#८_फेब्रुवारी_१६६५
#छत्रपती_शिवाजी_महाराजांची _बसनूर_मोहिम
आजपासून सुमारे ३५३ वर्षांपूर्वी म्हणजेच दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी एक हिंदू राजा सिंधूबंदी व धा्र्मिक चाली रिती झुगारून स्वतः सैन्याचं नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलिकडील राज्यावर आरमारी मोहिम काढतो हि तत्कालीन हिंदुस्थानच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे.
हिंदुस्थानच्या हजारो वर्षांच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना, अनेक धार्मिक चाली रितींना ऊत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच -सिद्दी
यांच्याशिवाय अन्य कोणासही परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महराजांनी दि.
२४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण-भिवंडी काबीज करून तेथे मराठा आरमाराची (
हिंदुस्थानी आरमाराची) मुहूर्तमेढ रोवली.
या विलक्षण घटनेनंतर अवघ्या ८ वर्षांमध्ये समुद्रावरील प्रबळ अशा पोर्तुगीज व डचांच्या विरोधात तसेच कर्नाटक प्रांतातील प्रबळ आदिलशाही सत्तेविरोधात शिवरायांनी आरमारी मोहिम काढली.
एक हिंदू राजा सिंधुबंदी व धार्मिक चालीरीती झुगारून देऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलीकडील राज्यावर आरमारी मोहीम काढतो हि तत्कालीन भारताच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे.
आपल्या आरमारी अधिकारी व सेनेला पाठवून त्यांनी हि मोहिम पूर्ण केली असती मात्र एवढी मोठी जोखीम पत्करून शिवरायांनी हि मोहिम काढली व शत्रूने कोणतीही हालचाल करायच्या आत ती पूर्ण देखील केली.
या बसनूर मोहिमेचे फार मोठे पडसाद मराठा व हिंदुस्थानी समुद्री इतिहासावर पडले. त्यामुले समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकते हा दृढ आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला आणि भविष्यात मराठा आरमाराने आपल्या यशाची पताका हिंदी महासागरावर फडकत ठेवली.
छत्रपती शिवाजीमहाराज हे भारताच्या इतिहासातील गेल्या १५०० वर्षात समुद्रमार्गे स्वारी करणारे पहिले राजे आहेत. या देशातील लोकांनी, राजांनी जेंव्हा आरमाराचा विचारही केला नव्हता तेव्हा महाराजांनी आरमार बांधायला घेतले. दूरदृष्टी म्हणतात ती अशी. १६५७ महाराजांनी आरमार बांधणीकडे नियोजनपूर्वक लक्ष घातले. आणि त्या आरमाराची परीक्षा घेण्याचे महाराजांनी ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून १६६४ च्या पावसाळ्यानंतर मराठ्यांचे गुप्तहेर पार बार्सिलोर पर्यंत जाळे टाकून आले.
महाराजांच्या आरमारातील काही जहाजे पार भटकळ बंदरापर्यंत निरीक्षणाच्या मोहिमेपर्यंत गेली होती आणि आता मोहिमेची पूर्ण तयारी झाली होती. याचकाळात मिर्झाराजा जयसिंग औरंगाबादेच्या पुढे आला होता. तो लवकरच पुण्याच्या दिशेने आपले लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यात घुसणार होता.
अर्थात मोघलांची स्वराज्यावर स्वारी म्हणजे प्रचंड नासधूस आणि जाळपोळ. म्हणजे आता मोघलांच्या आक्रमणाला सामोरे जायचे म्हणजे आर्थिक उभारणी करणे ओघानेच आले. महाराजांची मोहिमेची जय्यत तयारी झाली होती. मिर्झाराजांनी त्यांच्या अक्कलहुशारी प्रमाणे डाव टाकला खरा परंतु त्यामुळे महाराजांचे काही बिघडले नाही. त्याने स्वराज्याच्या भूभागाची नाकेबंदी करणे हाती घेतले होते पण त्याने आरमार आणि किनारपट्टी हा विषय लक्षात घेतलं नाही.
