विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम


श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम
सन १५७५ महादजीपंत भट श्रीवर्धनचे देशमुख
सन १६६० परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या कारकुनी सेवेत दाखल.
परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या सेवेत सरदार.
सन १६८४ साली बाळाजी विश्वनाथ चिपळूण सोडून सासवडास पुरंदरे यांच्या कडे वास्तव्यास. सन १६८४ ते सन १६९९ औरंगजेबाच्या विरूद्ध रामचंद्रपंत यांच्या सेवेत.
बाळाजी विश्वनाथ सन १६९९ ते सन १७०३ पुणे प्रांताचे सरसुभेदार.
या कार्यकाळातील कार्ये
नारायणगाव येथे बंधारा बांधला.
नारायणगड हा किल्ला बांधला.
विसापूर किल्याची डागडूजी.
मोगलांशी एकिकडे मुत्सद्दी वाटाघाटी तर दुसरी कडे सिंहगड किल्यास पुरंदरे यांच्या मारफत दारूगोळा रसद पुरवठा.या काळात दिम्मत सेनापती असा बाळाजी विश्वनाथ यांचा उल्लेख.
बाळाजी विश्वनाथ सन १७०४ ते सन १७०७ दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार.
नोव्हेंबर सन१७०५ या काळात दहा हजार फौजेनिशी दिंडोरीवर स्वाऱ्या.
या काळात या सुभे दौलताबाद प्रांताचा उत्तम बंदोबस्त.
बाळाजी विश्वनाथ यांची हषारी पाहून
अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार सेनापती धनाजी जाधव यांच्या सेवेत. फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली.
बाळाजी विश्वनाथ यांची ताराबाईसाहेबांकडून रांगणा किल्यावर नेमणूक.
सन १७०५ औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असतांना बाळाजी विश्वनाथ मोगली गुजरात स्वारीवर. झाबुआ व गोध्रा प्रांताचा मोगली सुभेदार मुरादबक्ष याचा पराभव.
मुरादबक्षचा दोन लाख दहा हजार खंडणी भरून बाळाजी विश्वनाथ यांच्याशी तह.
शाहूमहाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी सुटका.
ऑक्टोबर सन १७०७ च्या खेड च्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्या विरूद्ध न लढण्याचा सल्ला. सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट.
सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल. खेडची लढाई. सातारा शाहूमहाराजांकडून काबीज.
दिनांक १२ जानेवारी सन १७०८ सातारा येथे शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती.
दिनांक २७ जून सन १७०८ सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.
दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते किताब व सेना उभारणीसाठीच्या खर्चास पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा सरंजाम बहाल.
सन १७१२-१३ छत्रपती शाहूमहाराज यांचे पेशवा बहिरोपंत पिंगळे यांची सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर स्वारी. स्वारीत पेशवा बहिरोपंत पिंगळे यांचा सरखेल कान्होजी आंग्रे यांजकडून पराभव. पेशवा बहिरोपंत पिंगळे कैदेत. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती.
पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३
ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त.
दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची शाहूमहाराज यांच्याकडे शिफारस.
दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती.
सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी भेट घेऊन सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहूमहाराजांच्या पक्षात आणण्यात यश आले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली.
नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला.
चंद्रसेन जाधव याने शाहूमहाराज यांना व दमाजी थोरात याने बाळाजी विश्वनाथ यांना कपटाने कैद करण्याचा कट रचला.
५ ऑगस्ट सन १७१६ रोजी दमाजी थोरात यांजकडून पेशवा बाळाजी विश्वनाथ, अंबाजीपंत पुरंदरे आदी यांना कपटाने कैद केले. खंडणी देऊन सुटका झाली.
बाळाजी विश्वनाथ यांनी पिलाजी जाधव यांच्यावर दमाजीची मोहीम सोपवली. पिलाजी जाधव यांनी दमाजी थोरात याचा पराभव करून त्यास अटक करून या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला.
सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.
सन १७१७ - १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी थोरातांचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून तीस लाख रूपये , शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी अर्पण केले.
सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण - भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. थोरातांचा पून्हा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली.
मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. अखेर दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची प्राणज्योत मावळली.
संदर्भ -
पेशवे दप्तर
मराठी दप्तर रूमाल - १ व २
पेशवे बखर
पुरंदरे दफ्तर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने - राजवाडे
खंड
रोजनिशीतील उतारे
शाहू बखर
आंगरे यांची हकीकत
ब्रम्हेंद्र-चरित्र
साधन परिचय
पेशवेकालीन महाराष्ट्र
मराठी रियासत
अप्रकाशित कागदपत्र
पेशवे घराण्याचा इतिहास
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...