विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 April 2020

छत्रपती संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार.

*२६ एप्रिल इ.स.१६८४*🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाय्रा तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.... कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो. अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते,
"वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मुंबईसाठी दिलेल्या कलमामध्ये एक कलम असे होते की, :- "माझे आणि मुघलांची गलबते समुद्रात वावरतात तरी मुघलांचे एखादे जहाज माझ्या लोकांनी धरले आणि त्यात जर इंग्रजांचा माल असला व त्याच्यावर त्यांच्या खुणा वगैरे असल्यास आणि त्या पटवून दिल्यास त्यांना त्यांचा माल परत मिळेल. इंग्रजांनी धरलेल्या जहाजात माझ्या प्रजेचा माल आढळल्यास तो त्यांनी परत करावा."
छत्रपती संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...