मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 77
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------3
- औदार्य. बायजाबाईसाहेब ह्यांच्याजवळ द्रव्य विपुल होते व कांहीं अंशीं तेच त्यांच्या त्रासास मुख्य कारण झाले होते. तथापि त्यांनी आपल्या द्रव्याचा पुष्कळ चांगल्या रीतीने व्यय केला. त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत तीर्थयात्रा केल्या व अनेक ठिकाणीं बहुत दानधर्म केला. काशी येथे त्यांनी एक सुंदर घाट बांधिला आहे, व पंढरपूर मुक्कामीं श्रीद्वारकाधीशाचे मंदिर बांधले आहे. काशी येथील बायजाबाईचा घाट अवलोकन१ १९ करून मिसेस फेनी पार्स ह्यांनी असे लिहिले आहे की, “बायजाबाईचा घाट पाहण्यापूर्वी मला असे वाटत होते की, चिमाजीआपा पेशव्यांचा घाट सर्वात उत्तम आहे. परंतु बायजाबाई जो घाट बांधीत आहेत, तो पाहिला ह्मणजे त्याच्यापुढे पहिल्याचे सौंदर्य लुप्त होते. ह्या घाटाचा आकार इतका विस्तृत, इतका सुंदर, इतका साधा आणि इतका प्रमाणशुद्ध आहे कीं, तो पाहून मला फार हर्ष झाला. काशींतील सर्व घाटांमध्ये हा घाट अतिशय सुंदर आहे ह्यांत शंकाच नाहीं. ह्या घाटाकरितां बायजाबाईनी ३७ लक्ष रुपये खर्च करण्याचा संकल्प केला होता; परंतु त्यांच्या द्रव्यावर मध्यंतरीं विघ्नं आल्यामुळे त्यांच्या हेतूप्रमाणे काम झालें । नाहीं. पंढरपूर येथील द्वारकाधीशाचे मंदिरही असेच सुंदर आहे. ह्यासही सुमारे दोन लक्ष रुपये खर्च झाला. हे देऊळ इ. स. १८४९ सालीं बांधण्यात आले. काशी, पंढरपूर वगैरे क्षेत्रीं बायजाबाईसाहेबांनी अन्नछत्रे स्थापन केली होतीं, व तेथील देवालयांस देणग्या व उत्पन्ने पुष्कळ दिली होती. त्यांच्या दानधर्माची व देवस्थानांस दिलेल्या वर्षासनांची बरोबर माहिती मिळाली नाहीं. तथापि त्यांचे औदार्य थोर असून त्यांनी बहुत धर्मकृत्ये केलीं व सर्व जनांवर उपकार केले, असे स्थूलमानाने ह्मणण्यास हरकत नाहीं. आवड. बायजाबाईसाहेबांस घोड्यावर बसण्याची फार षोक असे. मि० फेनी पार्क्सबाई ह्यांनीं बायजाबाईचे बसण्याचे घोडे पाहिले होते. त्यांना घोड्यावर बसण्याचा नाद विशेष असून त्या अश्वपरीक्षेत फार निपुण होत्या, असे त्यांनीं वर्णन केले आहे. त्यांचा घोड्यावर बसून फेरफटका करण्याचा नित्यक्रम असे. कोणी आंग्ल स्त्रिया त्यांस भेटण्यास गेल्या, ह्मणजे त्यांना घोड्यावर बसतां येते की नाहीं, ह्याची चौकशी केल्यावांचून त्या राहत नसत; एवढेच नव्हे, तर त्या त्यांची परीक्षाही घेत
- १२० असत. त्याचप्रमाणे युद्धवार्ता विचारण्यांत त्यांना नेहमी आनंद वाटत असे.
मिसेस ड्युबर्टी नामक एका
आंग्ल स्त्रीस त्यांनी
रशियांतील युद्धाच्या गोष्टी विचारिल्या
होत्या. त्यांना आपण घोड्यावर
बसण्यांत पटाईत आहों हे
सांगण्यांत फार भूषण
वाटत असे. नेहमी
त्या वेलस्ली साहेबांच्या
वेळच्या युद्धाच्या गोष्टी सांगत;
आणि रणांगणांतून घोड्यावर
बसून आपण कसे
निसटून आलों, ते मोठ्या
कौतुकाने व गवर्ने
१ । निवेदन
करीत. त्यांनी आपल्या
जवळच्या सर्व दासींना
व सरदारांच्या स्त्रियांना
घोड्यावर बसण्यास शिकविले होते,
व बायकांच्या घोडेस्वारांची
एक स्वतंत्र पलटणही
तयार केली होती. !


No comments:
Post a Comment