#शायिस्ताखानास
#शास्त! ५ #एप्रिल १६६३
शिवशाहीतील हे मोठे रोमांचक प्रकरण आहे महाराज सिद्दी जोहरच्या विळख्यात पन्हाळ गडावर असतांना आदिलशहाने स्वराज्यावर दुहेरी आघात केला तो असा की त्याने औरंगजेबाला पत्र पाठवून विनंती केली की मावळात शिवाजी राजांवर दबाव आणण्या करिता सरदार नामजद करावा....
औरंगजेबाने या विनंतीस त्वरित मान्यता दिली याला कारण असे होते की, महाराजांनी ३० एप्रिल आणि ४ जून १६५७ रोजी जुन्नर आणि नगर ही मुघली ठाणी लुटली होती आणि याचीच परतफेड म्हणून आणि आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी औरंगजेबाने एक फर्मान औरंगाबादेस रवाना केले....
औरंगाबाद म्हणजे दख्खनच्या सुभ्या पैकीचा एक प्रमुख सुभा त्यावेळी दख्खनचा सुभेदार होता "अमिर-उल-उमराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब" उर्फ शायिस्ताखान, नात्याने औरंगजेबाचा मामा जणू बादशहाची दुसरी प्रतिमाच......
२८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून निघाला खाना सोबत ७७००० घोडदळ, हत्ती बकसर, तिरंदाज, बरखंदाज, आड़हत्यारी, बाजारबुणगे, दारूगोळा, बाणांच्या भांडत्या, आरबा, उंटांचा तोफखाना, पायदळाची तर गणतीच नाही!
असे अमर्याद सैन्य बेमोहिन रुपे, होन, मोहरा, ऐसे ३२ कोटी द्रव्य घेऊन खान रजियावारी चालून आला, खानाची स्वारी म्हणजे जणू कलयुगाच्या रावणाचीच खानासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदाती सरदार यांची नावे उपलब्ध आहेत-
शमसुद्दीनखान पठान, जाफरखानाचा पुत्र नामदारखान,गयासुदीनखान, हसन मुनीम, सुलतान मिर्झा , प्रतापी मनचेहर सिंग, तुर्कताजखान, क्रूर कुबाहतखान, हौदखान, उझबेगखान, इमाम बिरुदीखान, दुर्जय लोदिखान पठाण, दिलावर मौलाद,अब्दुल बेग,
खोजा भंगड़, खोजा जोहर, खोजा सुलतान, सिद्दी फत्तेखान, फतेजंग,कारतलबखान, गाझीखान, भावसिंह हाडा, किशोरसिंह, शामसिंह, राजा गिरिधर, मनोहर, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, गोवर्धन, राजासिंह,
वीर विरमदेव, सदाचारी रामसिंह, रायसिंह,
अमरसिंह, अरिंदम, द्वारकाजी, जीवाजी, परसोजी, बाळाजी, सुरजी गायकवाड, दिनकर काकडे, अनंत दत्त, रुस्तम, रंभाजी पोवार, रायबागिन, कृष्णराज व त्याचे इतर भाऊ,
सर्जेराव घाटगे, कमळाजी गाढे, जसवंतराव कोकाटे, कमळाजी कोकाटे एवढा सगळा लवाजमा सोबत असतांना खान शांत कसा बसेल? येतांना वाटेतील देवळे, मठ, गावे, नगरे,अधिकाऱ्यांची घरे, नदी, तीरे भ्रष्ट करीत खान निघाला सगळा प्रदेश ग्रहण लागल्या सारखा
भेसूर दिसू लागला....
मजल दरमजल करीत खान नगरला ११ फेब्रुवारी १६६० या दिवशी आला २५ फेब्रुवारीला त्याने नगर सोडले त्या नंतर खान दौंड नजीक सोनवडीस ३ मार्च १६६०
पोहचला तिथून खान बारामतीस निघाला खानाची पुण्याच्या दिशेने मजल दरमजल पोहचत होती.....
१८ एप्रिल १६६० रोजी खान शिरवळास आला खान आता राजगड, पुरंदर,सिंहगड यापासून थोड्या अंतरावर होता मराठे अधून मधून खानावर छापा घालतच होते एकदा तर मावळ्यांनी मुख्य छावणीवर हल्ला चढवला तो हल्ला राव भावसिंह याने परतवून लावला....
