वबुद्धि असल्यामुळे, ग्वाल्हेर दरबारांतील कुटिल व कलहप्रिय लोकांच्या ते ताब्यांत जाऊन, त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले, ह्यांत विशेष आश्चर्य नाहीं. तथापि, त्यांच्या ह्या दुर्वर्तनाने हा कलह अधिक विकोपास गेला व त्याचा परिणाम बाईसाहेबांस विनाकारण भोगावा लागला, असे ऋणण्यास हरकत नाहीं. एका हाताने टाळी वाजत । नाहीं' ह्या व्यवहारांतील ह्मणीप्रमाणे महाराजांच्या दुर्वर्तनामुळे बायजाबाईसाहेबांसही संताप व उद्वेग येऊन, त्यांच्याही हातून क्वचित् । प्रमाद घडले असतील; परंतु दोषाचा अधिक वांटा त्यांच्याकडे येतो, असे उपलब्ध माहितीवरून तरी निदान ह्मणतां येत नाहीं. ६

No comments:
Post a Comment