मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 80
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------6
प्राणिशास्त्रावरील कोणत्याही प्रसिद्ध ग्रंथामध्ये विसल नांवाचा प्राणी झोपी गेल्याचा कोठे उल्लेख सापडत नाहीं; परंतु एखाद्या दक्ष पारध्यास तें गाढ निद्रेत असलेले कदाचित् सांपडले असेल, असेही आपण खरे समजू; परंतु बायजाबाई कधीं निद्रित असलेली एकाही रेसिडेंटास आढळून आली असेल किंवा नाहीं, ह्याची मात्र शंका आहे. कारण, ती डोळ्यांमध्ये तेल घालून रेसिडेन्सीमधील गुप्त राजकारणे एकसारखी पाहत असे. बायजाबाईमध्ये आशिया खंडांतील लोकांचे सर्व गुण वसत होते. एवढेच नव्हे, तर तिच्यामध्ये आणखी काही विशेष गुण होता. ती फार१२७ धूर्त, मायावी, मनसबेबाज, दक्ष अशी होतीच-परंतु तिच्यामध्ये आणखी । विशेष गुण असा होता की, तिला मोह पाडून फसविण्यासारखे तिच्यामध्ये एकही व्यंग नव्हते. ह्या वस्ताद स्त्रीला आपल्याकडून सरकार उसने पैसे घेणार ही गुप्त बातमी कळली; आणि स्वाभाविकपणे, आपल्या खजिन्यावर संकट येणार ह्मणून तिला भीतिही उत्पन्न झाली. तेव्हां तिने एक नामी युक्ति योजिली. तिने आपले खाजगी कारभारी दादा खाजगीवाले ह्यांस बोलाविले; आणि रेसिडेंटसाहेब आपल्याकडे पैसे मागण्याकरितां येण्यापूर्वीच, त्यांस रेसिडेंटसाहेबांकडे पाठविले; आणि त्यांच्याकडून त्यांस असे विचारविलें कीं, ४८ आमचे सैन्य पगार न मिळाल्यामुळे अगदीं बेदिल होऊन दंगा करण्याच्या बेतांत आहे, ह्याकरितां ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये आपण मेहेरबानी करून कर्ज देववाल काय ???
हा प्रश्न ऐकून रेसिडेंटसाहेब मनांतल्यामनांत थिजून गेले. अर्थात् ग्वाल्हेरच्या खजिन्यांत जर पैसे नाहींत व तेथील सैन्याच्या पगाराची अशी रड आहे, तर इंग्रज सरकारास कोठून पैसे मिळणार ?
अशाप्रकारे दोन्ही गोष्टींचा हा चमत्कारिक मेळ बसलेला पाहून, रेसिडेंट कर्नल स्टुअर्ट हे निरुत्तर झाले; व त्यांनी मोठ्या दिलगिरीने व विस्मयाने हिंदुस्थान सरकारास असे कळविलें, “महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनाच पैशाची फार जरूर आहे. त्यांचा खाजगी कारभारी मजकडे येऊन त्यानेच मला असा प्रश्न विचारिला आहे की, ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये उसने मिळतील काय ???
| हे पत्र गेल्यानंतर काय घडले असेल हे कल्पनेनें कोणासही सहज ताडितां येईल. ज्या अर्थी बायजाबाई ह्याच द्रव्याच्या अडचणींत असून, ग्वाल्हेर येथील फौजेचा पगार तुंबला आहे व ती फौज बिथरली आहे, त्या अर्थी तेथून पैशाची अपेक्षा करणे योग्य नाही, असे समजून गव्हरनरजनरलसाहेबांस तो विचार सोडून देणे भाग पडले असेल हें।१२८ साहजिक आहे. तात्पर्य, अशा रीतीने बायजाबाईसाहेबांनी आपली मुत्सद्दीगिरी चालवून ग्वाल्हेरच्या खजिन्यावर आलेले संकट दूर केले. |
चातुर्य. |
बायजाबाईसाहेबांच्या चातुर्याच्या व शहाणपणाच्या गोष्टी अनेक प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं मौजेची एक गोष्ट येथे दाखल करितों. बायजाबाईसाहेबांच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना एके वेळीं त्यांनी तुळसीच्या लग्नाचा टोलेजंग समारंभ केला; आणि शिंदे घराण्यांतील पुरुषांच्या लग्नास जसा खर्च येतो, तसा प्रचंड खर्च केला. तुळसीच्या लग्नास असा मनस्वी खर्च झालेला पाहून, त्यांचे दिवाण बापूजी रघुनाथ ह्यांनी त्यांच्याजवळ नापसंती दर्शविली. बाईसाहेबांनी त्यांस कांहींएक उत्तर न देता, ती गोष्ट लक्ष्यांत ठेवून, लग्नसमारंभ उत्तम प्रकारे साजरा केला. नंतर एके दिवशी त्यांनी शिंद्यांच्या घराण्यांतील चालीप्रमाणे लग्नाप्रीत्यर्थ नजरनजराणे व अहेर स्वीकारण्याचा दरबार भरविला; व त्यास सर्व सरदार, शिलेदार, मुत्सद्दी, वगैरेंनी हजर राहून रीतीप्रमाणे लग्नाचे अहेर करावेत, असा हुकूम सोडिला. त्या दिवशीं बाईसाहेब स्वतः दरबारांत आल्या, व त्यांनी आपल्या गादीजवळ राधाकृष्णांच्या मूर्ती मांडून त्यांच्यापुढे सर्व नजरनजराणा व आहेर ठेवविला. अशा मंगल प्रसंगी नजरनजराणे व अहेर करणे सर्व लोकांस अगदी योग्य वाटून त्यांनी मोठ्या संतोषाने ते केले. येणेप्रमाणे दरबार झाल्यानंतर बाईसाहेबांनी दिवाणास बोलावून आणून एकंदर नजरनजराण्यांची वगैरे जमा काय झाली ते विचारले. दिवाणांनी खर्चापेक्षां जमेची रक्कम अधिक झाल्याचे सांगितले; आणि बाईसाहेबांच्या शहाणपणाची तारीफ करून आपला शब्द परत घेतला. -
जुन्या चालीरीतींविषयी अभिमान. बायजाबाईसाहेबांस आपल्या हिंदु चालीरीतींचा व शिंद्यांच्या दरबारां१२९ तील जुन्या पद्धतींचा फार अभिमान असे, व त्या पाळण्याविषयी त्या फार दक्ष असत. एके प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे बायजाबाईसाहेबांस भेटण्याकरितां मुद्दाम उज्जनीस गेले. त्यांच्याबरोबर लवाजमा अगदी बाताबेताचा असून त्यांचा सर्व पोषाख इंग्रजी नमुन्याचा-बूट पाटलुणीचा-होता.


No comments:
Post a Comment