विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती भाग १

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती
भाग १
देऊर हे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, हे संमत वाघोलीपैकी एक गाव होत.
देऊर गाव रघुजी भोसलेना मोकासा व नंतर इनाम होते. देऊरचा भोसलेंचा राजवाडा असला तरी तो भोईटे घराण्याच्या ताब्यात मालकी हक्काने आहे. शिवाय, देऊरची राजवाडा संबंधीत जमीन भोईटेंकडे आहे. देऊर रेल्वे क्राँसिंगची जागा ही भोईटेंची गेली आहे. हे भोईटेे भाऊबंद परिवार व नागपुर संस्थानचे सरदार घराणे होय. माणकोजीराव, महादजी इ. भोईटे नागपूरचे लढवय्ये होते. पण, मुधाई देवस्थानचे मालक राजेभोसले नागपुरकर व मानकरी चव्हाण दहिगावकर आहेत. देऊर गावात कदम बहुसंख्य असलेतरी गाढवे देशमुख पण आहेत.
गिरवी, मालगाव, देऊर ही गावे कदमांच्या भावकीची आहेत. तिन्ही नातेवाईक. नागपुरकर भोसलेंच्या सोबत मोहिमेत आठ कदम देऊरकर होते.
मालगाव, देऊर आणि आराळे या तिन्ही गावचे कदम हे गिरवीकर कदमच आहेत
मुधी पौर्णिमेला देवी आली म्हणून मुधाई हे नाव पडले. एक दहिगावकर चव्हाण या घराण्यातील भक्तामुळे आली हे खरे आहे. पण, दहिगावकर चव्हाण पैकी सरदार भिवजी, सेट्याजी, मुधोजी ही नावे इनाम व मोकासदार होती.देऊरची मुधाई देवी ही नागपुरकर राजेभोसलेंची आद्यदेवता .
नागपुरकरांच्या 'संस्थानी' आणी 'वैयक्तिक' दोन्ही राजचिन्हात सुद्धा "जय मुधाई" असा उल्लेख आहे.
कोरेगाव तालुक्यात छत्रपतींचे निष्ठावंत भोईटे,येवले, चव्हाण, धुमाळ, यादव सोळसकर, पवार, भोसले, जगताप, बर्गे, शिंदे, कदम, जगदाळे, फाळके,महाडिक काटकर, जाधव, बोधे, माने, पिसाळ, निकम, लेंभे, वीर, शिर्के, घोरपडे, नलवडे, क्षीरसागर, मोरे, इ.वतन दार वीरांची गावं आहेत.नागपूरकर भोसले यांच्यावर भालचंद्र अंधारे यांची बरीच पुस्तकं आहेत.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...