चहूकडे संताजी - धनाजी
===============
मराठी सैन्य कर्नाटकात जागोजागी पसरले. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बुबाजी पवार, आटोळे, डफळे, मोरे किती बहाद्दरांची नावे घ्यावीत? पुढली सहा वर्षात संताजींनी शेख निजाम, सरजखान, अलिमर्दानखान, कासीमखान, खानाजादखान, हिमतखान, सफशिकनखान, मुरादखान अशा कसलेल्या आणि बलाढ्य मुघली सरदारांना बोल बोल म्हणता पाणी पाजले. संताजी-धनाजींशी मुकाबला म्हणजे दोन पैकी एक ठरलेले - मृत्यू किंवा अत्यंत लज्जास्पद पराभव. मुघली सैन्याच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत अशा दंतकथा पसरु लागल्या. बादशहाची चीडचीड पराकोटीला पोहोचली. औरंगजेबाने एकट्या संताजींच्या मागावर कासीमखान, खानाजादखान आणि हिंमतखानाची रवानगी केली.
यातील मराठ्यांच्या युद्धकलेचा अप्रतिम नमुना म्हणावा लागेल अशी दुडेरीची लढाई झाली. दुडेरीनजीक कासीमखानाच्या छावणीभोवती संतीजींनी घिरट्या घालायला सुरुवात केली. मराठ्यांची एक तुकडी कासीमखानावर चालून गेली. कासीमखानाचे पूर्ण लक्ष या आघाडीवर गुंतल्यावर मराठ्यांची दुसरी दहा हजारांची तुकडी अचानक दुसर्या बाजूने चाल करुन आली. थोड्या अंतरावरच छावणी करुन राहीलेला रहुल्लाखान कासीमखानाच्या मदतीला धावला. रहीमखान पुढे सरकला इतक्यात वार्यागत कुठूनतरी मराठ्यांची तिसरी आठ हजारांची तुकडी मध्ये शिरली आणि या दोन्ही सरदारांचे एक होणे अशक्य करुन टाकले. रात्री युद्ध थांबले तेव्हा सगळे मोगली सरदार व सैनिक आहेत तिथेच थांबले. सरदार हत्तीवरील अंबारीतच झोपी गेले. रात्री कधी मराठे भूतासारखे येतील आणि कापाकापी करतील या भीतीने मोगली सैनिक झोपलेच नाहीत. सकाळी मराठ्यांनी पुन्हा हल्ला चढवला. यात मिर्झा हसन नावाचा सरदार मेला. तीन दिवस अगदी हाच क्रम सुरु होता. शेवटी सैन्याचा सरकता गोल करुन तडफडत, मराठ्यांचे रट्टे खात ते दुडेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आले. किल्ला पाठीशी ठेवून मोर्चे बांधले. काही सैन्याला अन्न मिळाले. काही उपाशी राहीले. सैन्यातील अर्धाधिक गुरे, उंट, घोडे मराठ्यांच्या हाती लागले होते. किल्लेदाराने मराठ्यांच्या भीतीने किल्ल्याचे दरवाजे आतून बंद केले. किल्ल्यातील व्यापारी किल्ल्याच्या भींतीवरुन सामान खालील लोकांना विकू लागले. इतक्यात एक बातमी आली बादशहाने हिंमतखानाला मदत घेऊन रवाना केले आहे. पण पाठोपाठ बातमी आली की जिंजीवरुन राजाराम महाराजांनी पाठविलेल्या सैन्याने या मदतीला हाकलून लावले. बातमी ऐकून मुघलांनी हायच खाल्ली. हिंमतखानाखेरीज खानजादखानही मोठी मदत घेऊन कासीमखानाच्या मदतीला आला. संताजींनी दोन्ही खानांची भेट होऊ दिली. या मदतीने खूष झालेल्या कासीमखानाने मेजवानी ठेवली. मेजवानी सुरु असतानाच तीन दिशांनी मराठ्यांनी एकाचवेळी हल्ले करुन सर्व तंबू पेटवून दिले. दोघेही इतके हडबडले की त्यांनी किल्ल्याच्या आत जाण्याचा प्रयत्न सुरु केला. किल्ल्याच्या दाराशी सामान आणि सैनिकांची इतकी दाटी झाली की कासीमखान तटावर बांधलेल्ल्या दोराला धरुन आत गेला. घाबरलेल्या कासीमखानने आपल्या सैन्याला वार्यावर सोडले. मराठ्यांच्या बंदूकचींनी दिवसभर शब्दशः मोगली सैनिकांवर बंदूकींचा सराव केला, त्यात शेकडो मोगली सैनिक ठार झाले. पुढे संताजींनी तब्बल महीनाभर किल्ल्याला कडेकोट वेढा दिला. आतील लोकांनी गुरे-ढोरे मारुन खाल्ली. घोडेही मारायला सुरुवात केली. किल्ल्यातील धान्यातून प्रत्येकाला जे पावशेर धान्य मिळाले ते उकडून खाऊ लागले. शेवटी काहींच्या धीराचा कडेलोट झाला. ते किल्ल्याच्या भिंतीवरुन उड्या टाकून मराठ्यांना शरण गेले. त्यांच्या जवळचे पैसे मराठ्यांनी काढून घेतले मग त्यांना पोटभर जेवु घातले. ही वेळ फायद्याची आहे हे बघून आता बिलंदर मराठ्यांनी थोडावेळ तलवारी खाली ठेवल्या आणि तराजू हातात घेतला. किल्ल्यातील सैनिकांना तोंडाला येईल ती किंमत सांगून ते धान्य, मेवा, मिठाई विकू लागले. ते वरुन पुरचुंडीतून पैसे टाकत आणि मग दोराला बांधून पिशव्या - पोती खाली सोडत. खालून मराठे त्यात धान्य घालून देत. शेवटी शेवटी किल्ल्यात सर्वत्र घाण साचली. पाण्याची मारामार झाली. जनावरे आणि माणसांच्या प्रेतांचा घाण वास सुटला. यामुळे पश्चात्ताप होऊन कासीमखानाने पराभूत तोंड घेऊन जगण्यापेक्षा चक्क आत्महत्या केली. काहींच्या म्हणण्यानुसार त्याला अफुची सवय होती, अफु न मिळाल्ल्याने तो तडफडून मेला.
अखेर खानजादखान, रहुल्लाखान वगैरे सरदारांनी वाटाघाटीची बोलणी सुरु केली. शिक्षा म्हणून संताजीने जबर खंडणीची मागणी केली व पैसा मिळेपर्यंत प्रत्येक सरदाराच्या कुटुंबातील दोन-चार लोकांना ओलिस ठेवले. बाकी सैनिकांना फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी जाण्याची परवानगी दिली. शस्त्रे, दारुगोळा, हत्ती, ऊंट, घोडे, बैल, खजिना वगैरे सगळं सगळं मागे सोडून किल्ला मराठ्यांच्या ताब्यात देऊन खालमानेने सर्वजण निघुन गेले. या लढाईत मराठ्यांना तब्बल पन्नास लाखांची लूट आणि दुडेरीचा किल्ला मिळाला (नोव्हेंबर १६९५).

No comments:
Post a Comment