विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 April 2020

*श्रीमंत राजा अमरसिंह.उर्फ बाबासाहेब शंभुसिंह जाधवराव ( पहिले )









*श्रीमंत राजा अमरसिंह.उर्फ बाबासाहेब शंभुसिंह जाधवराव ( पहिले )
काशीयात्रा (१७८८ - १७९० )* राजेअमरसिंह हे धार्मीक प्रवृत्तीचे होते .त्यांना काशीयात्रेची ओढ लागली होती. त्याकाळी काशीयात्रेला जाणे फार दुर्घट काम होते . यात्रेला जाण्याची पेशव्याकडुन मिळवुन ते माळेगावला आले . त्यावेळी त्यांनी नवीन राजवाडा बांधण्यास सुरुवात केलेली . पुर्वी त्यांचे वडील *राजा शंभुसिंह ( द्वितीय )* हे माळेगावला तावरेपाटील यांच्या गढीत राहत होते .राजवाड्याचे काम चालु होते आणि काशीयात्रेला निघाला तत्पुर्वी जहागिरीचा कारभार त्याचे मांडवे / बोरगाव शाखेतुन दत्तक घेतलेले पुत्र *खाशेराव उर्फ शंभुसिंह* ( तिसरे ) *( दत्तक पुत्र शंभुसिंह यांचे मुळ नाव खाशेराव होते त्यांच्या वडीलाचे नाव श्रीमंत राजे उदयसिंह धनसिंगराव जाधवराव त्यांना दोन मुले होती सुरसिंह आणि खाशेराव ते मांडवे बोरगाव शाखेतील होते )* आणि राजवाड्याचे बांधकाम सोपवुन ते काशीयात्रेस पेशव्याकडील ५०० घोडस्वाराची एक तुकडी, अरबाच्या पथकातील २०० हत्यारबंद शिपाई, स्वताच्या पथकातील १५० स्वार, हत्ती , पालख्या,म्याने, निशान, जरीपटका,वाद्य-सिंधाडे, भालदार, चोपदार,हरकरे,जासुद,वगैरे लवाजमा घेतला . तसेच स्वताबरोबर मानकरी, कारभारी, कारकुन, उपाध्ये, शास्त्री, पुराणीक,शागिर्द, मंडळी सोबत घेतली शिवाय कारखान्यापैक्की जमादारखाना,देवघर,दप्तर हे कारखाने घेतले . ओझे वाहुन नेहण्यासाठी उष्टरखाना असुन,मोदीखाना, फरासखाना, भांडीकुंडी सामान बरोबर घेतले .यात्रेसाठी माळेगावातील महाजन, शेट सावकार त्यांची कुटुंबे आणि सुखवस्तु लोकही सोबत घेतले. दुध दह्यासाठी गाई घेतल्या एवढेच नव्हे तर बाळतंणीच्या सोईचे सामान घेतले *महत्वाची गोष्ट म्हणजे अमरसिंहानी प्रसिद्ध मोरोपंत कवी हे पुराणीक सोबत घेतलेले* जवळपास अडीच हजार लोक काशीयात्रेस प्रारंभ केला *नाशिक त्र्यंबकेश्वर* , ही दक्षिणेतील तीर्थे करुन *प्रयाग* वरुन *काशीस* आले तेथे त्यांनी पुजा अर्चा दान धर्म पण मोठ्या प्रमाणात केला एके दिवशी राजेअमरसिंह तिर्थविधी आटोपल्यावर एक काशीतील *तेजपुंज गोसावी* भेटायला आले .: राजेअमरसिंहानी त्यांना,नमस्कार करुन आदरतिथ्य केले . गोसावीनी धर्माविषय बरेच उपदेश केले आणि जायची परवांगी घेताना त्यांनी आपल्याजवळील असलेले *उत्कृष्ट सुचिन्हयुक्त भवानीशकराचे लिंग* दाखविले हे लिंग आपल्याला द्यावे असे गोसाव्यास विनंती केली पण गोसावीनी मी देणार नाही असे बोलले राजेअमरसिंहनी जवळपास *एक लक्ष रुपये* दक्षिणा देतो असे बोलले तरी गोसावीने नाकारले शेवटी नाइलाजाने पहारेकरास ताकीद दिली की गोसाव्यास बाहेर जाऊ देऊ नये म्हणुन काही झाले तरी तरि हा बाण घेणारच असे गोसाव्यास आग्रहाने सांगितले शेवटी राजेअमरसिंहाची निष्ठा पाहुन काही न घेता *बाण( लिंग )* स्वाधीन केला आणि जाण्यास परवांगी मागितली राजेअमरसिहाने गोसावीची आदरतिथ्ये करुन पाद्यपुजा केली आणि मग जाण्यास परवांगी दिली चौकीपहारे ओलांडुन देवडीच्या बाहेर गुप्त झाले हे पहारेकरानी,सांगितल्यावर राजे अमरसिंहाना पण आश्चर्य वाटले अमरसिंहाना,पुत्र नव्हता त्यासाठी कवी मोरोपंत यांनी गंगेला प्रार्थना केली *" गंगे अमरसिंहाला मुलगा दे"* ती *गंगावकिली'* नावाच्या काव्यात पण छापुन प्रसिध्द झाली ती पुढीलप्रमाणे *" जो अमरसिंह जाधव या धवल प्रांज्य यश असे माते ! लोकहि लोक हितावह दे जे शिवभक्तीला रसे माते !!