मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 81
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांच्या काही गोष्टी-------7
महाराज प्रवासाच्या श्रमाने थकून गेले होते; ह्मणून ते त्याच पोषाखानिशीं बाईसाहेबांस भेटण्याकरितां एकदम राजवाड्यांत गेले. तेव्हां त्यांनीं, महाराजांचा पोषाख वगैरे शिंदे सरकारास शोभण्यासारखा नाहीं व राजकीय इतमाम त्यांच्याबरोबर नाहीं असे पाहून, महाराजांची भेट घेतली नाहीं; आणि असा निरोप पाठविला की, “चाबुकस्वारास मी भेटत नाहीं. महाराज शिंदे मला भेटण्यास येतील, तेव्हा त्याने त्यांजबरोबर यावें. शिंदे सरकार इतमामावांचून कधीही येणार नाहींत. नंतर महाराज जयाजीराव हे आपल्या दरबारी चालीप्रमाणे भालदार चोपदार ललकारत, सर्व लवाजमा व स्वारीचीं राजचिन्हें बरोबर घेऊन, मोठ्या थाटाने बाईसाहेबांस भेटण्यास गेले. नंतर बाईसाहेबांनी त्यांची भेट घेऊन स्वागतपूर्वक त्यांचा गौरव केला. ह्या दिवसापासून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी आपल्या स्वदेशी रीतिरिवाजांत कधीही अंतर पडू दिले नाहीं असें ह्मणतात. बायजाबाईसाहेबांचे बंधु. बायजाबाईसाहेबांचे बंधु जयसिंगराव ऊर्फ हिंदुराव बाबा घाटगे ह्यांची थोडीशी माहिती बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या पांचव्या भागांत दिली आहे. तथापि त्यांचा संबंध बायजाबाईसाहेबांच्या जीवनचरित्रांत विशेष असल्यामुळे त्यांच्याबद्दल आणखी थोडी माहिती सादर करणे अवश्य आहे. हिंदुराव बाबा घाटगे हे बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यसूत्रे असतांना त्यांचे मुख्य मसलतदार होते, व त्यांचे बायजाबाईसाहेबांच्या दरबारी विशेष वजन होते. पुढे बायजाबाई१३० साहेबांच्या हातून राज्यकारभार जाऊन त्यांस स्थलांतर करावे लागले, त्या वेळी हे त्यांच्याबरोबर गेले होते. पुढे फत्तेगड येथून इ. स. १८३५ मध्ये बायजाबाईसाहेबांस अलहाबादेस आणिल्यानंतर, ह्यांस इंग्रज सरकाराने पेनशन करून दिल्लीस ठेविलें.
दिल्ली येथे हिंदुराव बाबांचा वाडा प्रसिद्ध असून त्यांची युरोपियन लोकांत विशेष चाहा असे. हिंदुराव बाबा रूपाने बायजाबाईसारखे सुंदर नव्हते. त्यांची एक मोठी तसबीर दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्ये ठेविलेली आहे; तिच्यावरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना करितां येते. ‘कलकत्ता रिव्ह्यू' मधील एका लेखकाने असे लिहिले आहे की, भालकम साहेबांनी कृष्णाकुमारीच्या सौंदर्याची कल्पना तिच्या भावाच्या सुस्वरूप मुद्रेवरून बसविली आहे. त्याप्रमाणे पाहूं जातां, दिल्ली येथील पदार्थसंग्रहालयामध्ये असलेल्या हिंदुरावांच्या तसबिरीवरून बायजाबाईचे स्वरूप मोठे सुंदर होते असे मानितां येत नाही. त्या तसबिरीवरून, हिंदुरावांचे नेत्र तेवढे पाणीदार असून, त्यांचे शरीर कृष्णवर्ण व स्थूल असावे असे दिसून येते. परंतु बायजाबाईसाहेबांसंबंधाने हे अनुमान चुकीचे आहे. हिंदुराव जरी विशेष सुस्वरूप नव्हते, तरी बायजाबाईसाहेब ह्या सुस्वरूप होत्या, ह्याबद्दल मुळीच शंका नाहीं.
हिंदुराव बाबांबद्दल क्याप्टन मुंडी व मेजर आर्चर ह्या दोन लष्करी अधिका-यांनीं, इ.
