विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 April 2020

महाराष्ट्राचा इतिहास




महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!
इतिहासाचे मुख्य तीन भागात विभागणी होते. एक ज्ञान नाही असा इतिहास. एक माहिती आहे पण त्याचे फारसे उपलब्ध नाही. अन एक भाग ज्याची लिखित साधने उपलब्ध आहे. पहिल्या भागाला प्राचीन! दुसऱ्या भागाला मध्ययुगीन अन तिसऱ्या भागाला आधुनिक संबोधतो.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर साधारण एकूण ज्ञात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे! पूर्वी महाराष्ट्राला रठ्ठ, महारठ्ठ, अश्मक वगैरे नावे होती! साधारण इसवीसनाच्या सुरवातीचा इतिहास पहिला तर संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य असलेले मावळचे सातवाहनांना दक्षिणाधिपती म्हटले जायचे! हे तेच वीर आहेत ज्यांच्यामुळे शालिवाहन शकाची कालगणना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली.
सातवाहन
तत्कालीन इराण, अफगाणीस्थातून आजच्या पाकिस्तानात उदयास आलेल्या शक नावाच्या बलशाली जमातीने भारतात दिग्विजय करत महाराष्ट्रावर चाल केली! अन आताच्या पंढरपूर भागात ती लाखोंच्या सेनेसोबत पराक्रमी सातवाहनांशी ते लढले. अन तो दिवस म्हणजे शालिवाहन शके सुरु झाले!
महाराष्ट्र हा मुळातच देशाचा अनभिषिक्त सम्राट! रक्षणकर्ता अन राष्ट्रपती! रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ मुळी मार देणारा असा होतो. आता महारठ्ठचा अर्थ तुम्ही लावलाच! दंड देण्याचा अधिकार राजाला असतो या अर्थाने महाराष्ट्र हा देशाचा मुख्य अन रक्षणकर्ता होतो.
महाराष्ट्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत! हे यासाठी सांगतो कारण काही भेळपुरी अन पाणीपुरीच्या दुकानांना विकास म्हणत असतात! देशातील गुप्त साम्राज्यातही गुप्तांनी महाराष्ट्राशी स्नेहाचे संबंध राखले व राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन बलदंड वाकाटकांच्या साम्राज्याला आपल्यावर चाल करू दिली नाही!
तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांचा पराभव पाताळयंत्री अल्लाउद्दीन खिल्जीने करून हा अजेय भूभाग पहिल्यांदा काबीज केला! लक्षात घ्या देशाच्या दीड हजार वर्षांच्या गुलामीच्या काळापैकी महाराष्ट्र केवळ ४५० वर्षे गुलामीत होता!
पुढील साडे तीनशे वर्षे महाराष्ट्र गुलामीच्या अंधकारात खिचपत पडला! पुढील इतिहास थोडाफार आजही माहिती आहे! स्वराज्यसूर्य शिवरायांच्या आगमनाने महाराष्ट्राने जुने कापडे फेकावीत तशी गुलामीच्या साखळदंड फेकले अन त्रिखंडावर अधिपत्य गाजवणाऱ्या मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावला.
शिवरायांच्या गमनानंतर दख्खन काबीज करण्याच्या हेतूने मुघल बादशहा औरंगजेब स्वतःला पाच लाखांच्या अन मोठ्या खजिन्यासह महाराष्ट्रात तळ ठोकला. दगाफ़टक्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्याच्या तावडीत सापडले! मुघलांना साजेल अशी क्रूर अन निर्घृण हत्या त्याने करवली!
त्यानंतर न राजा न राजधानी पण महाराष्ट्राचे मराठा वाघ अतिविराट अशा शत्रूशी झुंज देत होते! पुढे बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. जो बोलायचा राहून गेला. प्राचीन रघुकुल नावाच्या संस्कृत ग्रंथात नमूद केल्यानुसार असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी लढू शकतो असा मराठा! अशा मराठ्यांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!!
मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-
“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”
२७ वर्षे अखंड युद्धानंतर मुघलांच्या पाच लाखांची सेना कापली तर गेलीच पण सातत्याने होणाऱ्या मराठ्यांच्या हल्ल्याने मुघल बादशाह हैराण झाला व गतप्राण झाला! अन तिथून महाराष्ट्राने मागे पाहिले नाही! अगदी दिल्ली अन पुढं आताचा पाकिस्तानही ताब्यात घेत महाराष्ट्राने देशातील परकीय शक्तींना नष्ट केले! दिल्लीचा बादशहा नामधारी बनला! महाराष्ट्राच्या वाघांनी अफगाणीस्थाच्या सीमेवर गुरगुरायला सुरवात केलेली.
लक्षात घ्या! शिवरायांच्या युद्धनीतीमुळे ब्रिटीश व युरोपियन सत्ता मराठेशाहीत खिळखिळ्याच नव्हे तर जमही बसवू शकल्या नव्हत्या. पुढे आपल्याच उत्तर भारताने घात केला अन पाठ दाखवून पळून गेलेला अब्दाली पानिपतात भारी पडला! पेशव्यांच्या नादानपणा व नियोजना अभाव , हेकेखोरपणा या तीन गोष्टीमुळे तीन आठवड्यांच्या उपासमारीने महाराष्ट्राचे वाघ पानिपतात तहानभुकेने व्याकुळ होते पण तरीही प्राणपणाने लढत होते.
जगातील सर्वात भीषण लढायांमधील ती एक भीषण लढाईत अफगाणी अब्दाली शिल्लक राहिला ह्यायोगे विजयी ठरला! शेकडो मराठी स्त्रिया व मुले गुलाम बनवल्या गेल्या. त्यातील बहुतांश व्यक्ती पुढे शिखांनी अब्दालीकडून सोडवून घेतल्या. परंतु, त्या युद्धानंतर महाराष्ट्राची अख्खी तरुणाई कामी आली! अन ह्या देशाचा वाघ कमकुवत झाला!
त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी मराठ्यांशी चाळीस वर्षे झुंजून देश ताब्यात घेतला! लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र बलदंड होता तर परकीय पाय ठेऊ शकत नव्हता! उत्तर भारतीयांच्या गद्दारीने देश दीडशे तर महाराष्ट्र शंभर वर्षांसाठी गुलामीत गेला.
मग माझ्या मराठी वाघांनो, तुम्ही ठरवूनही सामान्य राहू शकत नाही! चारशे मावळ्यानिशी उभा कडा चढणारा अन दोन हजाराच्या सेनेला पराभूत करणारा नरवीर तान्हाजी मालुसरे असो वा अख्ख्या सेनेला खिंडीत गाठणारा स्वयं यमराज झालेला बांदल सेना ,बाजीप्रभू देशपांडे वा शंभूसिंह ज‍ाधव असो! वा शत्रूला युद्धाची दाणादाण उडवणारे संताजी व धनाजी असोत! हे वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले!
हा इतिहास आहे महाराष्ट्राचा! सोनं पिकवणारी जमीन अन पहाडाच्या छातीची माणसं ही ह्या महाराष्ट्राची ओळख! आता लक्षात आलं असेलच का हा इतिहास शाळेत शिकवत नाहीत! महाराष्ट्राचा इतिहास चे बाळकडू घेणारा कारकून म्हणून नव्हे तर वाघ बनून बाहेर पडेल!!
संकलन -महेश पाटील-बेनाडीकर
With thanks
Mahesh Patil-Benadikar

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...