महाराज तर या संकटाशी परिचित देखील नव्हते कारण ते स्वतः पन्हाळ गडावर अडकून होते संक्रांत कोसळावी,अशी स्वराज्याची अवस्था झाली होती तरी सुद्धा चिवट मराठे पन्हाळ गडावर आणि पुण्यात पराक्रमाची शर्थ करत होते....
खान आता सासवडच्या रोखाने निघाला पण त्याने पुरंदरची वाट न धरता शिवापूर नजीकची गराड्या जवळील घाटाची वाट निवडली या घाटास आज मरीआईचा घाट असे म्हणतात खान सासवडला पोहचला पण मराठ्यांच्या त्रासदायी हालचालींमुळे खानाने त्वरित पुण्याकडे कूच केले.....
अखेर १० मे रोजी खान पुण्यात दाखल झाला त्याने स्वतःचा मुक्काम ठोकला थेट लाल
महालातच! पुण्यात खानाच्या छावणीचा तळ पडला आणि आपण शिवाजीच्या महालात राहणार या कल्पनेनेच खान हर्षोउल्लासित झाला.....
खान पुण्यात आला खरा, पण पुण्यात त्याच्या
प्रचंड सैन्याला धान्याची टंचाई भासू लागली तर एकीकडे मराठ्यांनी खानाला कोंडीत पकडण्यासाठी स्वतःच भोवतालचा प्रदेश जाळून टाकला पुणे ताब्यात आल्यावर आता आजूबाजूचा प्रदेश पण काबीज करावा, या विचाराने खानाने आपला मोर्चा संग्रामदुर्ग म्हणजे चाकणच्या गढीकडे वळवला.....
चाकण आहे पुण्याच्या उत्तरेस १८ मैल आणि त्याच्या पलीकडे आहे भीमा नदी भीमेच्या पलीकडचा मुलुख हा मुघलांच्या ताब्यात होता त्यामुळे रसदेचा तुटवडा होणार नाही हा खानाचा समज, चाकणचा किल्ला म्हणजे भुइकोट-गढीच, भोवताली खंदक, उंच
तटबंदी....
आपण सहज चाकण सर करू या गोड गैरसमजात खान होता यावेळी त्याच्या सोबत जवळ जवळ २० हजारच्या आसपास फौज होती आणि गढ़ीत मराठे किती तर अंदाजे ३०० ते ४०० खानाने जसा निकराचा हल्ला केला त्याच्या दुपटीने तो मराठ्यांनी परतवून लावला तिथेच खानाचा पहिला दारुण पराभव झाला...
हल्ला करून काही उपयोग होत नाही हे पाहून खानाने २१ जून १६६० रोजी चाकणच्या गढीस वेढा दिला पूर्वेकडून शमसुद्दीनखान, उझबेगखान, मीर अब्दुल, पश्चिमेकडून राजा रायसिंह, दक्षिणेकडून भावसिंह, जोहरखान, सरफराज खान आणि उत्तरेकडून खासा शायिस्ताखान स्वतः ठाण मांडून बसला.....
शूर मराठे तर खानाच्या सैन्यास दाद देईनात मोघल आणि मराठे यांची झुंज अशी निकराची सुरू होती आणि अत्यंत चिवटपणे मराठे चाकणची गढ़ी लढवत होते खान आता पुरता हैराण झाला होता मराठे पराक्रमाची शर्थ करीत होते....
कोण म्हणेल की, या लोकांचा राजा तिकडे वेढ्यात अडकून आहे? चाकणचा किल्लेदार सुद्धा तसाच पराक्रमी, शूर आणि निडर, त्यांचे नाव ''फिरंगोजी नरसाळा'' गढीतील मराठे म्हणत -आमचा राजा जोहरशी लढत आहे आम्ही सगळे मिळून चाकण लढवू.....
आणि यावर कळस म्हणजे सगळ्या धामधुमीत महाराज १२ जुलै १६६० रोजी पन्हाळ गडावरून निसटले, चाकणचा वेढा पडून आता ४० दिवस होऊन गेले होते महाराज राजगडावर परतले दिवसामागून दिवस उलटत होते खानाने आता एक बेत रचला.....