आपल्या मोहिमेची वार्ता महाराजांनी गुप्त ठेवून इकडे मिर्झाराजाला बेसावधच ठेवला परंतु तिकडे सागरावरील शत्रूचा कानोसा घेणेही आवश्यक होते. पोर्तोगीज आणि इंग्रज हे दोन हुशार शत्रू संधी पाहून इकडे तिकडे उड्या मारणारे रंग बदलू सरडे होते. त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. महाराज संधीची वाट पाहत होते आणि तशी परिस्थिती निर्माण झाली. ८ फेब्रुवारी फेब्रुवारी १६६५ ला पोर्तोगीजानी मुंबई हे बेट इंग्रजांना हुंड्यात आंदण म्हणून देण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमासाठी पोर्तोगीज सगळे आरमार घेऊन मुंबई ला आले होते आणि नेमके याच वेळी महाराजांनी आपले सुसज्ज आरमार मालवण सिंधुदुर्ग मधून बाहेर काढले.
कोकणातून गोव्याच्या बाजूला जायचे तर मध्य गोवा आणि तेथील पोर्तोगीज मध्ये येणार हे ठरलेले. म्हणून महाराजांनी त्यांना मुंबईकडे येऊ दिले आणि मग आपण आरमारासह त्या दिशेने निघाले. भारताच्या इतिहासातील या पहिल्या गनिमी काव्याच्या मोहिमेवर महाराजांसोबत सात हजार नौसैनिक, तीन गलबते आणि ८५ छोटी गलबते होती.
महाराज गोवा कारवार कुमठा होनावर भटकळ असा प्रवास करत गांगुली या बसनूर जवळील बंदरापाशी १३ फेब्रुवारीला १८५ सागरी मैलांचा प्रवास करून पोहचले. इथल्या खादीचे पात्र मुखापाशी अत्यंत चिंचोले असल्यामुळे महाराजांनी येथेच आपली गलबते थांबवली व भूमार्गाने ते बसनूर वर चालून गेले. बसनूर शहर सकाळी गुलाबी झोपेत असताना मराठे अचानक तेथे येऊन प्रकट झाले आणि हि बातमी कोणाला लागूच नये म्हणून महाराजांनी आपण मोगलांवर आक्रमण करण्यासाठी जुन्नर वर चाल करून जात आहोत अशी बतावणी केली होती. समुद्रमार्गे या शहरावर कोणी चाल करून येईल याची कोणी कल्पना देखील केली नव्हती.
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
#छत्रपती_शिवाजी_महाराजांची
आजपासून सुमारे ३५३ वर्षांपूर्वी म्हणजेच दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी एक हिंदू राजा सिंधूबंदी व धा्र्मिक चाली रिती झुगारून स्वतः सैन्याचं नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलिकडील राज्यावर आरमारी मोहिम काढतो हि तत्कालीन हिंदुस्थानच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे.
हिंदुस्थानच्या हजारो वर्षांच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना, अनेक धार्मिक चाली रितींना ऊत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच
या विलक्षण घटनेनंतर अवघ्या ८ वर्षांमध्ये समुद्रावरील प्रबळ अशा पोर्तुगीज व डचांच्या विरोधात तसेच कर्नाटक प्रांतातील प्रबळ आदिलशाही सत्तेविरोधात शिवरायांनी आरमारी मोहिम काढली.
एक हिंदू राजा सिंधुबंदी व धार्मिक चालीरीती झुगारून देऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलीकडील राज्यावर आरमारी मोहीम काढतो हि तत्कालीन भारताच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे.
आपल्या आरमारी अधिकारी व सेनेला पाठवून त्यांनी हि मोहिम पूर्ण केली असती मात्र एवढी मोठी जोखीम पत्करून शिवरायांनी हि मोहिम काढली व शत्रूने कोणतीही हालचाल करायच्या आत ती पूर्ण देखील केली.
या बसनूर मोहिमेचे फार मोठे पडसाद मराठा व हिंदुस्थानी समुद्री इतिहासावर पडले. त्यामुले समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकते हा दृढ आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला आणि भविष्यात मराठा आरमाराने आपल्या यशाची पताका हिंदी महासागरावर फडकत ठेवली.
