भाग 69
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति" व बायजाबाईसाहेबांचा वनवास-------1
जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामधील 7. कलह मिटविण्याबद्दल बाह्यात्कारें तरी निदान ग्वाल्हेरचे रेसि डेट मि० क्याव्हेंडिश ह्यांनी पुष्कळ खटपट केली. परंतु तिचा काहींएक उपयोग न होता, त्यांच्यामधील वितुष्ट अधिकच वाढत गेलें; आणि ता. १० जुलई इ. स. १८३३ रोजी ग्वाल्हेर येथे उघड रीतीने बंड झाले. महाराज जनकोजीराव ह्यांनीं ग्वाल्हेर येथील वरुण' व 'बहादुर' हे दोन कंपू अगोदरपासून आपल्याकडे अनुकूल करून घेतले होते, व त्यांचे अधिकारी जे शूर पुरभय्ये लोक होते त्यांच्याशीं वचनप्रमाण पक्के करून, गादीवर बसल्यानंतर त्यांस मोठमोठे अधिकार देण्याचे मान्य केले होते. त्याचप्रमाणे महाराजांनी कर्नल जेकब ह्यांस अनुकूल करून त्यांच्या ताब्यांतील कंपू आपल्या मदतीस घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कर्नल जेकब हे स्वतः अनुकूल न होता, त्यांचे सैन्य मात्र फितले होते. ह्याप्रमाणे सैन्याच्या मदतीची चांगली सिद्धता झाली असे पाहून, महाराजांनीं बायजाबाईसाहेबांस राजवाड्यांत कैद करून स्वतःच्या नांवाने द्वाही फिरविण्याचा निश्चय केला. ता. ८ जुलई इ. स. १८३३ रोजी ते सहज हवा खाण्याचे निमित्त करून कर्नल जेकब ह्यांच्या कंपूमध्ये गेले; व तेथून इशारत करून कांहीं तरी सैन्याची हालचाल करणार, तों त्यांच्या आगमनाची१०३ बातमी कर्नल जेकब ह्यांनीं बायजाबाईस कळविली; व महाराजांच्या हेतूप्रमाणे सैन्याने कांहीं गडबड करू नये ह्मणून सक्त ताकीद दिली. अर्थात् महाराजांचा हा बेत विसकटल्यामुळे ते निराश झाले; व त्या दिवशींची सर्व रात्र राजवाड्याबाहेर घालवून ते सकाळी रेसिडेन्सीमध्ये गेले. परंतु रेसिडेंटसाहेबांची व त्यांची भेट झाली नाहीं. तेव्हां ते एका लिंबाच्या झाडाखालीं एकसारखें धरणे घेऊन बसले. पुढे रेसिडेंटसाहेब तेथे आले व त्यांनी त्यांस आपल्या बंगल्यामध्ये नेले. तेथे त्यांचे बराच वेळ संभाषण झाले. परंतु रेसिडेंटांकडून त्यांना कांहीं मदत मिळाली नाहीं. तेव्हां शेवटीं ते निराश होऊन परत राजवाड्यांत गेले. राजवाड्यामध्ये त्यांच्या गुप्त मसलतीची बातमी कळली होती; ह्मणून तिच्यावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने त्यांनी बायजाबाईसाहेबांची भेट घेतली, व त्यांची माफी मागून झालेली चुकी पोटांत घालावी अशी त्यांची विनवणी केली; व पुनः असे करणार नाहीं ह्मणून त्यांच्याजवळ शपथ घेतली. परंतु त्यांचे हे सर्व । वर्तन मायावी होते, असे लवकरच दिसून आले. महाराज जनकोजीराव बायजाबाईसाहेबांच्या जवळ शपथक्रिया करून आपल्या महालांत गेले, त्याच रात्रीं, हुकूमसिंग नामक एक पलटणीवरचा नाईक अगोदर ठरलेल्या गुप्त संकेताप्रमाणे राजवाड्यांत चोरून गेला; व त्याने जनकोजीरावांच्या महालामध्ये शिडीवरून चढून जाऊन त्यांस अचानक उचलून खाली आणिलें. इकडे वरुण व बहादुर ह्या दोन पलटणी फितल्या असून, त्यांनी महाराजांस हस्तगत करून त्यांच्या नांवाने द्वाही फिरविण्याचा व बायजाबाईस कैद करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे त्यांनी महाराजांस हस्तगत करून फुलबागेमध्ये नेले; आणि त्या बायजाबाईस कैद करण्याच्या प्रयत्नास लागल्या. बायजाबाईसाहेबांचे बंधु हिंदुराव१०४ ह्यांनी महाराजांच्या चळवळीची गुप्त बातमी ठेविली होती. त्यांना महाराज राजवाड्यांतून पसार झाल्याचे वृत्त समजतांच, त्यांनी बायजाबाईसाहेबांवर अरिष्ट येणार असे मनांत आणून त्यांस सूचना केली. त्या वेळीं बायजाबाईसाहेब ह्या बाळाबाईच्या महालांत बसल्या होत्या. त्यांस इशारत पोहोंचतांच त्या, राजवाड्यासभोवतालच्या सर्व सैन्याची गाफिलगिरी लक्ष्यात घेऊन, अतिशय गुप्त रीतीने हिंदुरावांच्या वाड्यांत निघून गेल्या. नंतर त्यांनी निरनिराळ्या सरदार लोकांस हजर होण्याबद्दल हुकूम पाठविले; परंतु कर्नल आलेक्झांडर ह्याच्याशिवाय तेथे एकही सरदार आला नाहीं. नंतर त्या, हिंदुराव घाटगे, आपासाहेब पाटणकर आणि आलेक्झांडरचे ७०० शिपाई ह्यांस बरोबर घेऊन मेण्यांत बसून रेसिडेन्सीकडे गेल्या. त्या वेळी सर्व रस्त्यांची नाकेबंदी फितुर झालेल्या सैन्याने केली होती, आणि बायजाबाईस पकडण्याकरितां चार पलटणी आणि पंचवीस तोफा तयार करून ठेवल्या होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याची दृष्टि चुकवून आपला बचाव करणे फार कठीण काम होते. परंतु बाईसाहेबांनी मोठ्या युक्तीने विरुद्ध पक्षाच्या हातावर तुरी देऊन आपले संरक्षण केले, ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे


No comments:
Post a Comment