विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

व्यंकोजीराजे भोसले

व्यंकोजीराजे भोसले
पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे, दुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे, ज्यांचे राज्य तंजावरास होते. तिसरे म्हणजे स्वराज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच नव्हे तर व्हिएतनाम सारख्या देशांनाही पारतंत्र्याशी लढण्याची ऊर्जा दिली. दक्षिण भारताच्या दूरदेशीच्या कर्नाटक-तामिळनाडूच्या अज्ञात मुलुखात महान पिते महाराजा शहाजीराजे नंतर व्यंकोजी राजे यांच्या वंशजांकडे महाराष्ट्रातील मराठी माणसाने कधी लक्षच दिले नाही. दक्षिणेतील जनसागरात बेमालूमपणे मिसळून सेवा करणारे हे घराणे मराठी माणसाला बेमालूम असेच राहिले. दक्षिणेस तंजावरास मराठी सिंहासन स्थापून अधिष्ठित होणारे पहिले राजा म्हणजे व्यंकोजी राजे. छत्रपतींप्रमाणे यांनी जरी हिंदुस्थानचा इतिहास घडविला नसेल तरी आपल्या राज्यातील रयतेची व शेजारील राज्यांची मदत करून त्यांनी दक्षिणच्या जनमानसांत एका उदार राजाची प्रतिमा निर्माण केली. आक्रमक म्हैसूरचा नायक चिक्कदेवराय व विजापूरी सरदारांच्या विरोधात व्यंकोजींनी कमजोर मदुराईच्या नायकास अनेकदा मदत केली. वीर राघवाचा मुलगा नेलुर शिवराम या कवीने "कमलकलानिधी" या संस्कृत ग्रंथात व्यंकोजीराजांच्या उदार वृत्तीचे वर्णन केले आहे. तो म्हणतो- जसे शिवाजी राजाने मोगलांचा पराभव केला तसे व्यंकोजी राजाने नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व राजांचा पराभव करून पाड्यांना म्हैसूरच्या जोखडातून मुक्त केले. या शिवराम कवीने हा ग्रंथ व्यंकोजीराजांचा नातू जयसिंह राजास अर्पण केला.तंजावरचे राजे व्यंकोजी भोसले | Vyankoji ...

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...