विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 April 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 78


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग  78

महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
 बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------4
 
  • बायजाबाईंच्या आवडीबद्दल मिसेस फेनी पार्ल्स ह्यांच्या प्रवासवृत्तामध्ये एक मौजेचा उल्लेख आहे. ही आंग्ल स्त्री ज्या वेळीं इंग्लंडास परत गेली, त्या वेळीं बायजाबाईनीं तिला आपल्या आवडीच्या तीन वस्तू इंग्लंडाहून पाठविण्याबद्दल सांगितले होते. त्या येणेप्रमाणेः१ एक अतिशय उमदी अस्सल जातीची आरबी घोडी. एक अगदीं चिमुकलेचेंडूएवढे, सफेत रंगाचे, लाल डोळ्यांचे लांब केंसाचे कुत्रे. आणि एक वाद्य वाजविणारी कळसूत्री बाहुली ! | बायजाबाईसाहेब ह्या घोड्यावर बसण्यांत पटाईत असून त्यांनी समरांगण पाहिले होते असा उल्लेख दोन आंग्ल स्त्रियांनी केला आहे. मिसेस फेनी पार्स ह्यांनी पुढील लेख लिहिला आहे:- The ladies relate, with great pride, that in one battle, her Highness rode at the head of her troops, with a lance in her hand, and her' infant in her arms ! | मिसेस ड्युबल ह्यांनी खुद्द बायजाबाईच्या तोंडचेच पुढील उद्गार दिले आहेत:- T, to0, have ridden at a battle: I lode when Wellesley Saib drove us from the field, with nothing but the saddles on which We sat. १२१ आदरातिथ्य. | बायजाबाई ह्या मनाने उदार असून आदरसत्कार करण्यांत फार तत्पर असत. ह्यांनी लॉर्ड वुइल्यम बेंटिंक लॉर्ड ऑक्लंड ह्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या भेटी घेतल्या होत्या, त्यांचा आदरसत्कार उत्तम प्रकारचा केला होता. त्या सर्व युरोपियन लोकांशी फार चांगल्या रीतीने वागत, आणि त्यांचा सत्कार करण्यांत औदार्य दाखवीत. त्यांच्या पाहुणचाराने संतुष्ट झाला नाही, असा एकही युरोपियन गृहस्थ सांपडणे विरळा. बायजाबाईसाहेबांचे हे आदरकौशल्य पाहून युरोपियन लोक त्यांची फार तारीफ करीत असत. स्वाभिमान उपचारप्रियता. बायजाबाईसाहेब ह्या फार तेजस्वी अभिमानी असून त्यांस मानपान विशेष आवडत असे त्यांत यत्किंचित् देखील अंतर पडलेले त्यांस खपत नसे. त्यामुळे त्यांच्या दरबारी लोकांस ह्याबद्दल फार काळजी बाळगावी लागत असे. त्यांत कोठे न्यून पडले तर बाईसाहेबांकडून कडक शिक्षा होत असे. ह्या त्यांच्या सन्मानप्रियतेमुळे ग्वाल्हेर दरबारच शिस्त फार कडक विशेष आदबशीर झाली होती. त्यामुळे एतद्देशीय लोकांस युरोपियन लोकांस त्याबद्दल फार जपावे लागत असे. त्यांच्या दरबारचे शिष्टाचार ह्मणजे एकप्रकारची प्रतिष्ठित शिक्षाच होऊन राहिली होती. युरोपियन लोकांनी देखील बूट काढून त्यांच्या दरबारांत गेले पाहिजे, असा त्यांचा सक्त नियम असे. परंतु तो शिंद्यांच्या स्वातंत्र्याच्या उतरत्या कलेप्रमाणे पुढे नाहींसा होत चालला. ह्या उपचारप्रियतेमुळे बायजाबाईसाहेबांच्या दरबारात नेहमीं चमत्कारिक गोष्टी घडत असत. हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे . . १८२९ सालीं ग्वाल्हेर येथे आले. त्या वेळी१२२ हिंदु दरबारच्या चालीप्रमाणे त्यांनी बूट काढून आले पाहिजे, असा आग्रह बाईसाहेबांच्या दरबारी मंडळीने केला. परंतु लॉर्ड कोंबरमियर ह्यांचे दुभाष मेजर मेकन ह्यांनीं, “जे सन्मान आह्मी इंग्लंडच्या राजाच्या दरबारी अमलांत आणितों, तेच आह्मी येथे करूं. त्यापेक्षा अधिक उपचार आह्मी करणार नाही' असे उत्तर दिले. हे उत्तर बायजाबाईसाहेबांस त्यांच्या दरबारी मंडळीस रुचलें नाहीं. त्यांचे ह्मणणे असे पडलें कीं, ‘भिन्न भिन्न देशांत सन्मानाच्या रीति वेगवेगळ्या आहेत. तेव्हां आमच्या दरबारांत ज्या असतील त्या तुह्मीं पाळल्या पाहिजेत. परंतु ही गोष्ट लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या पक्षाने मान्य केली नाहीं. अखेर होय नाहीं करितां करितां, दरबारचा समारंभ भेटी वगैरे झाल्या. ह्या दरबारामध्ये बायजाबाईसाहेबांनी सर्व युरोपियन लोकांस बुटांसह येऊ दिले. परंतु आपल्या चालीप्रमाणे दुरबारामध्ये खुच्र्या मांडितां, रुजाम्यावर गालिचे घालून, मराठी -हेची बिछायत मांडली. त्यामुळे तंग विजारी घातलेल्या ह्या आंग्ल वीरांस तिच्यावर बसणे फार कठीण पडेले. ह्यामुळे जो प्रकार घडला तो वर्णन करणे कठीण आहे !! तात्पर्य, बायजाबाईसाहेबांच्या स्वाभिमानामुळे उपचारप्रियतेमुळे ग्वाल्हेर येथे त्या काली अशा गोष्टीं वारंवार घडत असत. ह्या गोष्टीचा उल्लेख लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या चरित्रांत देखील आलेला आहे. तो येणेप्रमाणे:-- "The neighbourhood of this city was reached on the 2nd of January, 1829, when a halt took place for the purpose of settling the etiquette to be observed on this occasion. There were great difficulties in the way of coming to an arrangement, for the capital had never before been visited by a personage of such high rank as Lord Combermere. All the artifices 01

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...