विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 April 2020

!! छञपती शिवराय महाराज जन्म !!

!! छञपती शिवराय महाराज जन्म !!
कविँद्राने शिवभारतातील शिवराजप्रभवो नामक
सहाव्या अध्यायात छञपती शिवराय महाराज
यांच्या जन्मासंबंधी विस्त्रुत माहिती वर्णिली आहे
ती पुढिलप्रमाणे =

१) तेजोमय गर्भ धारण
करणार्या त्या जाधवरावांच्या कन्येने
त्या समयी भुतलाला शोभा आणली. जिजाऊना डोहाळे
लागले ते देखिल अद्भुतच, हत्तीवर, वाघावर
आणी गडावर आरोहण करावे, शुभ्र छञाखाली सुवर्ण
सिँहासनावर स्थिर बसावे, झेंडा उंच उभारावा, सुंदर
चौर्या ढाळुन घ्याव्या, दुंदुभिध्वनि ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तलवार आणी चिलखत घालुन लढाया कराव्या, गड हस्तगत करावे, विजयश्री मिळवावी, मोठमोठी दाने
करावी, धर्मस्थापना करावी, असे अनेक प्रकारचे डोहाळे
जिजाऊना प्रतिदिन होऊ लागले.

२) पुढे ती दिव्यतेजोमय व दिव्यरुप राणी बाळंतघरात शोभु लागली. तेथे सुईणपणात कुशल आणी कुलशीलवान अशा व्रुद्ध स्ञिया राञंदिवस
बसल्या होत्या. गर्भिणीला उपचार करण्यात
अनुभविक, उत्तम हातगुणाचे आणी विश्वासु असे वैद्य
अश्रांतपणे उंबर्यात बसले होते. चुना दिल्याने
लखलखित दिसणार्या भिंतीवर स्वस्तिके
काढलेली होती. त्याच्या शुभ्र
छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या.

३) शिवजन्म =
"भुबाणप्राणचन्द्राद्वैः सम्भिते
शालिवाहने !
शके संवत्सरे शुक्ले प्रव्रुत्तेचोत्
तरायणे !!26!!
शिशिरर्तौ वर्तमाने प्रशस्ते
मासि फाल्गुने !
क्रुष्णपक्षे त्रुतीयायां निशि लग्ने
सुशोभने !!27!!
अनुकुलतरैस्तुंगसंश्रयैः पऩ्चभिर्ग्रहैः !
व्यंजिताशेषजगतीस्थिरसाम्राज्यवैभवम् !!28!!
अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं !
कमनीयतमग्रीवमुन्नतस्कन्धमण्डलम् !!29!!
अलिकान्तमिलत्कान्तकुन्तलाग्रीवराजितम् !
सरोजसुन्दरद्रुशं नवकिँशुकनासिकम् !!30!!
सहजस्मेरवदनं घनगंभीरनिस्वनम् !
महोरस्कं महाबाहुं
सुषुवे साभ्दुतं सुतम् !!31!!

**अर्थ**=
शालिवाहन शके
1551 शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर
ञुतुमध्ये फाल्गुन वद्य ञुतियेला राञी शुभ
लग्नावर, अखिलप्रुथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे
पाच ग्रह अनुकुल व उच्चीचे असताना तिने {जिजाऊनी}
अलौकिक पुञरत्नास जन्म दिला {१९ फेब्रु
१६३०} .
त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर
निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच
होते, त्याच्या कपाळावर सुंदर कुंतलाग्रे पडल्यामुळे ते
मोहक दिसत होते, त्याचे नेञ कमळाप्रमाणे
सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख
स्वभावतःच हसरे, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल
आणी बाहु मोठे होते.

४) यतः शिवगिरेर्मुर्न्धि जातः स
पुरुषोत्तमः !
ततः प्रसिद्धा लोके$स्य शिव
इत्याभिधा$भवत् !!63!!

**अर्थ**
शिवनेरी किल्ल्यावर या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणुन त्याचे "शिव" असे
नाव लोकात प्रसिद्ध झाले.

५) शिवभारता व्यतिरिक्त
शिवभारताशी तंतोतंत जुळणारी छञपती शिवराय
जन्मतिथी शिवशकावली या ग्रंथात देखिल आढळते
ती पुढिलप्रमाणे=
"शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे
फाल्गुन वद्य ३ शुक्रवार हस्त घटी १८ पळे ३२ गंड ५/७
ते दिवसी राजश्री सिवाजीराजे शिवनेरीत
उपजले" {शि.च.प्र.प्रु.६५} म्हणजे १९ फेब्रु १६३० होय
आणी हि तिथी शिवभारतातील तिथीशी तंतोतंत जुळते.

७) तसेच बिआवर संस्थानातील पंडीत मीठालाल व्यास
यांच्या संग्रहातील जुन्या बाडात शिवसमकालिन
शिवराम ज्योतिष हस्तलिखित
शिवरायांची जन्मकुंडली मिळाली ती देखील
शिवभारतातील तिथीशी तंतोतंत जुळते ती पुढिलप्रमाणे
= "संवत १६८६ फाल्गुन वदि ३ शुक्रे उ.घटी ३०/९
राजा शिवाजी जन्मः ! र १०/२३ ल ४/२९."
यावरुन सुर्यास्तानंतर लौकरच शिवजन्म झाला असे ठरते.

८) जन्मास आलेल्या बाळाचे जातकर्म लगेच विधिद्न
पुरोहितानी यथाविधी केले. राजपत्नीच्या त्या बालकास
तो आत आणी बाहेर सर्वञ संचार
करणारा सर्वव्यापी असुनही बाहेर नेण्यात येऊन
त्याला त्यानी सुर्यदर्शन दिले. त्या राजकुमाराचे
उपवेशन आणी अन्नप्राशन हे संस्कार
यथाविधि आणी यथाक्रम करण्यात आले.

९) ]नंतर दर्याखानास आपल्या बाणानी विद्ध करुन
आणी त्याचा गर्वहरण करुन
विजयी होत्साता शहाजीराजा सुद्धा शिवनेरीस
आला. नित्य पराक्रम
गाजवणारा तो शहाजीराजा, संभाजीचा धाकटा भाऊ
कमलनेञ शिवराय यांचे आनंदाने मुखावलोकन
करता झाला. त्यासमयी त्या राजाने आनंदित होऊन
गाई, मोहरा, हत्ती, घोडे आणी रत्ने ही वाटली.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩जय शंभुराजे 🚩

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...