छत्रपती शिवाजीमहाराज हे भारताच्या इतिहासातील गेल्या १५०० वर्षात समुद्रमार्गे स्वारी करणारे पहिले राजे आहेत. या देशातील लोकांनी, राजांनी जेंव्हा आरमाराचा विचारही केला नव्हता तेव्हा महाराजांनी आरमार बांधायला घेतले. दूरदृष्टी म्हणतात ती अशी. १६५७ महाराजांनी आरमार बांधणीकडे नियोजनपूर्वक लक्ष घातले. आणि त्या आरमाराची परीक्षा घेण्याचे महाराजांनी ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून १६६४ च्या पावसाळ्यानंतर मराठ्यांचे गुप्तहेर पार बार्सिलोर पर्यंत जाळे टाकून आले.
महाराजांच्या आरमारातील काही जहाजे पार भटकळ बंदरापर्यंत निरीक्षणाच्या मोहिमेपर्यंत गेली होती आणि आता मोहिमेची पूर्ण तयारी झाली होती. याचकाळात मिर्झाराजा जयसिंग औरंगाबादेच्या पुढे आला होता. तो लवकरच पुण्याच्या दिशेने आपले लाखभर सैन्य घेऊन स्वराज्यात घुसणार होता.
अर्थात मोघलांची स्वराज्यावर स्वारी म्हणजे प्रचंड नासधूस आणि जाळपोळ. म्हणजे आता मोघलांच्या आक्रमणाला सामोरे जायचे म्हणजे आर्थिक उभारणी करणे ओघानेच आले. महाराजांची मोहिमेची जय्यत तयारी झाली होती. मिर्झाराजांनी त्यांच्या अक्कलहुशारी प्रमाणे डाव टाकला खरा परंतु त्यामुळे महाराजांचे काही बिघडले नाही. त्याने स्वराज्याच्या भूभागाची नाकेबंदी करणे हाती घेतले होते पण त्याने आरमार आणि किनारपट्टी हा विषय लक्षात घेतलं नाही.
आपल्या मोहिमेची वार्ता महाराजांनी गुप्त ठेवून इकडे मिर्झाराजाला बेसावधच ठेवला परंतु तिकडे सागरावरील शत्रूचा कानोसा घेणेही आवश्यक होते. पोर्तोगीज आणि इंग्रज हे दोन हुशार शत्रू संधी पाहून इकडे तिकडे उड्या मारणारे रंग बदलू सरडे होते. त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. महाराज संधीची वाट पाहत होते आणि तशी परिस्थिती निर्माण झाली. ८ फेब्रुवारी फेब्रुवारी १६६५ ला पोर्तोगीजानी मुंबई हे बेट इंग्रजांना हुंड्यात आंदण म्हणून देण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमासाठी पोर्तोगीज सगळे आरमार घेऊन मुंबई ला आले होते आणि नेमके याच वेळी महाराजांनी आपले सुसज्ज आरमार मालवण सिंधुदुर्ग मधून बाहेर काढले.
कोकणातून गोव्याच्या बाजूला जायचे तर मध्य गोवा आणि तेथील पोर्तोगीज मध्ये येणार हे ठरलेले. म्हणून महाराजांनी त्यांना मुंबईकडे येऊ दिले आणि मग आपण आरमारासह त्या दिशेने निघाले. भारताच्या इतिहासातील या पहिल्या गनिमी काव्याच्या मोहिमेवर महाराजांसोबत सात हजार नौसैनिक, तीन गलबते आणि ८५ छोटी गलबते होती.
महाराज गोवा कारवार कुमठा होनावर भटकळ असा प्रवास करत गांगुली या बसनूर जवळील बंदरापाशी १३ फेब्रुवारीला १८५ सागरी मैलांचा प्रवास करून पोहचले. इथल्या खादीचे पात्र मुखापाशी अत्यंत चिंचोले असल्यामुळे महाराजांनी येथेच आपली गलबते थांबवली व भूमार्गाने ते बसनूर वर चालून गेले. बसनूर शहर सकाळी गुलाबी झोपेत असताना मराठे अचानक तेथे येऊन प्रकट झाले आणि हि बातमी कोणाला लागूच नये म्हणून महाराजांनी आपण मोगलांवर आक्रमण करण्यासाठी जुन्नर वर चाल करून जात आहोत अशी बतावणी केली होती. समुद्रमार्गे या शहरावर कोणी चाल करून येईल याची कोणी कल्पना देखील केली नव्हती.
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:
Post a Comment