विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती भाग 2


नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती
भाग 2
नागपूर साम्राज्याचे राजकुमार बख्त बुलंद यांनी नागपूरची स्थापना केली असल्याचे ताजा इतिहास सांगतो. त्यानंतरचा देवगडचा राजा चांद सुल्तान होता. त्याने नागपूरला आपली राजधानी निश्चित केले हकेली आणि या शहराला त्याने वॉल सिटी बनविले होते. 1739 मध्ये चांद सुल्तानचे निधन झाल्यानंतर चांद सुल्तानचा अनौरस पुत्र वाली शाह हा राजा झाला आणि चांद सुल्तानची विधवा पत्नी आपली दोन मुलेे अकबर शाह आणि बुरहान शाह यांचे हित जोपासण्यासाठी बेरारचे मराठा नेते रघुजी भोसले यांना जाऊन मिळाली. 1743 नंतर मराठा राज्यकर्ते सत्तेवर येऊ लागले. रघुजी भोसले यांच्यापासून ही सुरुवात झाली. देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी 1751 पर्यंत राज्य केले.
1803 मध्ये राघोजी (द्वितीय) दुसर्या अँग्लो —मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, या युद्धात ब्रिटीशांचा विजय झाला. 1816 मध्ये राघोजी (द्वितीय) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी (द्वितीय) याने हद्दपार केले आणि त्याचंी हत्या केली. 1817 मधील मुधोजी तिस-या आन्गलो — मराठा युद्धाच्या काळाच्या काळात मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, सध्या नागपूर शहरात असलेल्या सीताबर्डी येथील युद्धात त्यांचा पराभव झाला. हे युद्ध भोसल्यांच्या साम्राज्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. या युद्धानंतर भोसल्यांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि ब्रिटीशांनी नागपूर शहर काबिज केले. तात्पुरत्या ताजपोशीनंतर मुधोजींना हद्दपार करण्यात आले आणि ब्रिटीशांनी राघोजी (द्वितीय)चे नातू राघोजी (तृतीय) यांच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. 1840 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्तेच्या काळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर 1853 मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली.
1853 ते 1861 या काळात नागपूर, छिदवडा आणि छत्तीसगडचा समावेश असलेला नागपूर प्रांत सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारचा भाग बनले आणि ब्रिटीश केंद्रीय सरकारमध्ये हे शहर आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणण्यात आले. नागपूरला या प्रांताची राजधानी करण्यात आले. 1903 मध्ये यात बेरारचा समावेश करण्यात आला.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...