* राजेअमरसिंहाची सामाजिक प्रतिष्ठा आणि मराठा सरदारातील स्थान वरच्या दर्जाचे होते . पेशवेदेखील राजेअमरसिंहाना मान देत होते . राजेअमरसिंह यांची किर्ती सर्वत्र पसरलेली असुन ती निष्कलंक आहे हे मोरोपंतानी आपल्या आर्यात स्पष्ट केले आहे यावरुन राजेअमरसिंहाची महानता आणि कवी मोरोपंत हे जाधवराव घराण्यास कसे मान देत होते हे स्पष्ट होते . सहा महिने काशी मध्ये वास्तव्य केले ते स्वता शाक्तमार्गी होते *शाक्तमार्गातील मुख्य गुरु यद्ण्येश्वर श्रोती काशीतील नावजलेले मोठे विद्वान शास्री होते* त्यांनाही येताना सोबत घेतले ( ह्या शास्त्रीना माळेगाव येथे इनामी जमीनीपण दिल्यात त्यांचे वंशज हल्ली पुणे इथे वास्तव्यास आहेत) राजेअमरसिंह सर्वाना घेऊन काशीवरुन माघारी निघाले वाटेत मथुरा वृंदावन ही तिर्थे करुन इंदोर येथे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* आमंत्रणावरुन तेथे गेले तेथील आदरतिथ्य आणि मानसन्मान स्विकारले परस्परांना मौल्यवान भेटवस्तु पण दिल्या . नंतर *करोली* *यादवांचे उर्फ जाधव* यांचे एक घराणे तेथे देखील गेले तेथील आदरतिथ्य, स्विकारले काही दिवस तिथे वास्तव्य करुन आणि नंतर पुणे इथे आले तिथे *पेशव्याना* भागिरथी स्नान.घातले . त्यानंतर माळेगाव येथे आले काशीयात्रेच्या परीक्रमेस जवळपास करुन जवळपास *अडीच वर्षानी* माळेगावला आले . त्यांना नवीन राजवाड्याचे काम त्यांच्या दत्तक पुत्र राजे शंभुसिंह देखरेखीखाली पुर्ण झाले होते. आकर्षक असे प्रवेशव्दार (कमान ) हे आगळेवेगळे असुन तो स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे ( आजही ती पिढ्यानपिढ्या सुस्थीतीत आहे ). राजवाडा चुनेगच्चीसंगी दगडाचा बांधला त्यास तट फार मजबुत होता , हा राजवाडा दुमजली बांधला होता वर रंगमहाल, दिवानखाने दरबार गुप्त तळघर, भुयारीमार्ग, चारीबाजुने बुरुंज बांधले शेजारीच पाण्याची व्यवस्था बारमाही असावी म्हणुन *तळे* देखिल बांधले *( ह्या ठिकाणी आता तळे नसुन आता क्रिडा संकुल आहे )* जवळपास राजवाड्यास *दिड लक्षहुन* अधिकचा खर्च आला . त्यास त्यांनी *अमररत्न निवास* असे नाव दिले. *( सध्या हा राजवाडा शिक्षण संस्थेस दान म्हणुन दिला येथे श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कुल आणि ज्युनिअर काॕलेज आहे )* यांनंतर माळेगाव येथे नवीन शंकराचे देऊळ बांधायला सुरूवात केली . मजबुत असे मंदीर बांधले . जवळपास *एक लक्ष* रुपये खर्च आला .काशीहुन आणलेल्या भवानी शंकाराचे लिंग ची प्रतिस्थापना केली आजही ते मंदीर सुस्थितीत असुन *भवानीशंकर मंदीर* म्हणुन ओळखले जाते मंदीरासमोर *नंदी* हा प्रेक्षणीय आहे ह्या नंदीस त्याकाळात १०००० रुपये खर्च आलेला . शिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करु लागले. जवळपास दरवर्षी पाच हजार रुपये खर्च करत असत जे काशीवरुन गोसावीनी दिलेला *बाण* सध्या नवीन राजवाडा *अमरबाग पॕलेस* मध्ये नवीन मंदीरात स्थापन केला त्या मंदीरास *श्री बाणेशवर मंदीर* असे म्हणतात आजही मोठ्या स्वरुपात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो . *सदर माहिती share कराताना कसलेही Editing करु नये अथवा कसलाही फेरफार करु नये जशी आहे तरी share करावी . श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव मो.नं. 9767345333 *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय लखुजीराजे*

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...