विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 April 2020

#भवानीबाई_शंकरजी_राजे_महाडीक (छत्रपती संभाजी महाराजांची कन्या)

#भवानीबाई_शंकरजी_राजे_महाडीक (छत्रपती संभाजी महाराजांची कन्या) यांची समाधी.
_____श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात हे महाडला आले महाडवरून त्यांना महाडीक असे आडनाव पडले त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मोकदमी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .
___ मुलगा हरजी महाडीक हे शिवरायांचे विश्वासू व सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी महाडीक यांच्या कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच ठेवली ___.
पुढे हरजीराजे कांचीवर चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या
मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29 सप्टेंबर 1689 ला तोफेचा गोळा लागून जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले. _____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या. स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांच्या मुलीची समाधीची अवस्था पाहून फार वाईट वाटते. हररजीराजे महाडकांचा वाडा आहे सध्या तारळे येथे महाडकांचे वंशज ही आहेत.


No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...