विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 April 2020

#मालोजीराजे_भोसले

#मालोजीराजे_भोसले
#वीरश्री_मालोजीराजे_बाबाजीराजे_भोसले
बाबाजी भोसले यांचे पुत्र मालोजीराजे भोसले यांचा जन्म इ.स.१५५२ साली वेरूळ येथे झाला.
दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती.
बाबाजी भोसल्यांना मालोजी आणि विठोजी असे दोन पुत्र होते. मालोजीराजे हे थोरले होते.
मालोजी राजे भोसले मराठ सरदार होते, त्यांनी मलिक अंबरच्या सैन्यात अहमदनगर सल्तनत सेवा केली.
ते शहाजीराजे भोसले यांचे वडील आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीराजे यांचे आजोबा होते.
सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही,
मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता, यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते.
विध्वंस होत होता इथल्या भूमीचा.
विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धास्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्याकाळच्या निजामशाहीत वावरला.
स्वपराक्रमाने 'सरगुर्हो' म्हणजेच 'सेनापती'यासारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला.
शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न;
पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी
स्थापन केलेले स्वराज्य - यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे.
छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो.
शिवभक्त असणारे मालोजीराजे यांनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
शिखर शिंगणापूर येथे दुष्काळी परिस्थितीत तलाव खोदुन यात्रेकरुंसाठी पाण्याची व्यवस्था केली आणि अशीच
देव, देश आणि धर्म सेवेची एक ना अनेक कामे मालोजीराजेंनी आपल्या कारकीर्दीत केली होती.
या पराक्रमी योद्ध्याला इंदापूर जवळ वीरश्री प्राप्त झाली आणि त्यांना शेवटचा अग्नी इंदापूरच्या गढीच्या परिसरात देण्यात आला.
त्यांच्या समाधी पादुकांचे इंदापूरमध्ये दर्शन घेता येते.
#जगदंब...
|| एकच आवाज ||
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...