स. १८२९ मध्ये,
लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या
भेटीच्या प्रसंगानुरोधाने जे लेख
लिहिले आहेत, ते विशेष
अनुकूल नाहींत. त्यावरून युरोपियन
लोकांस प्रिय होण्यासारखे मार्दव
त्या वेळी ह्यांच्या
ठिकाणीं होते असे
दिसत नाही. मराठी
त-हेची ऐट,
स्वाभिमान आणि स्वातंत्र्य
हे गुण ह्यांच्या
ठिकाणी विशेष होते. एशियाटिक
जर्नल मधील एका
लेखकानें, इ. स.
१८२७ सालीं दौलतरावांचे
मृत्युर्वृत्त लिहितांना, असे लिहिले
आहे की, “बायजाबाईसाहेबांचे
बंधु हिंदुराव ह्यांचे
दौलतरावांवर अखेर अखेर
फार वजन होते.
हे बाणेदार मराट्याची
एक हुबेहूब प्रतिमा
होते; आणि ह्यांना
जर संधि प्राप्त
झाली असती, तर
हे प्रतिशिवाजीच निघाले
असते. हिंदुरावांची ऐट
व बाणेदारपणा बायजाबाईसाहेबांचे
स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर
आपोआप नाहींसा झाला
होता. इंग्रज सरकाराने
ह्यांस पेनशन करून देऊन
दिल्लीस ठेविल्यानंतर हे युरोपियन
लोकांचे प्रिय भक्त बनले
होते. ह्यांच्याबद्दल बीलसाहेबांनी
असे लिहिले आहे
कीं हे हिंदुस्थानांतील
इंग्रज लोकांचे चाहते असून
त्यांस ते फार
प्रिय झाले होते.
ह्यावरून हे नेहमी
युरोपियन लोकांत मिळून मिसळून
वागत असत; व
त्यांना प्रिय झाले होते
असे दिसून येते.
इंग्रजांचे प्राबल्य व त्यांची
युद्धसामग्री पाहून त्यांच्यापुढे कोणाचा
टिकाव लागणार नाही
अशी हिंदुरावांची पुढे
पुढे समजूत झाली
होती. ह्याबद्दल एक
मौजेची आख्यायिका एका युरोपियन
गृहस्थाने लिहिली आहे. ती
येणेप्रमाणेः–इ. स.
१८३८ मध्ये फेरोजपूर
मुक्कामी इंग्रज व शीख
लोक ह्यांचा कांहीं
1. राजकीय गोष्टींसंबंधाने विचार
करण्याकरितां दरबार भरला होता.
त्या वेळीं गव्हरनर
जनरल लॉर्ड ऑक्लंड
हे इंग्रजांच्या बाजूने
व महाराज रणजितसिंग
हे शीख लोकांच्या
वतीने आले होते.
त्यांमध्ये हिंदुरावही एक सभासद
होते. ते, गव्हरनरजनरल
व महाराज रणजितसिंग
ह्यांच्या भेटीच्या वेळीं एकदम
पुढे जाऊन बसले.
त्या वेळी एका
शीख सरदाराने त्यांस
प्रश्न विचारला की, “आपण
इंग्रज सरकाराचे एक पेनशनरच
आहांत ना ?? त्या
वेळीं हिंदुरावांनी असे
खोंचदार उत्तर दिले की,
“होय, मी इंग्रजांचा
पेनशनर आहे; व
आपणही आमच्यासारखे लवकरच
व्हाल !” हे उत्तर
ऐकून तो स्वाभिमानी
शीख सरदार मनांतल्यामनांत
ओशाळा झाला. हिंदुराव
बाबा इ. स.
१८५६ मध्ये मृत्यु
पावले. पुढे इ.
स. १८५७ सालीं
दिल्ली येथे बंड
झाले. त्या वेळीं
हिंदुरावांचा वाडा ही
एक युद्धांतील मान्याची
जागा होऊन राहिली
होती. येथे फार
घनघोर युद्ध झाले.
त्यावरून दिल्ली येथील बंडाच्या
इतिहासांत हिंदुरावांच्या वाड्याचे नांव प्रसिद्धीस
आले. त्यामुळे हिंदुराव
हेही बंडवाले होते
असा युरोपियन लोकांचा
समज होऊन, पुष्कळ
ग्रंथकारांनी त्यांस पुनः जीवंत
करून लढावयास लाविलें
आहे !! परंतु ते सर्व
चुकीचे आहे. हिंदुराव
बाबा ह्यांनी कागल
येथे बांधलेला राजवाडा
व किल्ला अद्यापि
अस्तित्वांत आहे; व
त्यांचे वंशज श्रीमंत
पिराजीराव बापूसाहेब घाटगे सर्जेराव
बजारत-मा-आब
हे तेथील जहागिरीचा
उपभोग घेत आहेत.


No comments:
Post a Comment