विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

खलाटे मराठा सरदार

खलाटे मराठा सरदार
१७ व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मुघलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्र्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा महाराष्ट्र्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. सातारा मराठ्यांची नवी राजधानी झाली. अगदी शिवाजी राजांपासून सातारा भागातील लढवय्या घराण्यांनी भोसले घराण्याची एकनिष्ठेने सेवा केली आहे . त्या मध्ये निकम , बरगे, , खलाटे, फडतरे, काळे, जाधव, चव्हाण , बोधे , साबळे, महाडिक,फाळके, भोईटे,पवार, कदम, माने , शिंदे , वाघमोडे , सावंत, पिसाळ, पांढरे, धायगुडे, गायकवाड,.गाढवे, घाडगे ,काटे या सरदारांनी खूप पराक्रम केला आहे. परंतु त्यांचे बाबतीत फार काही लिखाण झाले नाही. परंतु तत्कालीन कागद पत्रामधून, लढायचे वर्णानातून त्यांची माहिती मिळते .
त्यामध्ये खलाटे घराण्याचा उल्लेख करावा लागतो. बरगे, साबळे, खलाटे, कंक हे मुळचे निकम आहेत. शिवाजी महाराजांचे मातब्बर सरदार येसाजी, कृष्णाजी कंक हे हि मुळचे निकम घराण्यातील आहेत. निकम हेही निकुंभ या राजस्थानातील राजपूत घराण्याचे वंशज आहेत. परंतु मुस्लिम आक्रमकमुळे ते दक्षिणेत आले. तेथे विजयनगर या हिंदू राज्यात पराक्रम गाजविला .परंतु तेही राज्य संपले नंतर विजयपूर (विजापूर ) येथे आदिलशाहची चाकरी केली. आपल्या क्षत्रिय व लढाऊ बान्यामुळे तेथे हि पराक्रम गाजविला. विशेष म्हणजे निकम हे शहाजी राजे यांच्या सेनेत पराक्रमी फौज म्हणून प्रसिद्ध होते . नंतर च्या काळात हे निकम पश्चिम महाराष्ट्र भागात स्वराज्यात सामील झाले . आपल्या अतुलनीय पराक्रमाने शौर्य दाखविले .याच निकम चे काही कारणास्तव पडनाव खलाटे झाले .शिवाजी महाराजा नंतर शाहू महाराज , पेशवा काळात बहुतेक सर्व लढ्यात खलाटे सरदारचा उल्लेख आहे. युद्धाच्या अगोदर शाहू महाराज सातारा भागातील मराठा सरदार यांना फर्माने काढीत . त्या मध्ये सातारा भागातील मराठा सरदार यांना तयार राहण्याचा आदेश दिला जायचा .त्या मध्ये खलाटे चा उल्लेख दिसतो . पानिपत, खर्ड्या ची लढाई मध्ये बराच पराक्रम गाजवला आहे.
इतिहासात या घराण्यातील दहा सरदारांचा उल्लेख आढळतो. त्यातील पराक्रमी सरदार म्हणून मानसिंग खलाटे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल .
सरदार मानसिंगराव खलाटे –
हा शाहू महाराज यांच्या समकालीन होता .या सरदारचा सातारा दरबारात बराच दबदबा होता , परंतु काही कारणास्तव त्यांना रायगड येथे १७८३ मध्ये कैदेत राहावे लागले. हा व्यक्ती बडा असामी होता म्हणून त्याच्या तैनातीला एक माणूस सरकारातून पगार देऊन ठेवावा लागला, अशी पेशवे दफ्तरात नोंद आहे . नंतर त्यांची सुटका केली गेली. युद्धात सातारा महाराजान तर्फे सैन्य भाग घायचे . खरड्याची लढाई हि इतिहासातील प्रसिद्ध लढाई आहे. हैदराबाद चा निजाम व मराठ्यांमध्ये १७९५ साली हि लढाई झाली होती. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता.याच मातब्बर सरदाराने खर्ड्या च्या लढाईत सातारा महाराजा तर्फे इतर सरदारांच्या बरोबर भाग घेतला आणि मोठा पराक्रम गाजविला . खर्ड्याच्या पोवाड्या मध्ये याचा उल्लेख आहे. खलाटेना कुंठे (फलटण) , लाठे , शिरीस्णे (बारामती) येथे पाटीलकी मिळाली. तसेच सातारा महाराजान तर्फे बरेच जमिनी इनामात मिळाल्या.
संदर्भ- रायगडची जीवन कथा - लेखक शांताराम अवलास्कर ,
पेशवे दफ्तरातील निवडक कागद ,
मराठा रियासत- लेखक सरदेसाई

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...