त्याने एक भुयार गुप्तपणे इशान्ये कडील बुरुजा पर्यंत खोदत नेले वेढा पडून आता ५४ दिवस झाले होते भुयाराचे काम पूर्ण झाले खानाच्या हशमांनी भुयारामध्ये ठासून दारू भरली आणि सुरुंगाला बत्ती दिली गेली प्रचंड स्फोट झाला अन् क्षणार्धात बुरुजावरील काही मराठे
आकाशात उडाले.....
हे दृश्य पाहून मोघलांना चेव सुटला बुरूज उडताच खानाने हल्ला करण्याचा हुकूम दिला आणि मोघल सैन्य संग्राम दुर्गावर तुटून पडले तरी मराठे मागे हटण्याचे नाव घेईनात प्रतिकार सुरूच होता लढता लढता रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी दि. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोघलांनी पूर्ण तयारीनिशी आता प्रवेश केला...
तरी मराठे हटेनात एवढ्या सगळ्या प्रतिकारात मराठ्यांनी २६८ मोघल ठार केले आणि ६०० सैनिक जखमी केले मोघलां कडून आता जोर वाढतच चालला होता संग्रामदुर्ग आतून पूर्णपणे मोघलांनी घेरला गेला होता आता नाईलाजाने फिरंगोजीने माघार घेतली.....
२०,००० मोघली फौजेसमोर संख्येने थोडक्या असलेल्या मराठी मनगटांनी सतत ५५ दिवस जो प्रतिकार केला त्याला इतिहास सदैव लक्षात ठेवील भावसिंह हाडा याने पुढाकार घेऊन किल्ला शायिस्ता खानाच्या ताब्यात दिला खानाने उझबेगखानास चाकणची जबाबदारी दिली....
चाकण सर झाल्याची बातमी औरंगजेबास कळवली गेली आणि चाकणचे नामकरण झाले "इस्लामाबाद" शायिस्ता खानाने पुण्यात आल्यावर मिळवलेले हे पहिले आणि शेवटचे यश १५ ऑगस्ट १६६० रोजी चाकण स्वराज्यातून गेले ५५ दिवस चिवट प्रतिकार करून मराठ्यांचे हे साहसपर्व कडू घोट घेत संपले....
जेधे शकावलीमधील नोंद अशी आहे - “आश्विन मासी चाकनेचा कोट शास्ताखानाने
घेतला मग पुनियास आला."
चाकण सर करून पावसाळा संपताच शायिस्ताखान पुण्यात पोहचला महाराजांनी याच सुमारास सोनोपंत डबीर यांना खानाकडे पाठवले पण खानाने दुर्लक्ष केले पंत तसेच राजगडी परत आले पुण्यात आल्यावर खानाने कारतलब खानास परांडा घेण्यास पाठवले....
परांड्याचा आदिलशाही किल्लेदार गालिब याने घाबरून किल्ला देऊन टाकला शायिस्ता खानाने आता कोकणाकडे मोर्चा वळवला त्याने कारतलब खानास कोकणची मोहीम दिली खरी अन् कारतलब खानाचा पराभव शिवाजी महाराजांनी २ फेब्रुवारी १६६१ रोजी उंबरखंडात केला.....
सन १६६० ते १६६३ या ३ वर्षांत मोघलांचे आणि महाराजांचे बरेच सामने झाले असले आणि अनेक वेळा मार खाऊनही शायिस्ता खानाचा पाय पुण्यातून निघेना याच्यामागे एक गमतीशीर कारण आहे खान पुण्यात तळ का ठोकून आहे?
हे या प्रसंगावरून समजून येईल हा लाल महालातील प्रसंग आहे खान पुण्यात असतांना त्याच्या मदतीस जाफरखान बेग याची मुले नामदारखान आणि कामदारखान हे देखिल आले होते नामदारखान हा बिनीच्या पथकात नेमलेला होता (Advance Guard) याला हरावल असे म्हणत....
पुण्यात आल्या नंतर त्याने पाहिले होते, मुघल सैनिक महिन्यातून १५ दिवस काही काम करत नाहीत उगीचच मराठे आले याच्यावर हल्ला केला, त्याच्यावर हल्ला केला, अशी हुल
उठवत असतात असेच काही दिवस गेल्यावर
नामदारखानाने शायिस्ताखानास विचारले - ''नवाब साहेब आपण नात्याने माझ्या मावशीचे यजमान आहात मला एक शंका आहे, विचारू का?'' खान म्हणाला ''विचारा'' नामदारखान म्हणाला, ''आपण शिवाजी- शिवाजी म्हणता माझ्या माहिती प्रमाणे त्याच्याकडे ३००० घोडेस्वार, ५००० पायदळ आहे आणि काही किल्ले आहेत.....
