विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

" तारापूरची लढाई " 【 शंभूराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण पराक्रम 】

" तारापूरची लढाई "
【 शंभूराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण पराक्रम 】

छत्रपती संभाजी महाराज , आपल्या एकंदर कारकिर्दीत , १६८ युद्धांवर , स्वतः आघाडीवर होते . 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' नुसार , आपल्या कारकिर्दीत एकही युद्ध न हरणारा , जगातील एकमेव राजा म्हणजेच , " छत्रपती संभाजी महाराज " .

या विशेष लेखात , शंभूराजांच्या महान पराक्रमां- -पैकी , एक पराक्रम आपण अभ्यासणार आहोत .

इ.स. १६८३ , औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा , वाढता प्रभाव पाहून , संभाजी महाराजांवर
मात करण्यासाठी , त्याने इंग्रज , डच , पोर्तुगीज यांना
संभाजी राजांविरुद्ध बंड करण्याचा हुकूम जारी केला .
यावेळी पोर्तुगीज , संभाजी महाराजांबरोबर राजनीती
करत होते . एका बाजूने त्यांनी , औरंगझेबाचे सैन्य उत्तर फिरंगणातून विनाहरकत जाऊन दिले , तर दुसरीकडे
शंभूराजांनी मैत्रीची भाषा करून , मराठ्यांचा गोव्यातील
वकील येसाजी गंभीरराव यास अटक केली . परिणाम
असा झाला कि , दि. १५ एप्रिल १६८३ ला , पोर्तुगीजांचं
राजकारण ओळखून , शंभूराजांनी स्वतः १००० घोडदळ
आणि २००० पायदळ घेऊन , तारपूरच्या किल्ल्यावर
आक्रमण केले , आणि किल्ल्याबाहेरील बराचसा शहरी
भाग जाळला , दोन पोर्तुगीज पादरीही कैद झाले . तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी , मॅन्युअल अल्वारेस ह्यने , मराठ्यांना प्रतिकार केला , आणि गोव्या लाही सर्व वृत्तांत कळवला . पुढे मराठयांनी , पोर्तुगीजां - ची रसद मारली . याचा परिणाम असा झाला की , पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली आणि येसाजीलाही सोडून द्यावे लागले . पुढे मराठा-पोर्तुगीज वाईट होत गेले , आणिसन १६८४ ला शंभूराजांनी दक्षिण फिरंगणात , एक मोहीम केली , ज्याला आपण गोवा मोहीम म्हणतो , परंतुया मोहिमेदरम्यान तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आले नाही , कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे शाहजादा मुअझम कोकणात उतरला .

छत्रपती संभाजी महाराजांच्या रणनितीत , मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध २३ युद्धे लढली आणि सर्वात
विजयी झाले .

" अखंड भारताचा विजय आहे ".

~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)

ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...