त्याचे पुणे, सुपे, इंदापूर हे सुभे आपल्या ताब्यात आहेत तेव्हा तुम्ही माझ्या ताब्यात फक्त १०,००० सैन्य द्या, मी जातो आणि त्या शिवाजीस ३ महिन्यात वठणीवर आणतो"
निमूट ऐकून घेतल्यावर शायिस्ता खानाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला ''तुम्ही अजून बच्चे आहात, लहान आहात त्यावर नामदारखान म्हणाला, ''यात लहान-मोठ्याचा प्रश्न काय?
त्यावर शायिस्ताखान म्हणाला ''मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर शिवाजीची मोहीम संपवली तर औरंगजेबाला दख्खन मध्ये दुसरा कोण मोठा शत्रू आहे का? त्यावर नामदार म्हणाला की ''नाही"
म्हणून जर आपण शिवाजीची मोहीम संपवली, तर औरंगजेब म्हणेल, वाह! तुमची कामगिरी, तुम्ही फत्ते केलीत, आता तुम्ही कंधारच्या सीमेवर जा तेव्हा कंधारपेक्षा पुणे बरे नाही का?
नामदार काय जे समजायचे समजला यावरून शायिस्ता खानाची वृत्ती किती धूर्त, कपटी
आहे समजते या घटनेवरून मोघल सेनापतींचे धोरण काय आहे हे कळून येते (तारीखे दिलकुशा) मुळात खानास मोहीम संपवायची नव्हती यावरून खान सुट्टीला पुण्यात आला होता असेच वाटते जर हे भीमसेन सक्सेनाने लिहून ठेवले नसते तर आपणास हे कधी
समजलेच नसते.....
एक गमतीदार प्रसंग अजून आहे बखरीमध्ये याचा उल्लेख आला आहे शायिस्ताखान हा महाराजांना कमकुवत समजत असे एकदा दरबारातील पंडितांकडून खानाने संस्कृत श्लोक लिहून महाराजांना पाठवला....
- वानरस्तंव वनेवासी पर्वतास्ते सदाश्रयः "वज्र पाणीरहं साक्षात शास्ताखान मुपागतः"
अर्थ - तू डोंगरात फिरणारा वानर आहेस तर पर्वताचे पंख कापणारा मी वज्रपाणी इंदर
आहे.
यावर महाराजांनी खानास उत्तर दिले - भाजिग्ये वज्रपाणी शिवोयो । लंकानाय वानर श्री
हनुमान । तयो राघवद्वर्ण शाली नृपोहं । सीघ्र शास्ताखान जेताभयं ।
अर्थ - एक वानरानेच लंका दहन केली होती हे विसरू नका याच काळात काही मराठी अधिकारी महाराजांना सोडून खानाकडे आले, संभाजी कावजी हा त्यापैकी एक होता जो पुढे प्रतापराव गुजरांच्या हाती मारला गेला.....
महाराजांना आता प्रश्न पडला की, खान काही केल्या पुण्यातून निघेना आणि म्हणून आता महाराजांनी एक धाडसी मनसुबा रचला शायिस्ता खानास आता हुसकावून लावलाच पाहिजे लाल महालात घुसून खानास जीवे मारायचे केवढे धाडस हे महाराजांचे!
कल्पने पलीकडचे! असा विचार ऐकून साक्षात् यमाच्या पोटात देखील गोळा उठेल महाराजांनी दिवस निश्चित केला- ५ एप्रिल १६६३ चैत्र शुद्ध अष्टमी हे दिवस "रमजानचे" होते खानावर झडप ही रात्री घालायची होती अष्टमीचा दिवस
उजाडला.....
रमजानचा महिना असल्यामुळे खानाची छावणी लवकर झोपी जात असे महाराजांनी आपल्या सोबत २०० वरकड मंडळी, १००० निवडक माणसे सोबत घेतले त्यात सोबत नेतोजी पालकर, बाबाजी, बापूजी व चिमणाजी हे देशपांडे बंधू होते सर्जेराव व चांदजी जेधे, मोरोपंत पेशवे.....
महाराजांनी कामगिरी फक्ते होताच वाजवण्या करिता इशारतीचे नगारे, कर्णे हे सामान दिले होते सर्जेराव जेधे यांना महाराजांचा घोडा तयार ठेवून ठरल्या जागी येऊन उभे रहावे असा हुकूम होता महाराज येताच घोड्यावर बसून सिंहगडाकडे निघावे असा सगळा बेत ठरला होता....
दिवस मावळताच महाराज आणि मंडळी निघाली काळे वावरनजीक येताच महाराजांनी फौजेच्या २ तुकड्या केल्या नेतोजी पालकर आणि मोरोपंत पेशवे यांच्या हाताखाली एक तुकडी देऊन महाराजांनी आपल्या सोबत २०० खास निवडक माणसे घेतली (शि.प.स.सा.ले - ९३० प्रमाणे ४०० लोक अशी नोंद आहे)
महाराज लाल महालाच्या दिशेने निघाले
राजांकडे ढाल आणि तलवार होती महाराज आणि चिमणाजी आता पुण्यात शिरले जागोजागी खानाचे पहारे होते पुण्याला तर जसे छावणीचे रूप आले होते.....
''वाटेत तांब्राचे दळ थोर''(यवन सेनाप्रमुख) यांनी महाराज आणि बापूजी यांना अडवून विचारले कोणाचे लोक ? कुठे गेला होतात ? चिमणाजीने उत्तर दिले - "आम्ही कटकाचे लोक, चौकी पहारा करण्यासाठी गेलो होतो'' खानाच्या गोटात बरेच मराठी लोक असल्यामुळे कोणास त्यांची शंका आली नाही.
महाराज रात्री ३ च्या सुमारास लाल महाला जवळ पोहचले आत कसे शिरायचे हे अगोदर पासूनच ठरलेले होते राजांना लाल महालाची रेघ न रेघ माहिती होती महाराजांचे अवघे बालपण तर तिथेच गेलेले.....
चिमणाजी, बापूजी हे सगळे देखील लहानपणी
तिथेच खेळलेले महाराज आत शिरले मुदपाक खान्याच्या जवळ येताच त्यांनी पाहिले की,खानाचे आचारी स्वयंपाकाची तयारी करत होते ही तयारी सूर्योदया पूर्वीच्या न्याहरीची असावी..
महाराजांनी आणि मावळ्यांनी कुणाला काही समजायच्या आत कापाकापी सुरू केली काही लोक झोपेत होते ते झोपेतच मारले गेले मुदपाक खान्यातून आत शिरण्यास एक दिंडी रस्ता होता जो तात्पुरता विट-मातींनी बुजवून टाकला होता.....
कारण त्या रस्त्याच्या पलीकडे खानाचा जनानखाना होता त्यामुळे तो बंद करण्यात आला होता ही बंद केलेली वाट खोदत असतांना एका दासीची खोली तिथेच जवळ असल्या कारणाने ती खानाच्या दिशेने पळत गेली खान तेव्हा गाढ झोपेत होता.....
तिने खानास सांगितले की,मुदपाक खान्यातून कसलासा आवाज येतोय पण खान तिला रागात म्हणाला की, ''स्वयंपाकी त्याच काम करत असतील'' पण तेवढ्यात एकामागून एक दासी पळत आल्या आणि भिंत कोसळल्याचे कळताच खान घाबरला त्याची झोपच उडाली.
खानाने हातामध्ये भाला आणि धनुष्य बाण घेतला मराठ्यांनी एकच गलका केला होता कोण कुठे आहे, कुणाला काहीच समजत नव्हते याच दरम्यान नगारे आणि कर्णे असलेल्या मंडळींनी जोरजोरात वाद्ये वाजवण्यास सुरुवात केली.....
अवघा कल्लोळ उठला त्या सगळ्या धामधुमीत
काही मराठे खानाच्या समोर आले खानाने लगेच बाण चालवला तरी त्यातील एका मराठ्याने खानावर वार केला त्यात खानाला जखम झाली या गडबडीमध्ये २ मराठे तिथल्या पाण्याच्या हौदात पडले......
याचा फायदा घेऊन तिथल्या दासींनी शमादानाचे दिवे विझवले शिवाजी बायकांस हात लावत नाही, हे पाहून खान दासींमध्ये जाऊन लपून बसला त्या अंधारात मराठ्यांनी आता दिसेल त्याला यमसदनी धाडले त्यामध्ये खानाचा एक मुलगा अबुल फत्तेखान हा मारला गेला....
महाराज शायिस्ता खानास शोधत होते पण खान बायकांमध्ये लपून बसलेला होता त्या डेऱ्यात महाराज आले, तेव्हा खानाला कापरेच भरले त्याने भीत भीत बाजूला असलेल्या तलवारीस हात घातला लगेच महाराजांनी त्याला हेरले आणि वार केला अन् खानाची बोटे उडाली खान बाजूस जाऊन निपचित पडला....
खान मेला असे तेथील दासींना वाटले म्हणून त्यांनी एकच गलबला सुरू केला महाराजांना देखील तसेच वाटले महाराज लगेच सगळ्यांना घेऊन बाहेर पडले मोरोपंत व नेतोजी बाहेर वाट बघत उभे होते....
नदी ओलांडून महाराज येताच सर्जेराव पण तयारीत होतेच महाराज येताच सगळे सिंहगडाच्या रोखाने निघाले वाटेत जात असतांना महाराज ''जरेसाकडे'' गेले अशी
एक नोंद आहे हे जरेसा म्हणजे सिंहगडा जवळील आगळंब येथील "जरसेश्वर"असावे का?
झाल्या प्रकरणात महाराजांनी खानाकडील ४० मोठे सरदार, १२ बायका, १ सेनापती,खानाचा १ मुलगा, १ जावई असे एकूण ५५ लोक मारले खानास आता शरम वाटू लागली आणि खानाने लगेच म्हणजे ८ एप्रिल १६६३ रोजी सगळा कारभार जसवंत सिंहाकडे देऊन तो औरंगाबादेस निघून गेला.....
याचे फळ म्हणून औरंजेबाने रागाने शायिस्ता खानास बंगालला ढाक्यास रवाना केले या प्रसंगा वरून महाराजांची नेतृत्व क्षमता, त्यांचे धैर्य, शौर्य आणि दृढता किती होती हे दिसून येते महाराजां बरोबर असणारे सोबती, त्यांना महाराजां बद्दल एवढा आदर का होता हे
समजते....
कारण १६४८ च्या फत्तेखान स्वारीपासून त्यांनी पाहिले होते की, वेळप्रसंगी महाराज आपला जीव धोक्यात घालावयास मागे-पुढे बघत नाहीत राजा म्हणून केवळ सुख न घेता आपल्या कृतीतून ते राजेपण वेळोवेळी सिद्ध करतात....
आणि त्यामुळे ही सगळी मावळी मनगटे महाराजांच्या एका शब्दावर जीव द्यायला अन जीव घ्यायला तयार होत महाराजांनी स्वतः जाऊन शायिस्ता खानावर छापा घातला का? असा संशय बऱ्याच अभ्यासकांना पडतो.....
दीड लाख फौजेमध्ये महाराज मोजक्या फौजेनिशी प्रवेश करतात आणि धांदल उडवतात हे खरंच शक्य आहे का? असे बरेच प्रश्न आजकाल अभ्यासकांना पडतात, पण
या शंकेचे निरसन आहे.....
इतिहासातील एक कागद बोलका होतो आणि या वादाला पूर्णविराम मिळतो शिवकालीन पत्रसार संग्रह लेखांक क्र-९३० या पत्रामध्ये राजापूरला पाठविलेल्या पत्रात रावजी पंडित यांना आपण स्वतः शायिस्ता खानावर छापा कसा घातला असे महाराजांचे वाक्य आहे.....
निदान यामुळे तरी हा छापा महाराजांनी स्वतः घातला हे सिद्ध होते अशक्य असा हा पराक्रम करून महाराजांनी त्रिखंडात आपली शौर्य किर्ती प्रस्थापीत केली.....
संदर्भ :- श्री शिवभारत - कवींद्र परमानंद,
जेधे शकावली - करीना, शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ शिवचरित्रवृत्त संग्रह - ग.ह.खरे
आणि श.ना.जोशी, शिवचरित्र एक अभ्यास - सेतूमाधवराव पगडी, तारीख-ए-दिलकुशा - भीमसेन सक्सेना असे होते मोगल - निकोलाय मनुची सभासद बखर , ९१ कलमी बखर
खाफीखान, मुंतखबउललुबाब

No comments:
Post a Comment